Join us

Diwali 2021 : भाऊबीज, पाडव्यासाठी बहिणीला, बायकोला काय गिफ्ट द्यावं? मग हे ऑप्शन्स नक्की ट्राय करा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 18:54 IST

Diwali 2021 : करीना कपूर ने बनारसी सिल्क पासून बनलेला शरारा निवडला. हा ब्रोकेड बनारसी शरारा त्याच्या कॉन्ट्रास्ट सिल्क ओढणीमूळे सुंदर दिसला.

दिवाळीची! भाऊबीज, पाडव्यासाठी बहिणीला, बायकोला काय गिफ्ट द्यावं असा प्रश्न तुम्हाला नक्कीच पडला असेल ना? पर्स, परफ्युम देऊ कि  कुठला ड्रेस देऊ? बरं ड्रेस मध्ये सुद्धा टॉप कि कुर्ता? तर यावेळी ड्रेस मध्ये काहीतरी वेगळं असं द्या! हमखास आवडेल, वापरात येईल असा शरारा हा नक्कीच एक ट्रेंडी, स्टायलीश गिफ्ट ठरू शकेल (Bhaubeej Gift 2021)

शरारा चे वैशिट्य हे त्याच्या पॅन्ट किंवा सलवार च्या स्टाईल मध्ये आहे. हा पलाझो सारखा लूज आणि कॉमोर्टेबल असतो. काही वेळा शरारा पॅन्ट ला गुडग्या पर्यंत घट्ट आणि आणि पुढे चुण्या करून घेर दिला जातो. यावर शॉर्ट कुर्ता आणि ओढणी वापरली जाते. 

गणेश उत्सवात सोशल मीडिया वर बऱ्याच सेलेब्स नी आपले पारंपारिक लूक मधले फोटोज पोस्ट केले, त्यावरून हे नक्कीच दिसतं की ब्राईट रंग, कॉन्ट्रास्ट,  ब्रोकेड, जरी काम हे टट्रेंड मध्ये आहेत तर स्टाईल्स मध्ये अनारकली बरोबरच शरारा पसंतीस येऊ लागलाय. 

करीना कपूर ने बनारसी सिल्क पासून बनलेला शरारा निवडला. हा ब्रोकेड बनारसी शरारा त्याच्या कॉन्ट्रास्ट सिल्क ओढणीमूळे सुंदर दिसला. त्यावर वापरलेले मोठे कानातले, पायात राजस्थानी  मोजडी शरारा ला एकदम साजेशी ठरली. करीनाने  हा लूक स्टायलिश पोटली वापरून  पूर्ण केला. 

अनन्या पांडे हे नाव हल्लीच आपल्या कानावर येऊ लागलंय. अपकमिंग स्टार समजल्या जाणारी अनन्या शरारा मध्ये सुरेख दिसली. प्रख्यात डिझायनर मनीष मल्होत्रा च्या कलेक्शन मधला हा शरारा त्यावरच्या अनोख्या अँटिक सिल्वर वर्क मुळे उठून दिसला.

श्रुती साठे 

टॅग्स :खरेदीदिवाळी 2021