अनेकदा आपण काही खास - विशेष असले की गोडधोड पदार्थ घरी करतो. गोड पदार्थ करायचे म्हटलं की आपण त्यात ड्रायफ्रुटसचे काप घालतोच. गाजर हलवा, खीर, शिरा किंवा इतर असे कोणतेही गोड पदार्थ केले की त्यात ड्रायफ्रुटसचे काप घातल्याने चव अधिक चांगली येते. परंतु असे गोडाधोडाचे पदार्थ तयार करण्याआधी आपण पूर्वतयारी म्ह्णून ड्रायफ्रुटसचे काप (Dry Fruit Cutter) किंवा बारीक तुकडे करुन घेतो.
ड्रायफ्रुटसचे काप किंवा बारीक तुकडे करण्यासाठी आपण सूरी, किसणी किंवा थेट मिक्सरचा वापर करतो. परंतु काहीवेळा ड्रायफ्रुटसचे काप करताना सूरी वापरली तर हाताला लागण्याची (How To Assemble & Use Dry Fruit Cutter) शक्यता असते. याचबरोबर किसणीवर बोट देखील चिरण्याची भीती असतेच, आणि मिक्सरच्या भांड्याचा वापर केला तर ड्रायफ्रुटसच्या कडकपणामुळे मिक्सरचं ब्लेड बोथट किंवा खराब होण्याची शक्यता असते. एवढचं (How To Slice Dry Fruits On Dry Fruit Cutter) नाही तर कधी चक्क मिक्सर देखील बिघडू शकतो. यासाठी झटपट ड्रायफ्रुटसचे काप किंवा बारीक तुकडे करण्यासाठी आपण एका खास विकत मिळणाऱ्या ड्रायफ्रूट कटरचा वापर करु शकतो. ड्रायफ्रूट कटर म्हणजे काय, त्याचा वापर कसा करायचा यासगळ्याबद्दल अधिक माहिती पाहूयात.
ड्रायफ्रूट कटर म्हणजे नेमकं काय ?
'ड्रायफ्रूट कटर' हे एक छोटं खास करुन ड्रायफ्रुट्सचे काप किंवा बारीक तुकडे करण्याच भांड असत. या 'ड्रायफ्रूट कटर' च्या मदतीने आपण अगदी पटकन मिनिटभरात 'ड्रायफ्रुटसचे काप' किंवा बारीक तुकडे करु शकतो. हे भांड अतिशय लहान आणि सहज बॅगेत भरुन कुठेही नेता येईल इतक्या लहान आकाराचे असते.
चपाती लाटताना पीठ ओट्यावर फार सांडते? ही 'फ्लावर डस्टर' आयडिया पाहा, ओट्यावर पसारा होतच नाही...
या भांड्याच्या तळाशीही एक विशेष आधी तीन पात्यांची खास ब्लेड बसवलेली असते. हे भांड ३ प्रमुख पार्ट्समध्ये विभाजित होऊन येत. आपण या भांड्याचे तिन्ही भाग अगदी सहज पद्धतीने जोडूही शकतो . याचबरोबर, या भांड्याची स्वच्छता करणे देखील अतिशय सोपे जाते. सहज जोडता किंवा काढता येत असल्याने घरातील लहानांपासून ते मोठ्यांपर्यंत सगळेच वापरु शकतात, असे युजर फ्रेंडली असणार हे कटर आहे.
तासंतास पुऱ्या लाटण्याची झंझटच विसरा! फक्त ९९ रुपयांत आणा 'पुरी कटर' - वेळखाऊ काम होईल पटकन...
आपल्याला फक्त या कटरचे मुख्य तीन भाग एकमेकांमध्ये व्यवस्थित बसवून घ्यायचे आहेत. त्यानंतर, या कटरमध्ये आपल्या आवडीनुसार ड्रायफ्रूट्स घालायचे आहेत, मग वरुन या कटरचे झाकण लावून फक्त गोलाकार पद्धतीने फिरवायचे आहे. जसजसे आपण गोलाकार फिरवत जाऊ तसे या भांड्याच्या खालच्या बाजूने ड्रायफ्रुटसचे काप पडायला सुरुवात होते. इतक्या सहज सोप्या पद्धतीने आपण पटकन ड्रायफ्रुट्सचे काप करुन घेऊ शकतो. ड्रायफ्रुटसचे काप करण्यासाठी आपण किसणी, सूरी किंवा मिक्सरच्या भांड्याचा वापर न करता देखील अगदी झटपट आणि सहजसोप्या पद्धतीने हे काप करु शकतो.
आता सुई - धाग्याशिवाय बटण शिवण झालं सोपं ! तुटलेलं बटण लावा मिनिटभरात - स्वस्तात मस्त उपाय...
स्वयंपाकाच्या गॅसची करा बचत, फक्त विकत आणा 'ही' वस्तू; गॅस लवकर संपणार नाही...
किंमत आणि रेटिंग...
हे 'ड्रायफ्रूट कटर' आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकते. या 'ड्रायफ्रूट कटरला ३.९ इतके रेटिंग देण्यांत आले असून आत्तापर्यंत १००० पेक्षा अधिक लोकांनी हे 'ड्रायफ्रूट कटर' विकत घेतले आहे. हे 'ड्रायफ्रूट कटर' ६० रुपयांपासून ते २०० रुपयांपर्यंत विकत मिळतात. असे हे 'ड्रायफ्रूट कटर' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा.https://amzn.to/3Q6s8ks