'मेदू वडा' दक्षिण भारतीय पदार्थांपैकीच एक खास पदार्थ... बाहेरच्या हॉटेल्समध्ये किंवा खास करून उडपी रेस्टॉरंट्समध्ये मिळणारा मेदू वडा पाहिला की, त्याचा गोल, जाळीदार आणि मध्यभागी छिद्र (Pointed spoon with hole) असलेला परफेक्ट गोलाकार शेप पाहून आपल्यालाही तसाच मेदू वडा घरी तयार करण्याची इच्छा होते. उडपी हॉटेलमध्ये मिळणारा गोल, मऊ आणि परफेक्ट शेपचा मेदू वडा पाहून अनेकदा आपण विचार करतो की, असा वडा घरी का होत नाही?(medu vada making tool).
घरी कितीही प्रयत्न केले तरी, मेदू वड्याला परफेक्ट गोल आकार देणे हे मोठे कठीण कामच असते. हाताने मेदू वड्याला परफेक्ट गोल आकार देताना पीठ हाताला चिकटते आणि तो आकार बिघडतो. इतकंच नाही तर अनेकदा वेगवेगळ्या प्रकारे प्रयत्न करुनही मेदू वड्याला हवा तसा परफेक्ट गोल आकार येत नाही. परंतु आता आपण घरच्याघरीच, विकत सारखा परफेक्ट गोल आकाराचा मेदू वडा घरीच तयार करु शकतो. बाजारांत किंवा अनेक शॉपिंग साईट्सवर सहज उपलब्ध असणारा 'मेदू वडा स्पेशल चमच्याच्या' (Medu Vada Special Spoon) मदतीने तुम्ही घरच्या घरी अगदी उडपीसारखे वडा तयार करू शकता. या चमच्यामुळे वड्याचा आकार एकसारखा राहतो, मिश्रण हाताला चिकटत नाही आणि बनवण्याची प्रक्रिया झटपट होते. या खास चमच्याचा वापर करून तुम्ही अगदी सहजपणे (perfect shape medu vada maker spoon) आणि कमी वेळेत, कोणत्याही कौशल्याशिवाय अगदी उडप्याकडे मिळतो तसा आणि प्रत्येकवेळी एकसारखाच मेदू वडा तयार करू शकता.
आता घरच्याघरीच करा विकतसारखाच परफेक्ट गोलाकार शेपचा मेदू वडा...
बाजारात किंवा ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर उपलब्ध असलेला मेदू वडा स्पेशल चमच्याच्या मदतीने, आपण घरीच परफेक्ट शेपचा गोलाकार मेदू वडा तयार करु शकतो. हा मेदू वडा तयार करण्यासाठीचा चमचा लाकडापासून तयार केलेला असतो. हा चमचा आपल्या नेहमीच्याच इतर चमच्यांप्रमाणेच असतो फक्त या चमच्याच्या बरोबर मध्यभागी एक गोलाकार छिद्र असते, ज्याच्या मदतीने आपण मेदू वड्याला अगदी परफेक्ट गोलाकार आकार देऊ शकतो.
घरीच करा उडपी हॉटेलसारखी परफेक्ट चटणी! चव इतकी भारी की, डोसा- वडा- इडली होईल फस्त...
या चमच्याच्या पुढील सपाट पृष्ठभागावर मेदू वाड्याचे तयार पीठ ठेवून त्याला हलकेच हाताने गोलाकार आकार द्यावा. त्यानंतर जिथे बरोबर मधोमध छिद्र आहे, त्या छिद्रात हलकेच बोटाने दाब द्यावा यामुळे तेवढ्या भागातील पीठ छिद्रांतून पडते आणि मेदू वड्याला परफेक्ट गोलाकार आकार देणे सहज शक्य होते. या चमच्याच्या मदतीने आपण मेदू वड्याला परफेक्ट गोलाकार आकार देण्याचे किचकट काम अगदी सहज व झटपट करु शकतो.
उडपी 'अण्णा' स्टाईल पांढरीशुभ्र चटणी! परफेक्ट चवीसाठी ७ टिप्स - डोसा, वडा, इडली खा मनसोक्त...
किंमत आणि रेटिंग...
मेदू वडा तयार करण्यासाठीचा हा खास चमचा आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकतो. या मेदू वडा मेकर स्पूनला ला ५ पैकी ४.४ स्टार इतके रेटिंग देण्यात आले आहे, तर आत्तापर्यंत ५० पेक्षा अधिक लोकांनी हा चमचा विकत घेतला आहे. या मेदू वडा मेकर स्पूनची किंमत १,४९८ रुपये इतकी आहे. असा हा खास मेदू वडा मेकर स्पून खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://amzn.to/42ZI92x
