Join us

कबुतरांनी बाल्कनीत उच्छाद मांडलाय? १८० रुपयांची 'ही' वस्तू आणा- कबूतरं पुन्हा कधीच येणार नाहीत 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 27, 2025 15:04 IST

Product Review for Mr. Right Pigeon Spikes: तुमच्याही खिडकीच्या सज्ज्यावर, बाल्कनीमध्ये कबूतरं बसून तुम्हाला हैराण करत असतील तर 'या' वस्तूची खरेदी तुम्ही लगेचच करायला हवी..(how to get rid of pigeons?)

ठळक मुद्देतुम्हीही कबुतरांच्या त्रासामुळे वैतागला असाल तर हा एक सोपा उपाय लगेचच करून पाहा..

हल्ली कबुतरांचा त्रास खूपच वाढला आहे. काही वर्षांपूर्वी कबुतरं फक्त मुंबई आणि इतर २- ३ शहरांत दिसायचे. पण आता मात्र जवळपास सगळीकडेच कबूतरं खूप जास्त झाली आहेत. बाल्कनीमध्ये, खिडक्यांच्या सज्जावर, एसीवर असं जिथे जागा मिळेल तिथे ही कबुतरं बसतात आणि सारखी अंडी देतात. शिवाय त्यांनी आणलेल्या काड्यांचा कचरा होतोच. ते वारंवार विष्ठा करतात. असं म्हणतात की त्यांच्या विष्ठेतून जे कोणते सुक्ष्म कण बाहेर पडतात, त्यामुळे दम्याचा त्रासही होतो. म्हणूनच कबुतरांच्या या त्रासाने वैतागलेले अनेकजण त्यांना पळवून लावण्याचा प्रयत्न करतात. पण ते काही केल्या जातच नाहीत (how to get rid of pigeons?). तुम्हीही कबुतरांच्या त्रासामुळे वैतागला असाल तर हा एक सोपा उपाय लगेचच करून पाहा..(Product Review for Mr. Right Pigeon Spikes)

 

Mr. Right Pigeon Spikes

कबुतरांचा त्रास कमी करण्यासाठी हल्ली पिजन स्पाइक्स बाजारात मिळत आहेत. प्लास्टिकपासून बनवलेले हे जणू छोटे छोटे टोकदार काटेच असतात.

थंडीत खिचडीसोबत प्या गरमागरम टोमॅटो सार, तोंडाला चव आणणारी चटपटीत रेसिपी एकदा बघाच.. 

तुमच्या घरात ज्या ठिकाणी कबुतरं येऊन बसतात, त्या ठिकाणी हे स्पाइक्स चिटकवून टाका. यामुळे कबुतरांना तिथे येऊन बसणे अडचणीचे होते आणि त्यामुळे कबुतर तिथं बसणं पूर्णपणे बंद करून टाकतात. 

फक्त कबूतरच नाही तर तुमच्या घरात सतत मांजर येत असेल तर मांजरीचा त्रास कमी करण्यासाठीही हे स्पाईक उपयोगी ठरतात. कारण काटेरी वस्तूवरून चालणे मांजर, उंदीर या प्राण्यांसाठीही अडचणीचेच ठरते.

 

किंमत आणि रेटिंग

Mr. Right Pigeon Spikes च्या ५ पट्ट्या १७९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत आहेत. एका पट्टीवर अनेक स्पाईक असतात. त्यामुळे ५ पट्ट्याही पुरेशा होतात.

नेहमीच खूप पिंपल्स येतात? 'हा' पदार्थ खाणं बंद करा- ८ दिवसांत पिंपल्स जातील

Mr. Right Pigeon Spikes ला ग्राहकांकडूनही ४ स्टार मिळाले आहेत.

Click To Buy:https://amzn.to/4av8JTL

 

टॅग्स :खरेदीऑनलाइनहोम रेमेडी