Join us

किचनमध्ये खूपच पसारा होतो? २५० रुपयांत घ्या 'या' वस्तू, किचन नेहमीच दिसेल टापटीप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2025 20:32 IST

Product Review For Kitchen Organizer: तुमच्या किचनमध्ये नेहमीच खूप पसारा दिसत असेल तर तुम्हाला 'या' काही गोष्टींची गरज आहे, हे समजून घ्या... 

ठळक मुद्दे या ऑर्गनायझरचं वैशिष्ट्य असं की खूपच कमी जागेत तुम्ही त्यामध्ये जास्तीतजास्त वस्तू अगदी छान लावून ठेवू शकता.

आपल्या स्वयंपाकघरात असंख्य वस्तू असतात. वेगवेगळे मसाले, लोणचे, चटण्या, डाळी, वेगवेगळे धान्य असं काय काय ठेवलेलं असतं. आता एवढं सगळं जिथे असतं तिथे पसारा होणारच. म्हणूनच तर गरज असते तो सगळा पसारा व्यवस्थित मांडून ठेवण्याची. पण नेमकं असं होतं की आपल्या स्वयंपाकघरात सामान ठेवायला पुरेशा वस्तूच नसतात. म्हणूनच आता काही किचन ऑर्गनायझर बघा आणि स्वयंपाक घरातल्या वस्तू व्यवस्थित मांडून ठेवा. या ऑर्गनायझरचं वैशिष्ट्य असं की खूपच कमी जागेत तुम्ही त्यामध्ये जास्तीतजास्त वस्तू अगदी छान लावून ठेवू शकता. त्यामुळे स्वयंपाकघर नेहमीच टापटीप आणि आवरलेलं, नेटकं दिसतं. (Product Review for kitchen organiser)

स्वस्तात मस्त किचन ऑर्गनायझर

 

१. Cri8Hub Stainless Steel Kitchen Rack

हे एक छानसं सुटसुटीत रॅक पाहा. या रॅकला दोन कप्पे आहेत. पण तरीही त्यात तुम्ही जवळपास ४ प्रकारच्या वेगवेगळ्या आकाराच्या बरण्या ठेवू शकता. हे रॅक स्टीलचं असल्यामुळे खूप दणकट आहे. त्यामुळे ते बरंच ओझं सहन करू शकतं. हे रॅक २० सेमी लांब आणि २५ सेमी उंच आहे. 

किंमत आणि रेटींग

हे रॅक सध्या २८५ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत असून त्याला ग्राहकांकडून 4 स्टार मिळाले आहेत. 

Click To Buy: https://amzn.to/3CgoCkk

 

 

२. Satpurush Kitchen Organizer Rack

स्वयंपाक घरातल्या वस्तू व्यवस्थितपणे मांडून ठेवण्यासाठी हे एक दुसरे रॅक पाहा. या रॅकला दोन कप्पे आहेत. पण खालची फळी थोडी उंचावर असल्याने तुम्ही त्यात ३ टप्प्यांत सामान ठेवू शकता हा त्याचा आणखी एक फायदा आहे. हे रॅक ॲलॉय स्टीलचे असून ते १५ सेमी लांब तर १७ सेमी उंच आहे.

किंमत आणि रेटींग

या दोन रॅकचा सेट सध्या २९९ रुपयांना ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळत असून त्याला ग्राहकांकडून 4 स्टार मिळाले आहेत.

Click To Buy:https://amzn.to/4gcuwAK

 

टॅग्स :खरेदीकिचन टिप्स