Join us

Social Viral : बाबौ! सॅण्डविच शूजची नवी फॅशन पाहिली का? किंमत वाचून डोक्यावर हात माराल जाणून घ्या खासियत

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 25, 2022 17:18 IST

Social Viral : या फोटोत तुम्ही पाहू शकता एका मॉडेलनं  सॅण्डविच स्निकर्स परिधान केल्या आहेत. या स्निकर्सवर सॅण्डविचचे थ्री डी फिलिंग असून आतल्या भागाला ब्राऊन ब्रेड प्रमाणे रंग दिला आहे.

सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काहीच नेम नाही. रोज असंख्य वेगवेगळ्या कलाकृती व्हिडीओ, फोटोच्या माध्यमातून समोर येत असतात. सध्या सॅण्डविच स्नीकर्सच्या जोडीचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. नेटिझन्सनीसुद्ध या फोटोला तुफान प्रतिसाद दिला आहे. (Rs 7k pair of sandwich sneakers internet)

या फोटोत तुम्ही पाहू शकता एका मॉडेलनं  सॅण्डविच स्निकर्स परिधान केल्या आहेत. या स्निकर्सवर सॅण्डविचचे थ्री डी फिलिंग असून आतल्या भागाला ब्राऊन ब्रेड प्रमाणे रंग दिला आहे. या सॅण्डविचमध्ये सलामी, कांदे, कोबीची पानं घातल्याप्रमाणे डिजाईन केली आहे. या स्निकर्सवरील सर्व वस्तू या वेगन लेदरच्या साहाय्यानं तयार केल्या असल्याची माहिती समोर आली आहे.

"तुम्ही ते कुठे घालत आहात?" असं कॅप्शन या फोटोला देण्यात आलं आहे. या फोटोला 46 हजाराहून अधिक लाईक्स मिळाले असून नेटिझन्सकडून अनेक प्रतिक्रिया दिल्या. "हे माझ्यासाठी नाहीये," अशी प्रतिक्रया एका युजरनं दिली आहे. तर दुसर्‍यानं “मी ते घालेन. मी वेगळा आहे. 

जगण्यासाठी तुमच्याकडे फक्त एकच आयुष्य आहे.” अशी कमेंट केली. डेली सँडविच प्लॅटफॉर्म स्नीकर्स डॉल्स किलच्या वेबसाइटवर हे सॅण्डविच स्निकर्स उपलब्ध आहेत आणि त्यांची किंमत 98 डॉलर्स आहे, जी अंदाजे 7 हजार 322 रुपये असावी.

टॅग्स :खरेदीअन्नसोशल व्हायरल