Join us
Daily Top 2Weekly Top 5

कपाटात साड्यांचा पसारा? ‘असा’ करा सुंदर ‘साडी अल्बम बॉक्स’- साड्या राहतील नव्यासारख्या सुंदर...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2026 17:10 IST

saree organizer for wardrobe : saree storage box with zipper : wardrobe organizer for sarees : पैठणी, सिल्क महागामोलाच्या साड्यांची जपणूक करा स्मार्ट पद्धतीने, पाहा 'साडी अल्बम बॉक्स'ची कमाल...

'साडी' हा प्रत्येक महिलेच्या भावना आणि स्टाईलशी जोडलेला खास विषय...सण-समारंभ असो वा एखादं खास फंक्शन, आपण मोठ्या हौसेने आणि कित्येक हजार रुपये खर्चून भरजरी साड्यांची खरेदी करतो. पण खरी कसरत सुरू होते ती या साड्या घरी आणल्यावर...कपाटात जागा कमी पडते आणि महागड्या साड्यांची घडी विस्कटते किंवा त्या एकमेकांत गुंतून खराब होतात. या साड्यांची योग्य काळजी न घेतल्यास त्या खराब होण्याची शक्यता असते. विशेषतः कपाटात जागा कमी असताना साड्या कोंबून ठेवाव्या लागतात, ज्यामुळे त्यांची घडी बिघडते आणि फॅब्रिक खराब होतं. इतकंच नाही तर, आजच्या काळात साड्यांची खरेदी करणं जितकं सोपं आहे, तितकंच त्या व्यवस्थित सांभाळणं कठीण होत चाललं आहे. पैठणी, सिल्क किंवा नेटच्या साड्या योग्य पद्धतीने न ठेवल्यास त्या काळ्या पडतात किंवा त्यांचे धागे निघतात. हँगरला टांगून ठेवल्याने साड्यांना सांधे पडतात, तर कपाटात एकावर एक ठेवल्याने त्या शोधताना पूर्ण घडी विस्कटते(saree storage box with zipper).

आपल्याकडील महागामोलाच्या आणि आवडीच्या साड्या कपाटात कशा ठेवाव्यात आणि त्या सुरक्षित कशा राहतील, याची चिंता नेहमीच प्रत्येकीला सतावते. अशा परिस्थितीत साड्या नीट आणि सुरक्षित ठेवण्यासाठी एक स्मार्ट उपाय म्हणजे 'साडी अल्बम बॉक्स'. फोटो अल्बमप्रमाणेच या बॉक्समध्ये साड्या व्यवस्थित घडी करून ठेवता येतात, ज्यामुळे (wardrobe organizer for sarees) त्या सुरक्षित राहतात आणि हव्या तेव्हा सहज सापडतात. महागामोलाच्या, भरजरी साड्या (wardrobe organizer for sarees) ठेवण्यासाठी 'साडी अल्बम बॉक्स' म्हणजे नेमकं काय ते पाहूयात.  

'साडी अल्बम बॉक्स' म्हणजे नेमकं काय ?

साड्यांना कपाटात कोंबून ठेवण्याऐवजी, त्यांना आता एखाद्या अनमोल आठवणीप्रमाणे व्यवस्थित जपून ठेवण्यासाठी बाजारात 'साडी अल्बम बॉक्स' आला आहे.'साडी अल्बम बॉक्स' म्हणजे एखाद्या जुन्या फोटो अल्बमची पाने उलटून आपण फोटो पाहतो, अगदी तशाच पद्धतीने, तुम्ही तुमच्या साड्या या बॉक्समध्ये ऑर्गनाईज करू शकता. कपाटातील पसारा कमी करून साड्यांना 'न्यू लूक' देण्यासाठीचा हा खास पर्याय आहे. फोटो अल्बमप्रमाणे साड्यांना व्यवस्थित लावण्याची ही पद्धत सध्या महिलांमध्ये खूप लोकप्रिय होत आहे. तुमच्या लाडक्या साड्यांना वर्षानुवर्षे नव्यासारखं ठेवण्यासाठी हा बॉक्स खूपच फायदेशीर ठरतो. 

मुलांना भीती न दाखवता कसं शिकवाल 'गुड टच - बॅड टच'? आईबाबा तुमची जबाबदारी - मुलांशी बोला मोकळेपणाने...

तुमच्या ९ सवयी ऑफिसमध्ये तुम्हाला करतात बदनाम! करिअर होण्यापूर्वीच संपेल-करा ‘हे’ बदल आजच...

'साडी अल्बम बॉक्स' हा एक चौकोनी बॅगेच्या आकारासारखा कापडी बॉक्स असतो. यात आतमध्ये एखाद्या अल्बमच्या पानांप्रमाणेच १२ कापडी फोल्डर असतात. या कापडी फोल्डरला खालच्या बाजूला एक छोटीशी प्लॅस्टिकची पट्टी असते, जेणेकरून प्रत्येक फोल्डरमध्ये कुठली साडी आहे हे ते फोल्डर न उघडताच सहज दिसते. यातील प्रत्येक एका फोल्डरमध्ये तुम्ही प्रत्येकी एक अशा साड्या व्यवस्थित घडी घालून ठेवू शकता. हे फोल्डर तुम्ही कपाटात किंवा इतर ठिकाणी सहज कुठेही ठेवू शकता, प्रवासांत देखील तुम्ही हे अगदी सोयीस्कररीत्या कॅरी करु शकता. 

फ्रंट हूक ब्लाऊजचे १० नेक डिझाइन्स-‘इतके’ सुंदर ब्लाऊज डिझाइन्स तुम्ही आजवर पाहिले नसतील...

या 'साडी अल्बम बॉक्स' मध्ये तुम्ही साड्या व्यवस्थित तुम्हाला हव्या तशा घडी घालून ठेवू शकता. हा 'साडी अल्बम बॉक्स' तुम्ही घरबसल्या ऑनलाईन शॉपिंग साईटवरून मागवू शकता. हा 'साडी अल्बम बॉक्स' सर्वसामान्यांच्या खिशाला अगदी सहज परवडण्यासारखा आहे.

अवघ्या ५९९ रुपयांना ते सध्या ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहे. त्यामुळे अधिक वेळ वाया न घालवता ते घेऊन पहा आणि तुमच्या महागामोलाच्या साडया कपाटांत न कोंबता या 'साडी अल्बम बॉक्स' मध्ये व्यवस्थित घडी घालून ठेवू शकता.  

Click To Buy : https://amzn.to/48UN1ZH

English
हिंदी सारांश
Web Title : Organize Sarees Neatly with a Saree Album Box: A Smart Solution

Web Summary : Tired of cluttered saree cupboards? The 'Saree Album Box' offers a neat solution. This organizer keeps sarees safe, easily accessible, and looking new. Priced at ₹599 online, it's a wardrobe game-changer.
टॅग्स :खरेदीसाडी नेसणेमहिला