आपल्या सगळ्यांच्याच किचनमध्ये एक कॉमन असा मसाल्यांचा डबा असतोच. या डब्यांत आपण रोजच्या वापरातील मसाले तसेच फोडणीचे इतरही पदार्थ ठेवतो. साधारणतः हा फोडणीचा (Plastic Spice Rack Set) डबा गोलाकार स्टीलचा असतो. तसेच या डब्यात व्यवस्थित मावतील अशा गोलाकार छोट्या वाट्या असतात. या वाट्या डब्यात एकत्रित ठेवलेल्या असतात. अशा मसाल्यांच्या डब्यांत आपण जिरे, मोहरी, हळद, हिंग, लाल तिखट मसाला असे नेहमीच्या वापरातले (Spice Set Kitchen Storage & Containers) पदार्थ भरुन ठेवतो. परंतु या मसाल्याच्या एकाच मोठ्या डब्यांत अनेक पदार्थ एकाचवेळी भरुन स्टोअर केल्याने काहीवेळा सगळे पदार्थ एकत्रित होऊन एकमेकात मिसळतात(Buy Multipurpose Plastic Spice Rack Set).
इतकंच नाही तर घाई गडबडीच्या वेळी आपल्याकडून देखील अनेक पदार्थ या डब्यांतच सांडतात. तर कधी हा डबा हाताळताना चुकून डब्यातील वाट्या हलतात आणि मग सगळ्या पदार्थांची सरमिसळ होऊन भेळच होते. असा हा मसाल्याचा डबा मग आपल्याला वारंवार स्वच्छ करावा लागतो. यासाठीच असे होऊ नये म्हणून या मसाल्यांच्या डब्याऐवजी आपण नवीन स्टाइलच्या मल्टीपर्पज स्टँडचा वापर करु शकतो. रोजच्या घाई गडबडीत जर आपल्याकडून देखील या मसाल्याच्या डब्यांतील पदार्थांची सरमिसळ होत असेल, तर लागेचच हे मल्टीपर्पज स्टँड आपण खरेदी करु शकता.
किचन मल्टीपर्पज स्टँड....
किचनमध्ये वापरले जाणारे हे मल्टीपर्पज स्टँड एका विशिष्ट प्रकारचे रॅक आहे. या स्टँडला अटॅचड अशा वेगवेगळ्या बाटल्या असतात, त्या आपण गरजेनुसार काढू शकतो. हे मल्टीपर्पज स्टँड BPA फ्री फूड ग्रेड चांगल्या दर्जाच्या प्लॅस्टिकपासून तयार केले आहे. सोबतच हे स्टँड प्लॅस्टिकचे असले तरीही ते अनब्रेकेबल आहे. हे स्टँड ३६० डिग्री पूर्ण गोलाकार आकारात फिरते जेणेकरुन तुम्हांला हवा असलेला पदार्थ आपण कोणत्याही बाजूने स्टँड फिरवून अगदी सहजपणे झटपट काढू शकतो.
आता कढई -झारा विसरा, तळण्यासाठी फक्त ५०० रुपयांचं भांडं, कमीत तेलात होते तळण...
या स्टँडचा आकार देखील अगदी किचनमध्ये कुठेही व्यवस्थित फिट होईल असाच आहे. याचबरोबर, हे स्टँड मूव्हेबल असल्याने आपण अगदी सहजपणे ते कुठेही उचलून ठेवू शकतो. किचन कॅबिनेटमध्ये किंवा ओट्यावर सहजपद्धतीने हे स्टँड आपण ठेवू शकतो. हे स्टँड आपण डायनिंग टेबलवर देखील ठेवू शकतो. या स्टँडची स्वच्छता करणे देखील अतिशय सोपे आहे, स्पंज आणि लिक्विड सोप किंवा साबणाच्या मदतीने आपण हे स्वच्छ करु शकता.
तासंतास पुऱ्या लाटण्याची झंझटच विसरा! फक्त ९९ रुपयांत आणा 'पुरी कटर' - वेळखाऊ काम होईल पटकन...
या स्टँडला अटॅच असणाऱ्या बाटल्या पारदर्शक असल्याने आतील जिन्नस किती संपले आहेत हे लगेच समजू शकते. या एका स्टँडच्या सेटमध्ये एकूण १२ मध्यम आकाराच्या बाटल्या असतात. या बाटल्यांच्या वर गोलाकार पद्धतीने अडजेस्टेबल झाकण असते. आपल्या हवे तसे फिरवून आपण ते उघडू शकतो.
स्वयंपाकाच्या गॅसची करा बचत, फक्त विकत आणा 'ही' वस्तू; गॅस लवकर संपणार नाही...
किंमत आणि रेटिंग...
हे 'मल्टीपर्पज स्टँड' आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकते. या 'मल्टीपर्पज स्टँडला' ४.० इतके रेटिंग देण्यांत आले हे 'मल्टीपर्पज स्टँड' आपल्याला ६०० रुपयांपर्यंत सहज विकत मिळते. असे हे 'मल्टीपर्पज स्टँड' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://amzn.to/40Pztd9