Lokmat Sakhi >Shopping > पावसाळ्यात कॉटनचे कपडे घालावे की लिननचे? कपड्यांची खरेदी करताना लक्षात ठेवा तज्ज्ञांचा खास सल्ला

पावसाळ्यात कॉटनचे कपडे घालावे की लिननचे? कपड्यांची खरेदी करताना लक्षात ठेवा तज्ज्ञांचा खास सल्ला

Cotton Or Linen?: पावसाळ्यात किंवा एरवीही वर्षभर कोणते कपडे घालणं अधिक आरोग्यदायी असतं, याविषयी आयुर्वेदतज्ज्ञांनी दिलेला हा खास सल्ला एकदा बघाच.... (which  fabric is most suitable for indian skin type as per ayurveda)

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 10, 2024 11:42 AM2024-06-10T11:42:35+5:302024-06-10T11:43:19+5:30

Cotton Or Linen?: पावसाळ्यात किंवा एरवीही वर्षभर कोणते कपडे घालणं अधिक आरोग्यदायी असतं, याविषयी आयुर्वेदतज्ज्ञांनी दिलेला हा खास सल्ला एकदा बघाच.... (which  fabric is most suitable for indian skin type as per ayurveda)

cotton or linen? which  fabric is most suitable for indian skin type as per ayurveda, which fabric is most comfortable for monsoon or rainy season | पावसाळ्यात कॉटनचे कपडे घालावे की लिननचे? कपड्यांची खरेदी करताना लक्षात ठेवा तज्ज्ञांचा खास सल्ला

पावसाळ्यात कॉटनचे कपडे घालावे की लिननचे? कपड्यांची खरेदी करताना लक्षात ठेवा तज्ज्ञांचा खास सल्ला

Highlightsकॉटन किंवा लिनन यापैकी कोणते कपडे वापरावेत याविषयी आयुर्वेद तज्ज्ञांनी दिलेली माहिती chitchatrajlavi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

हल्ली कपडे कित्येक प्रकारच्या वेगवेगळ्या फ्रॅब्रिकमध्ये उपलब्ध असतात. पॉलिस्टर, सिल्क, रेयॉन असे अनेक प्रकारचे कपडे बाजारात मिळतात. यातलं सिल्क सोडलं तर बाकीचे कपड्यांचे प्रकार कॉटन किंवा लिननपेक्षा तुलनेने कमी किमतीत मिळतात. त्यामुळे बऱ्याचदा आपण ते घेण्यास प्राधान्य देतो. पण या कपड्यांमुळे बरेच आजार जडू शकतात. खासकरून ज्यांची त्वचा खूप सेंसिटीव्ह आहे त्यांच्यासाठीही ते खूपच त्रासदायक ठरू शकतात. हे आजार वरवर पाहता आपल्या लक्षात येत नसले तरी कपड्यांचं फॅब्रिकही आरोग्यासाठी नुकसानदायी ठरू शकतं असा सल्ला आयुर्वेदतज्ज्ञ देत आहेत. (which  fabric is most suitable for indian skin type as per ayurveda)

 

कॉटन की लिनन? कपड्याचा कोणता प्रकार अधिक चांगला?

कॉटन किंवा लिनन यापैकी कोणते कपडे वापरावेत याविषयी आयुर्वेद तज्ज्ञांनी दिलेली माहिती chitchatrajlavi या इन्स्टाग्राम पेजवर शेअर करण्यात आली आहे.

कॉटनचे कपडे कोणी घालावे?

व्हिडिओमध्ये दिलेल्या माहितीनुसार कॉटनचे कपडे हे त्वचेसाठी अतिशय मऊ, आरामदायी ठरतात. कॉटनच्या कपड्यांमध्ये आपल्या शरीरापर्यंत हवा थेट पोहाचते. म्हणजेच ते कपडे आपल्या त्वचेसाठी breathable असतात.

फक्त २ पदार्थ नियमितपणे खा आणि केसांची- त्वचेची काळजीच विसरा- आहारतज्ज्ञांचा खास सल्ला

त्यामुळे जवळपास प्रत्येकानेच कॉटनचे कपडे घालण्यास प्राधान्य दिले पाहिजे. ज्यांची त्वचा खूप संवेदनशील प्रकारात मोडते त्यांनी सुती कपडेच घालावेत. याशिवाय कॉटनच्या कपड्यांचा आणखी एक फायदा म्हणजे आयुर्वेदानुसार हे कपडे कफ, वात, पित्त या तिन्ही प्रकृतीच्या लोकांसाठी उत्तम मानले गेले आहेत. 

 

लिननचे कपडे कोणासाठी उत्तम आहेत?

कॉटनच्या तुलनेत लिननचा कपडा थोडा जाडसर आणि रखरखीत प्रकारात मोडणारा असतो. पण आयुर्वेदानुसार त्याचेही फायदे सांगण्यात आले आहेत. लिननचे कपडे घातल्यास शरीरातील रक्तप्रवाह सुरळीत होण्यास मदत होते.

वजन कमी करण्यासाठी आठवड्यातून किती दिवस, कोणता व्यायाम करावा? बघा तज्ज्ञांनी दिलेला सल्ला

ज्या लोकांना रात्री शांत झोप येत नाही अशा लोकांनी लिननचे कपडे घालावेत. अंथरुणावर झोपल्यावर चटकन आणि शांत झाेप लागेल. काही अभ्यासानुसार असं सिद्ध झालं आहे की इतर कोणत्याही फॅब्रिकपेक्षा लिनन कपड्याची हिलिंग पाॅवर जास्त आहे. त्यामुळे भारतीय लोकांच्या त्वचेसाठी लिनन आणि कॉटन हे दोन्ही प्रकारचे कपडे अतिशय उत्तम आहेत. 

 

Web Title: cotton or linen? which  fabric is most suitable for indian skin type as per ayurveda, which fabric is most comfortable for monsoon or rainy season

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.