Join us

कतरिना ते करिना, सगळ्या लाइटवेट साड्यांच्या प्रेमात! स्टायलिश 'कुल' साड्या आहेत तुमच्याकडेही?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 10, 2022 17:08 IST

Saree collection: उन्हाळ्यासाठी लाईटवेट साड्यांचं (light weight saree for summer) कलेक्शन करणं सुरू केलं असेल तर मग या स्टायलिश साड्या तुम्ही बघायलाच पाहिजेत....

ठळक मुद्देसाड्यांची आवड असेल आणि खास समर स्पेशल साडी  खरेदी करणार असाल, तर या अभिनेत्रींच्या कुल- कुल लाईटवेट साड्या एकदा बघाच.. 

सध्या वातावरणात गारवा, थंडी असली तरी ही थंडी आता थोड्याच दिवसांची पाहूणी आहे.. लवकरच थंडीचा  मौसम आपल्याला बाय बाय करणार असल्याने थंडीचे कपडे आणि विंटर कलेक्शन कपाटात ठेवून देण्याची  आणि उन्हाळ्यासाठी नवा स्टॉक खरेदी करण्याची वेळ आली आहे.. उन्हाळ्यात जाड जड आणि जाड कपडे  अजिबात सहन होत नाहीत. म्हणूनच जर तुम्हाला साड्यांची आवड असेल आणि खास समर स्पेशल साडी  खरेदी करणार असाल, तर या अभिनेत्रींच्या कुल- कुल लाईटवेट साड्या एकदा बघाच.. 

 

१. करिना कपूरची (Kareena Kapoor) ही साडी अतिशय स्टायलिश लूक देणारी आहे. पिस्ता कलरची ही साडी उर्वशी सेठी यांच्या Picchika saree या ब्रॅण्डची आहे.. साडी वजनाने अतिशय हलकी असून ही साडी ऑर्गेंझा प्रकारातली आहे.. त्यावरचं मोठ्या- मोठ्या पानांचं आणि फुलांचं प्रिंट हॅण्डमेड असून ती करिनासाठी खास कस्टामाईज केलेली आहे. एखादं लग्न, रिसेप्शन, पार्टी यासाठी  तुम्ही अशा प्रकारची लाईटवेट साडी नक्कीच नेसू शकता.. 

 

२. अभिनेत्री दीपिका पदुकोन (Dipika Padukon) हिने नेसलेली ही पर्ल व्हाईट रंगाची साडी सब्यासाची कलेक्शनची आहे.. उन्हाळ्यात नेसण्यासाठी या साडीएवढा दुसरा कुल प्रकार नाही... साडी लव्हर असाल तर अशी एखादी साडी तुमच्य वॉर्डरोबमध्ये असायलाच हवी. हिरव्या रंगाची नाजुक फुलं असणाऱ्या या साडीवर तुम्ही कोणती ज्वेलरी आणि कसे ब्लाऊज घालता यावर ही साडी ऑफिसवेअर ठेवायची की पार्टी वेअर ठेवायची, हे तुम्ही ठरवू शकता.. एवढी ही साडी कोणत्याही लूकसाठी परफेक्ट आहे..

 

३. कतरिना कैफ (Katrina Kaif) हिने नेसलेली साडी लाईटवेट तर आहेच, पण जवळजवळ ट्रान्सपरंट प्रकारात मोडेल अशी आहे.. ही साडी तुम्ही उन्हाळ्यासाठी नक्कीच निवडू शकता.. ही साडी पुर्णपणे पार्टीवेअर आहे. त्यामुळे उन्हाळ्यात जर एखादं लग्न किंवा एखादं संध्याकाळचं रिसेप्शन असेल, तर त्यासाठी अशा प्रकारच्या एखाद्या साडीची निवड परफेक्ट ठरू शकते.  

 

टॅग्स :खरेदीसेलिब्रिटीकरिना कपूरकतरिना कैफसमर स्पेशलफॅशन