घरातील सोफा, बेड, कार्पेटची स्वच्छता करणे म्हणजे सगळ्यांत अवघड काम. वर्षानुवर्षे एकाच जागेवर असलेले हे सोफा, बेड योग्य वेळी स्वच्छ केले पाहिजेत. खरंतर, सोफा, बेड किंवा कार्पेट घरातील अशा वस्तू आपल्या रोजच्या वापरातल्या असतात. आपण या सोफा, बेडवर रोज उठतो - बसतो, झोपतो त्यामुळे आपले धुळीचे (Product Review Of Roller Cleaning Brush with Dust Crumb Collector) पाय यावर लागून सोफा - बेडवरील कव्हर किंवा चादरी खराब होतात. याचबरोबर, काहीवेळा आपण बेड किंवा सोफ्यावर खाण्या - पिण्याचे काही अन्नपदार्थ घेऊन बसतो, जे खाताना अनेकदा पडतात. यामुळे आपला बेड - सोफा खराब होतो. अशावेळी बेड - सोफ्यावर पडलेले अन्नपदार्थ स्वच्छ करावे लागतात(How To Use Roller Cleaning Brush with Dust Crumb Collector).
अशा प्रकारे बेड - सोफ्यावर सांडलेले अन्नपदार्थ काढणे किंवा त्यावरील धूळ स्वच्छ करणे फार किचकट आणि वेळखाऊ काम असते. यासाठीच आपण बेड - सोफा स्वच्छ करण्यासाठी 'रोलर ब्रश विथ डस्ट कलेक्टरचा' (Handheld Carpet Roller Cleaning Brush with Dust Crumb Collector) वापर करु शकतो. 'रोलर ब्रश विथ डस्ट कलेक्टर' म्हणजे काय त्याचा वापर कसा करायचा ते पाहा.
'रोलर ब्रश विथ डस्ट कलेक्टर' म्हणजे काय ?
'रोलर ब्रश विथ डस्ट कलेक्टर' हे बेड, सोफा, कार्पेट स्वच्छ करण्यासाठीचे छोटे हॅन्ड ब्रश आहे. याचा वापर करून आपण बेड, सोफा, कार्पेट अगदी मिनिटभरात पटकन स्वच्छ करू शकतो. हे प्लॅस्टिकचे छोटे ब्रश असते. यात तळाशी संपूर्णपणे गोलाकार पद्धतीने फिरणारे ३ मध्यम आकाराचे ब्रश बसवलेले असतात. याच ब्रशला डस्ट कलेक्टर देखील असतो, जेणेकरून ब्रशच्या मदतीने स्वच्छ केलेली धूळ आपोआप या डस्ट कलेक्टर मध्ये स्टोअर केली जाते. त्यानंतर या डस्ट कलेक्टरचे झाकण उघडून आपण अगदी सहजसोप्या पद्धतीने हा जमा झालेला कचरा फेकू शकतो. यासाठी आता सोफा किंवा बेड स्वच्छ करताना झाडू किंवा इतर कोणत्याही प्रकारच्या साधनांची गरजच भासणार नाही. आपण हे 'रोलर ब्रश विथ डस्ट कलेक्टर' फक्त सोफा - बेडवर अगदी अलगद फिरवून देखील मिनिटभर बेड, सोफा, कार्पेट स्वच्छ करु शकतो.
फक्त १९५ रुपयांचं फूड सिलिंग मशिन, उघडलेली पाकिटं झटपट पुन्हा करा सीलबंद-फार कामाची वस्तू...
इतर वैशिष्ट्ये :-
१. हे हाय ग्रेड प्लॅस्टिकपासून तयार केलेलं रोलर ब्रश आहे.
२. वापरायला अगदी सहजसोपे असल्याने घरातील कुणीही व्यक्ती याचा सहज वापर करु शकते.
३. याचा आकार लहान असल्याने ते कपाटात अगदी व्यवस्थित स्टोअर करुन ठेवता येते.
४. यातील डस्ट कलेक्टर उघडण्यासाठी एक छोटे बटण असते ते दाबल्यावर सहजपणे डस्ट कलेक्टर उघडून आपण साचलेला कचरा फेकू शकतो.
'पीठ चाळण्याचे' काम होईल मिनिटभरात! फक्त २५० रुपयांत आणा हा मग, ओटा आवरण्याची झंझटच नाही...
आता सुई - धाग्याशिवाय बटण शिवण झालं सोपं ! तुटलेलं बटण लावा मिनिटभरात - स्वस्तात मस्त उपाय...
किंमत आणि रेटिंग...
हे 'रोलर ब्रश विथ डस्ट कलेक्टर' आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकते. या 'रोलर ब्रश विथ डस्ट कलेक्टर' ला ३.८ इतके रेटिंग देण्यांत आले. हे 'रोलर ब्रश विथ डस्ट कलेक्टर' आपल्याला फक्त ३९९ रुपयांपर्यंत सहज विकत मिळते. असे हे 'रोलर ब्रश विथ डस्ट कलेक्टर' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.https://amzn.to/3CNbBz7