Join us  

दिवाळीत भेट म्हणून महागडे ड्रायफ्रूट्स पॅक भेट देता ? खरेदी करताना ५ गोष्टी तपासा - फसवणूक टाळा...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 02, 2023 5:57 PM

Planning to celebrate Diwali with dry fruits ? Here’s what you should know : ड्रायफ्रुट्स खरेदी करताना आपली किंवा आपल्या प्रियजनांची फसवणूक होऊ नये यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

दिवाळी सण (Diwali Festival 2023) म्हटला की सगळीकडेच आनंद व उत्साहाचे वातावरण असते. या सणानिमित्त घरात वेगवेगळे गोडाधोडाचे पदार्थ बनवले जातात. या खास पदार्थांसोबतच दिवाळीत बनवल्या जाणाऱ्या फराळाला विशेष महत्व असते. दिवाळीत फराळाचे पदार्थ, मिठाया, सुकामेवा किंवा इतर पदार्थ (the ultimate guide to selecting the perfect diwali dryfruits) खाऊन आपल्या परिवार व मित्र - मैत्रिणींसोबत हा सण आपण आनंदात घालवतो. दिवाळी सणाचे निमित्त साधून आपण जवळच्या नातेवाईक किंवा मित्र परिवाराला आवर्जून भेटतो. एकमेकांच्या घरी जाऊन भेटीगाठी करणे दिवाळीच्या शुभेच्छा देणे हे ओघाने आलंच. असे असताना कुणाच्याही घरी जाताना सणानिमित्त रिकामी हात न जाता आपण काहीतरी गिफ्ट्स किंवा खाऊ नक्की घेऊन जातो(What should you look for when buying dry fruit during diwali festival). 

मुळात दिवाळी हा सणच एकमेकांना भेटून आनंद साजरा करण्याचा व भेटवस्तू देण्याचा असतो. साधारणतः आपण कुणाच्याही घरी भेट देताना फराळ, मिठाई, फळे किंवा सुकामेवा (Dry Fruits Gift Packs: The Perfect Diwali Gift) घेऊन जाणे पसंत करतो. सध्या बाजारात वेगवेगळ्या आकारात आणि सुंदर पॅकेजिंगमध्ये ड्रायफ्रुट्स (Festival Dry Fruits Gift Packs) विक्रीला ठेवलेले दिसतात.    सणासुदीच्या काळात मित्र-मैत्रिणींना, नातेवाईकांना भेट स्वरुपात हे ड्रायफ्रुट बॉक्स देण्याचा ट्रेंड सध्या सुरू आहे. याचबरोबर दिवाळी दरम्यान सारखेच गोड पदार्थ खाऊन कंटाळा येतो, यासाठी मिठाईला पर्याय म्हणून ड्रायफ्रुट्स (Diwali Special: Dry Fruits And Nuts To Prepare A Gift Box) महत्त्वाचे ठरतात. दिवाळीच्या काळात मोठ्या प्रमाणात खरेदी होत असल्याने सुक्यामेव्यातही भेसळीचे () प्रमाण वाढलेले दिसून येते. अशावेळी ड्रायफ्रुट्स खरेदी करताना आपली किंवा आपल्या प्रियजनांची फसवणूक होऊ नये यासाठी काही गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत(How to choose good quality dry fruits during diwali festival).

ड्रायफ्रुट्स खरेदी करताना कोणत्या गोष्टी लक्षात ठेवाव्यात ? 

१. ड्रायफ्रुट्सचा रंग तपासून पहा :- चांगले ड्रायफ्रुट्स खरेदी करण्याचा सर्वात सोपा मार्ग म्हणजे त्याचा रंग तपासणे. जर ड्रायफ्रुट्सचा रंग त्याच्या नैसर्गिक रंगापेक्षा जास्त गडद असेल तर, याचा अर्थ असा की ते ड्रायफ्रुट खराब झाले आहेत. त्यामुळे गडद रंग असणारे ड्रायफ्रुट्स खरेदी करू नये.

२. ड्रायफ्रुट्स खाऊन बघा :- जर ड्रायफ्रुट्स काही वेळ पाण्यात ठेवून नंतर सुकवले तर, ते चावण्यास कडक होतात. याचाच अर्थ असा की ते ड्रायफ्रुट्स खूप जुने असून, नव्याने विकण्याकरता फ्रेश असल्याचे भासवले जात आहे. असे ड्रायफ्रुट्स खाणे आपल्या आरोग्यासाठी हानिकारक ठरते. 

चकली भाजणी करण्याचे हे घ्या परफेक्ट प्रमाण ! चकली चुकूनही बिघडणार नाही, फसणार नाही...

दिवाळीत खा - खा फराळ खाऊन वजन वाढू नये म्हणून लक्षात ठेवा या ६ गोष्टी, खा पोटभर...

३. वास घेऊन पहा :- ड्रायफ्रुट्स खरेदी करताना त्याचा वास घेऊन नक्की पाहा. जर त्यांना उग्र वास येत असेल तर ते ड्रायफ्रुट्स जुने आहेत असे समजावे. याचबरोबर जर असे ड्रायफ्रुट्स योग्य ठिकाणी ठेवले नाहीत तर त्यात ओलावा निर्माण होतो आणि त्यातून कुबट वास येऊ लागतो. अशावेळी या ड्रायफ्रुट्समध्ये अळी अथवा बुरशीजन्य घटक तयार होऊ शकतात. त्यामुळे असा सुकामेवा खाणे आरोग्यासाठी हानिकारक ठरू शकतो.

शांत झोप आणि सुंदर व्हा ! ब्यूटी स्लिपचा घ्या निवांत फॉर्म्युला, चेहऱ्यावर येईल चमचमता ग्लो चकटफू...

दाणेदार - रवाळ तोंडात टाकताच विरघळणारे बेसन लाडू बनवण्यासाठी ९ टिप्स, लाडू होतील परफेक्ट...

४. पॅकेजिंग तारीख :- बहुतेक लोक स्थानिक दुकानदारांकडून सुटे ड्रायफ्रुट्स खरेदी करतात. अशा पॅकेट्सवर तारीख दिलेली नसते. अशावेळी ते ड्रायफ्रुट्स खाण्यास योग्य की अयोग्य हे ठरवणे कठीण होते. त्यामुळे एफएसएसएआय मार्गदर्शक तत्त्वे निर्देशित असणारे ड्रायफ्रुट्सच नेहमी खरेदी करावेत. अशा पॅकेटवर मॅन्युफॅक्चरिंग व एक्स्पायरी तारीख लिहिलेली असते, जेणेकरून काही चुकीचे वाटल्यास ग्राहक मंचाकडे जाऊन तक्रार करता येते.

५. पॅकेटवरील माहिती :- ड्रायफ्रूटचे पॅकेट विकत घेतेवेळी त्यामागील छापील माहिती नक्की वाचा. जर त्यामध्ये कुठल्याही प्रकारच्या प्रिझर्व्हेटिव्हचे नाव लिहिले गेले असेल तर, ते ड्रायफ्रुट्स खरेदी करु नका.

टॅग्स :दिवाळी 2023खरेदीअन्नगिफ्ट आयडिया