टरबूज म्हणजे उन्हाळ्यातला गारवा. बाजारात मिळणारे टरबूज पाहूनच उन्हाळा आल्याची जाणीव होते. लालबुंद, रसरशीत टरबूज पाहताक्षणीच खावं वाटतं. म्हणूनच आपण ते उत्साहात विकत घेतो आणि घरी आणतो. पण घरी आल्यानंतर मात्र असं लक्षात येतं की त्या टरबुजाला ना छान चव आहे ना रंग. म्हणावा तसा गोडवा नसल्याने काही टरबूज अगदी पांचट निघतात. आणि असे टरबूज खाल्ले जात नाही. म्हणूनच पुढे सांगितलेल्या काही गोष्टी आधी तपासा आणि मगच टरबुजाची खरेदी करा.(Shopping Tips for Watermelon)
टरबूज खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्या?
१. टरबूज खरेदी करताना त्याच्या रंगाकडे बारीक लक्ष द्या. जर टरबुजाचा रंग बाहेरून गडद, काळपट हिरवा असेल आणि तो सगळीकडे एकसारखा असेल तर ते टरबूज गोड असण्याची शक्यता जास्त असते.
फक्त १ आठवड्यात चेहऱ्यावरचे डार्क स्पॉट्स होतील कमी, पपईच्या पानांचा 'असा' लावा लेप
२. जर तुमच्यासमोर काही टरबुजं असतील आणि त्यापैकी कोणतं घ्यावं हे लक्षात येत नसेल तर अशावेळी सारखी दिसणारी टरबुजं उचलून पाहा. ज्याचं वजन जास्त असेल ते टरबूज घ्या. कारण पिकलेल्या टरबुजामध्ये पाण्याचा अंशही जास्त असतो आणि त्यामुळे बाकीच्यांपेक्षा ते थोडे जड असते.
३. टरबुजाचं देठ नेहमी तपासून घ्या. ज्या टरबुजाचं देठ हिरवंगार आहे ते टरबूज अजून पिकायचं आहे असं समजा. कारण पिकलेल्या टरबुजाचं देठ कोरडं, वाळलेलं असतं. त्यात रसरशीतपणा नसतो.
तुम्ही स्वत:च ‘या’ पद्धतीने घरीच तयार करा केस गळणं ताबडतोब थांबवणारा शाम्पू, ३० दिवसांत पाहा फरक
४. नैसर्गिकपणे पिकलेल्या टरबुजावर पिवळट डाग असतो. ज्या टरबुजावर असा डाग नसतो आणि शिवाय ज्या टरबुजाचा आकारही खूपच ओबडधोबड असतो, असे टरबूज कृत्रितपणे पिकवलेले असू शकते.
