अनेकदा आपण जास्तीचे उरलेले अन्नपदार्थ फ्रिजमध्ये ठेवतो. उरलेले अन्नपदार्थ खराब होऊ नयेत यासाठी आपण हे पदार्थ एका छोट्या बाऊलमध्ये किंवा वाटीत काढून ती वाटी किंवा बाऊल फ्रिजमध्ये ठेवतो. परंतु आपण या वाट्यांवर झाकण ठेवत नाही किंवा काहीवेळा विसरतो. याचबरोबर, वाटीतील उरलेला प्रत्येक (how to use stretchable silicon lid cover) पदार्थ झाकून ठेवण्यासाठी तितक्या लहान आकाराच्या डिश देखील आपल्याकडे नसतात. अशावेळी आपण हे सगळेच पदार्थ असेच झाकण न लावता ठेवतो(silicone stretch lid use cases)
याचबरोबर काहीवेळा अर्धी चिरलेली फळं , भाज्या हे देखील आपण तसेच फ्रिजमध्ये ठेवून देतो. कोबी, फ्लॉवर, कलिंगड, टरबूज यांसारखी भाज्या आणि फळं आपण कित्येकदा अर्धीच कापून ठेवल्याने ती लवकर खराब होतात. एवढंच नव्हे तर फ्रिजमध्ये छोट्या - छोट्या बाऊल आणि वाट्यांमध्ये काढून ठेवलेले पदार्थ झाकून न ठेवल्याने कित्येकदा फ्रिजमधून काढताना बाहेर सांडतात. असे होऊ नये यासाठी आपण सिलिकॉन लिड कव्हर्सचा वापर करु शकतो. सिलिकॉन लिड कव्हर्स (Silicone Stretch Lid Covers) म्हणजे काय? त्याचा वापर कसा करायचा ते पाहूयात.
सिलिकॉन लिड कव्हर्स (Silicone Stretch Lid Covers) म्हणजे काय ?
सिलिकॉन लिड कव्हर्स हे प्लॅस्टिक सारख्या दिसणाऱ्या सिलिकॉन मटेरियलपासून तयार करण्यात आलेले लीड कव्हर्स आहेत. याचा वापर आपण कोणत्याही प्रकारचे बाऊल, वाट्या, डबे झाकून ठेवण्यासाठी करु शकतो. कित्येकदा आपण उरलेले अन्नपदार्थ एका छोट्या बाऊलमध्ये काढून फ्रिजमध्ये ठेवून देतो. परंतु आपण यावर झाकण ठेवत नाही. झाकण न ठेवल्याने काहीवेळा हे पदार्थ फ्रिजमधून बाहेर काढताना सांडतात आणि संपूर्ण फ्रिज खराब होतो.
अशावेळी या बाऊल्सना आपण हे सिलिकॉन लिड कव्हर लावून झाकून ठेवू शकतो. जेणेकरून हे पदार्थ फ्रिजमधून बाहेर काढताना सांडणार नाहीत. एवढंच नव्हे तर आपण सिलिकॉन लिड कव्हर्सच्या मदतीने अर्धवट कापलेलं कलिंगड, कोबी यांसारख्या भाज्या देखील झाकून ठेवू शकता जेणेकरून त्या खराब होणार नाहीत.
सिलिकॉन लिड कव्हर्सची इतर वैशिष्टये :-
१. या सिलिकॉन लिड कव्हर्सची स्वच्छता करणे अतिशय सोपे आहे. लिक्विड सोपं वापरुन इत्तर भांड्यांप्रमाणे आपण अगदी सहज स्वच्छ करु शकता.
२. आपल्याला एकाच पॅकेजिंगमध्ये वेगवेगळ्या साईजमधील सिलिकॉन लिड कव्हर्स मिळतात, जेणेकरुन आपण वेगवेगळ्या साईज डबे, वाट्या, बाऊल यांना झाकण म्हणून लावून कव्हर करु शकतो.
३. ही सिलिकॉन लिड कव्हर्स झाकण म्हणून लावल्यानंतर यातून कोणतेही लिक्विड पदार्थ लीक होत नाहीत.
४. आपण फ्रिज आणि मायक्रोव्हेव ओव्हनमध्ये देखील याचा वापर करू शकता.
५. ही सिलिकॉन लिड कव्हर्स स्ट्रेचेबल असल्याने सहजपणे ताणली जातात. आणि भांड्यावर झाकण म्हणून अगदी फिट बसतात.
फक्त २०० रुपयांची २ इन १ तेलाची बाटली, स्वयंपाकात तेलाचा वापर होईल आपोआप कमी...
फक्त ५०० रुपयांत आणा हे 'सेन्सर लाईट्स', हवे तिथे लावा-आजी आजोबांसाठी खास सोय...
किंमत आणि रेटिंग...
हे 'सिलिकॉन लिड कव्हर्स' आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकते. सिलिकॉन लिड कव्हर्स आपल्याला एका पाकिटात ६ वेगवेगळ्या साईजमध्ये येतात. याच्या एका पाकिटाची किंमत १९८ रुपयांपासून ते २५० रुपयांपर्यंत आहे. याला ३.२ इतके रेटिंग देण्यात आले आहे. असे हे 'सिलिकॉन लिड कव्हर्स' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://amzn.to/4h2vkIR