Join us

स्लायडिंग विंडो ट्रॅकसह घरातला कानाकोपरा स्वच्छ करणारा ब्रश- १४० रुपयांत सगळं घर होईल चकाचक.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2025 09:20 IST

Product Review for JICOOT Plastic Gap Cleaning Brush: जिथे जिथे तुमचा हात पोहोचू शकत नाही, तिथे तिथे हा ब्रश पोहोचतो आणि तुमचं सगळं घर अगदी लख्खं करून टाकतो..

ठळक मुद्देफक्त १४० रुपयांत येणारी ही खास वस्तू घेऊन टाका आणि सगळं घर घासून पुसून लख्खं करा. बघा ती वस्तू नेमकी कोणती आणि कुठून खरेदी करायची..

आपण तर अगदी रोज घर आवरतो. गरज पडेल तेव्हा घरातली कित्येक ठिकाणं धुवून पुसून अगदी स्वच्छ करून टाकतो. पण तरीही आपल्या घरातल्या अशा काही जागा असतात ज्या स्वच्छ करणं खूपच अवघड जातं. किंवा त्या जागा एवढ्या चिंचोळ्या असतात की आपला हात त्याठिकाणी पोहोचूच शकत नाही. उदाहरणार्थ आपल्या घरात असणाऱ्या स्लायडिंग खिडक्यांचा ट्रॅक, बेसिनच्या नळाच्या आजुबाजुला असणारी जागा. बाथरुमचे कोपरे, किचन ओट्याचे कोपरे अशा ठिकाणी मोठा ब्रश पोहोचू शकत नाही. त्यामुळे हे भाग कायम अस्वच्छ राहतात. त्यामुळे मग बाकीचं सगळं आवरूनही घर काही स्वच्छ वाटत नाही. म्हणूनच आता तुमच्या घराचा कानाकोपरा स्वच्छ करायचा असेल तर फक्त १४० रुपयांत येणारी ही खास वस्तू घेऊन टाका आणि सगळं घर घासून पुसून लख्खं करा. बघा ती वस्तू नेमकी कोणती आणि कुठून खरेदी करायची..(Product Review for JICOOT Plastic Gap Cleaning Brush)

 

JICOOT Plastic Gap Cleaning Brush

ऑनलाईन शॉपिंग साईटवर मिळणारा हा ब्रश तुम्ही खूप वेगवेगळ्या प्रकारे वापरू शकता.

हा ब्रश अतिशय बारीक असून त्याचे ब्रिसल्सही लहान आहेत. त्यामुळे कोपरे आणि घरातल्या अगदी चिंचोळ्या जागा स्वच्छ करण्यासाठी त्याचा खूप चांगला उपयोग होतो.

एवढीशी लवंग असते खूपच गुणकारी! फक्त १ लवंग रोज चावून खा- मिळतील ५ जबरदस्त फायदे

हा ब्रश दिसायला नाजूक असला तरी खूप मजबूत आहे. त्यामुळे त्याच्या मदतीने तुम्ही अगदी जोर लावून घरातले कोपरे स्वच्छ  करू शकता.

ब्रशचे हॅण्डल अशा पद्धतीने डिझाईन करण्यात आले आहे की जेणेकरून तुम्हाला तो व्यवस्थित पकडता येईल. बऱ्याचदा ब्रश पकडूनच हात दुखायला लागतो. असं या ब्रशच्या बाबतीत अजिबात होणार नाही.  

आलिया भट-कियारा अडवाणीची साडी ड्रेप करणारी एक्सपर्ट सांगतेय ५ टिप्स, साडी सुंदरच दिसणार!

किंमत आणि रेटींग

ऑनलाईन शॉपिंग साईटवर हा ब्रश १४० रुपयांना मिळत असून ग्राहकांकडूनही त्याला ४ स्टार मिळाले आहेत.

Click To Buy:

https://amzn.to/3CvGdEP

 

टॅग्स :खरेदीऑनलाइनस्वच्छता टिप्स