Join us  

माठ विकत आणताना तपासून घ्या ३ गोष्टी, पाणी होईल फ्रिजसारखं गारेगार- करा पैसावसूल खरेदी 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 02, 2024 11:59 AM

How To Choose Perfect Matka Or Math For Summer: उन्हाळ्यासाठी माठाची खरेदी करणार असाल तर या काही गोष्टी तपासून घ्या. जेणेकरून तुमची माठाची खरेदी अगदी परफेक्ट होईल. (Math or matka shopping for summer)

ठळक मुद्देबऱ्याचदा असं होतं की नव्या माठातलं पाणी काही थंडच होत नाही. किंवा तो माठ खूप जास्त झिरपू लागतो.

उन्हाळ्याची चाहूल लागली की सगळ्यात आधी आठवण येते ती गारेगार पाणी देणाऱ्या माठाची. भर उन्हातून जेव्हा आपण घरी येतो, तेव्हा माठातलं थंडगार पाणी प्यायल्याशिवाय काही समाधान होत नाही. फ्रिजमधलं पाणी कितीही गार असलं तरी त्याला काही माठाच्या पाण्याची सर नाही. त्यामुळे उन्हाळ्यात आपण आवर्जून माठ आणतो (Math or matka shopping for summer). पण बऱ्याचदा असं होतं की नव्या माठातलं पाणी काही थंडच होत नाही. किंवा तो माठ खूप जास्त झिरपू लागतो. असं काहीही आपल्या माठासोबत होऊ नये आणि गारेगार पाणी देणाऱ्या परफेक्ट माठाची पैसा वसूल खरेदी व्हावी, यासाठी माठ विकत आणताना या काही गोष्टी तपासून घ्या. (How to choose perfect matka or math for summer)

माठ खरेदी करताना कोणत्या गोष्टी तपासून घ्याव्या?

 

माठ खरेदी करताना कोणत्या गोष्टी व्यवस्थित पाहून घ्याव्या, याची माहिती Sarita's Kitchen या यु ट्यूब चॅनलवर शेअर करण्यात आली आहे. 

बटाट्याचे चिप्स लालसर- काळे पडतात?८ खास टिप्स, पांढरेशुभ्र होतील वेफर्स-वर्षभर टिकतील

१. यामध्ये सांगितलेली सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे माठ नेहमी लाल किंवा काळ्या रंगाचाच घ्यावा. बाजारात डिझाईन्स असणारे जे पांढरे माठ मिळतात, ते घेणं टाळावं. कारण ते तयार करताना त्यामध्ये खूप केमिकल्स वापरलेले असतात.

 

२. माठ आणण्यासाठी नेहमी दिवसाउजेडी जा. माठ घेताना तो उन्हाच्या दिशेने वर धरा. त्यात काही छेद आहे का किंवा तडा गेला आहे का हे लगेच दिसेल.

चिंच- गुळाची आमटी! तेच ते नेहमीचं वरण खाऊन कंटाळा आल्यास करा आंबट- गोड बेत

३. माठ चांगला भाजून पक्का झालेला असेल तरच त्यात थंड पाणी होतं. त्यामुळे माठ घेताना तो उलटा करून वाजवून पाहा. तो हलका आहे असं जाणवलं तर तो चांगला भाजला गेलेला नाही हे ओळखावं. वाजवून पाहिल्यावर मजबूत किंवा जाडसर वाटणारा आवाज आला तर तो माठ घ्यावा.

 

टॅग्स :खरेदीसमर स्पेशलसमर स्पेशल शॉपिंगपाणी