केळी म्हणजे गरिबांचं सुपरफूड. कारण काेणत्याही महागड्या पदार्थांमधून जे पोषण मिळतं ते केळीमधूनही भरभरून मिळतं. केळी बाराही महिने मिळतात आणि इतर फळांच्या तुलनेत स्वस्त असतात. केळीतून कार्बाेहायड्रेट्स, फायबर, कॅलरी, पोटॅशियम, व्हिटॅमिन सी, प्रोटीन्स, ॲण्टीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात मिळतात. पण एवढे सगळे पौष्टिक घटक देऊनही केळी आरोग्यासाठी बऱ्याचदा घातक ठरू शकते जर ती कार्बाइड वापरून पिकवलेली असेल तर.. अशी केळी खाणं आरोग्यासाठी धोकादायकच आहे. म्हणूनच कार्बाइडमध्ये पिकवलेली केळी कोणती आणि नैसर्गिक पद्धतीने पिकवलेली केळी कोणती यांच्यातला फरक ओळखू यायला हवा. त्यासाठीच या काही टिप्स बघा आणि व्यवस्थित पाहून केळी घ्या.(How to identify ripe bananas with calcium carbide?)
कार्बाइडमध्ये पिकवलेली केळी कशी ओळखावी?
१. जर केळीवर पांढरट रंगाचा एखादा डाग दिसत असेल तर ती केळी घेऊ नये. ती केळी कार्बाइडमध्ये पिकवलेली असू शकते.
गोकर्णाला भरपूर फुलं येण्यासाठी ५ टिप्स- निळ्याशार फुलांनी बहरून जाईल बाल्कनीतली कुंडी
२. जर केळीच्या सालांचा रंग चमकदार पिवळा आणि अगदी स्वच्छ दिसत असेल तर ती केळी घेणं टाळावं.
३. केळी घेताना देठाचं बारकाईने निरिक्षण करा. जर केळीचं साल चमकदार पिवळं असेल आणि देठांचा रंग हिरवट असेल तर ते केळ कार्बाइडमध्ये पिकवलेलं असतं. कारण नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या केळीच्या देठाचा रंग काळपट असतो.
४. काही अभ्यासक असंही सांगतात की जर तुम्ही कार्बाइडमध्ये पिकवलेल्या केळीचं साल पाण्यामध्ये टाकलं तर ते पाण्यावर तरंगतं. पण त्याउलट नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या केळीचं साल मात्र पाण्यात टाकल्यावर काही वेळातच भांड्याच्या तळाशी जातं.
मेनोपॉज जवळ आला कसं ओळखायचं? बहुतांश महिलांना पस्तिशीतच दिसू लागतं 'हे' पहिलं लक्षण
५. नैसर्गिक पद्धतीने जी केळी पिकवलेली असते तिला मंद सुगंध असतो. पण रसायनांचा वापर करून पिकवलेल्या केळीला कोणताही गंध नसतो.
६. नैसर्गिक पद्धतीने पिकवलेल्या केळीवर काळसर डाग असतात. तर रसायनांमध्ये पिकवलेली केळी डागविरहीत असते.