Join us  

फक्त १९९ रुपयांच्या आत विकत घ्या ४ आकर्षक गिफ्ट्स, सिक्रेट सांता होवून द्या प्रेमानं भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 20, 2023 1:30 PM

Secret Santa Gifts Under 199 Rs. Check Out list : ख्रिसमसला सिक्रेट गिफ्ट बजेटमध्ये द्यायचं तर हे घ्या पर्याय

आता काही दिवसात जिंगल बेल म्हणत घराघरात नाताळ (Christmas) हा सण उत्सवाने साजरा होईल. नाताळ म्हटलं की, केक, पेस्ट्री, चॉकलेट यासह विविध लहान मुलांना आवडणारे पदार्थ केले जातात. शिवाय गेम्सही खेळले जातात. असे म्हटले जाते, नाताळला लाल कपडे घालून एक वयस्कर माणूस आपल्या झोळीत खूप सारे गिफ्ट्स घेऊन येतो. हे गिफ्ट्स लहान मुलांसाठी असतात.

ऑफिस, कॉलेज किंवा कॉर्पोरेट जगतातही सिक्रेट सांता हा गेम खेळला जातो. या गेममध्ये ज्याच्या नावाची चिट्टी येईल, त्या व्यक्तीसाठी गिफ्ट आणण्याचा नियम असतो, व जो कोण व्यक्ती गिफ्ट स्वीकारेल त्याला गिफ्ट कोणी आणलंय हे ओळखायचे असते. जर आपल्याला ऑफिस कलीगसाठी गिफ्ट्स (Secret Santa Gift) खरेदी करायचं असेल, पण बजेटमध्ये स्वस्तात मस्त गिफ्ट काय घ्यावं हे सुचत नसेल तर, एकदा ही लिस्ट पाहा. १९९ रुपयांच्या आत आपल्याला स्वस्तात मस्त ४ प्रकारचे आकर्षक गिफ्ट्स आयडिया सुचतील. शिवाय हे गिफ्ट्स १९९ रुपयांच्या आत मिळतील(Secret Santa Gifts Under 199 Rs. Check Out list).

धूप होल्डर

ऑफिस कलीगला गिफ्ट घेताना बऱ्याच जणांना काय घ्यावं सुचत नाही. अशावेळी आपण त्यांना सुंदर शो पीस भेट म्हणून देऊ शकता. हा मेडीटेशन करणारा बुद्ध मॉन्क दिसायला फार सुंदर आणि शांत दिसत आहे. मॉन्कच्या बाजूला धूप होल्डर देखील आहे. शिवाय त्यात आपण अगरबत्ती देखील लावू शकता.  ज्यामुळे या शो पीसची आणखीन शोभा वाढते. हा क्युट शो पीस आपल्याला १४९/- रुपयांमध्ये मिळेल. या शो पीसमध्ये आपल्याला ४ रंग मिळतील.

फक्त २९९ रुपयांच्या आत मिळणारे वन पीस पाहा, स्वस्तात-मस्त; न्यू इयर पार्टीमध्ये दिसाल सर्वात सुंदर

Click to Buy :- https://www.amazon.in/dp/B075CGKLT1?ref_=cm_sw_r_apan_dp_NSWCC243GJMJ1927GD66&language=mr_IN&th=1

कॅमेरा लेंस कॉफी मग

आपल्या अनेक कलीग मित्रांना सतत चहा किंवा कॉफी पिण्याची सवय असते. जर आपली त्यांना कॉफी किंवा चहा पिताना आठवत येत राहावी असे वाटत असेल तर, त्यांना कॅमेरा लेंस आकाराचा झाकणासह प्लॅस्टिक कॉफी मग गिफ्ट म्हणून द्या. हा कॉफी मग आकराने मोठा आणि आकर्षक दिसतो. याची किंमत १४९ इतकी असून, यामध्ये आपल्याला ३ रंग मिळतील.

Click to Buy :- https://www.amazon.in/dp/B00PBVJ1FS?ref_=cm_sw_r_apan_dp_SEQ2VRSHCX9NJ12WSAFF&language=en-IN

लेडीज शोल्डर हँडबॅग

जर सिक्रेट सांता गेमच्या चिट्टीमध्ये महिला किंवा मुलीचं नाव आलं असेल तर, त्यांना स्पेशल लेडीज शोल्डर हँडबॅग भेट म्हणून द्या. महिलांना हँडबॅग प्रचंड आवडतात. त्यात महिला आपल्या गरजेनुसार वस्तू ठेवतात. जर त्यांना स्टायलिश हँडबॅग आवडत असतील तर, त्यांना १४९ रुपयांमध्ये मिळणारी ही लेडीज शोल्डर हँडबॅग नक्की भेट म्हणून द्या. यामध्ये आपल्याला २ कलर मिळतील. शिवाय स्वस्तात मस्त क्लासी दिसणारी ही हँडबॅग मेड इन इंडिया आहे.

पोटात सतत गुडगुड होत असेल, पोट फुगत असेल तर ५ पदार्थ खाणं आजपासूनच बंद करा..

Click to Buy :- https://www.amazon.in/dp/B0C74D7CFC?ref_=cm_sw_r_apan_dp_PMJWNYBCM6J6Q4Y2ZHB2&language=en-IN&th=1&psc=1

इअरफोन्स

काही कर्मचाऱ्यांना काम करत असताना गाणं ऐकण्याची सवय असते. त्यांच्यासाठी खास आपण त्यांना भेट म्हणून इअरफोन्स देऊ शकता. झेब्रोनिक्स या ब्रॅण्डवर सध्या सेल सुरु आहे. आपल्याला याचे वायर्ड इअरफोन्स स्वस्तात मस्त १९९ रुपयांमध्ये मिळतील. याची वायरची लांबी १.२ मीटर इतकी आहे. शिवाय हलक्या वजनाचे याचे डिझाइन फार आकर्षक दिसते. यामध्ये आपल्याला ६ रंग मिळतील. आपण आपल्याला आवडीनुसार इअरफोन्स खरेदी करून भेट म्हणून देऊ शकता.

Click to Buy :- https://www.amazon.in/dp/B09SGF7SMV?ref_=cm_sw_r_apan_dp_HYDCR37W128SBPC0BKNE&language=en-IN&th=1

टॅग्स :नाताळगिफ्ट आयडियासोशल व्हायरलसोशल मीडिया