>शॉपिंग > अनुष्का शर्माचा ९ हजार रुपयांचा सिझलिंग स्विम सूट! सुटीसाठी करा अशा स्विम सूटची खरेदी, ५ गोष्टी महत्त्वाच्या

अनुष्का शर्माचा ९ हजार रुपयांचा सिझलिंग स्विम सूट! सुटीसाठी करा अशा स्विम सूटची खरेदी, ५ गोष्टी महत्त्वाच्या

नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात हमखास कुठेतरी लांब फिरायला जाण्याचा प्लॅन करण्यात येतोच. ख्रिसमस, न्यू इयर यानिमित्ताने तुम्हीही बीचवर जाण्याचा प्लॅन करत असाल तर बीचवर घालण्यासाठी ट्रेण्डी आणि हॉट कपड्यांची थोडी शॉपिंग कराच..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 17, 2021 01:09 PM2021-11-17T13:09:52+5:302021-11-17T15:23:08+5:30

नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात हमखास कुठेतरी लांब फिरायला जाण्याचा प्लॅन करण्यात येतोच. ख्रिसमस, न्यू इयर यानिमित्ताने तुम्हीही बीचवर जाण्याचा प्लॅन करत असाल तर बीचवर घालण्यासाठी ट्रेण्डी आणि हॉट कपड्यांची थोडी शॉपिंग कराच..

Anushka Sharma's sizzling swim suit of Rs 9,000! Here are 5 important things to buy a swim suit for the holidays | अनुष्का शर्माचा ९ हजार रुपयांचा सिझलिंग स्विम सूट! सुटीसाठी करा अशा स्विम सूटची खरेदी, ५ गोष्टी महत्त्वाच्या

अनुष्का शर्माचा ९ हजार रुपयांचा सिझलिंग स्विम सूट! सुटीसाठी करा अशा स्विम सूटची खरेदी, ५ गोष्टी महत्त्वाच्या

Next
Highlightsस्विमसूट खरेदी करणार असाल तर या ५ गोष्टींची नक्कीच काळजी घ्या.

वर्षभर तेच तेच रूटीन, तेच ते घरातलं काम आणि ऑफिसचं टेन्शन अशा सगळ्या चक्रात अडकून जाम बोअर होऊन जातं. त्यामुळे दिवाळी झाली आणि जरा थंडीचा मौसम सुरू झाला की गाडी काढावी आणि लांब लांब फिरून यावं असं वाटू लागतं. म्हणूनच तर दिवाळीच्या सुट्ट्या आणि त्यानंतरचा सिझन म्हणजे ट्रॅव्हल मूड फुल्ल ऑन.... डिसेंबरचा इयर एण्ड आणि त्याआधी ख्रिसमस या सुट्ट्या तर अनेक जणांच्या हमखास ठरलेल्याच असतात. आता महाराष्ट्रातल्या लोकांना फार दुर जायचं नसेल आणि तरीही इयर एन्ड किंवा ख्रिसमस झकासपैकी एन्जॉय करायचं असेल, तर गोव्यासारखं दुसरं अफलातून ठिकाण नाही. 

 

तुम्हीही सुटीसाठी गोव्यासारख्या एखाद्या बिनधास्त बीचवर जाण्याचा प्लॅन करत असाल आणि त्यासाठी कपड्यांची खरेदी करणार असाल तर ही एक गोष्ट सगळ्यात आधी तुमच्या शॉपिंग लिस्टमध्ये लिहून टाका. ती गोष्ट म्हणजे स्विमसूट... येस, आता बीचवर जायचं म्हणजे तिथे घालण्यासारखे झकास कपडे आपल्याकडे हवेच ना.... त्याशिवाय बीचवर मजा तरी कशी येणार... स्विमसूट कसा निवडावा किंवा कसा घ्यावा, असा प्रश्न पडला असेल, तर एकदा बॉलीवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा हिने घातलेला स्विमसूट बघून घ्या.. तिच्या या स्विमसूटचे फोटो सध्या सोशल मिडियावर जबरदस्त व्हायरल झाले आहेत. तिचे फोटो पाहिल्यावर असा एखादा स्विमसूट आपल्याकडे हवाच, असं ही वाटू लागतं.

 

 तिचा हा स्विमसूट तब्बल ९ हजारांचा आहे. पण एवढा महाग स्विमसूट घ्यायचा नसेल, तर कमी किमतीत बाजारात कित्येक स्विमसूट उपलब्ध आहेत. त्यामुळे कमी किमतीत पण चांगला स्विमसूट तुम्ही नक्कीच घेऊ शकता. अनुष्काने जो स्विमसूट घातला आहे तो neon green रंगाचा आहे. म्हणजे आपल्या मराठीत सांगायचं झालं तर पोपटी रंगाचा हा स्विमसूट आहे. हा स्विमसूट अनुष्कावर जबरदस्त कॅची दिसत असून निळ्याशार पाण्याचा पोपटी रंग खूपच खुलून आला आहे. अनुष्काच्या या फोटोंना तिच्या चाहत्यांनी चांगलंच उचलून धरलं आहे. 


स्विमसूट खरेदी करताना आणि घालताना अशी काळजी घ्या ..... 
एखादे टॉप, जीन्स, कुर्ता किंवा साडी असे वेगवेगळे कपडे आपण आरामात खरेदी करू शकतो. पण स्विमसूट खरेदी करायच म्हटल्यावर थोडं दडपण येतं. एकतर असे कपडे अनेकजणी वारंवार घालत नाहीत. त्यामुळे अशा कपड्यांची निवड करताना अनेकजणी गरजेपेक्षा जास्त कॉन्शस होऊन जातात आणि मग शॉपिंग करताना सगळाच गोंधळ होतो. म्हणूनच तर स्विमसूट खरेदी करणार असाल तर या ५ गोष्टींची नक्कीच काळजी घ्या.
१. स्विमसूट पहिल्यांदाच घालणार असाल तर नक्कीच तुम्हाला ऑकवर्ड वाटणार. त्यामुळे बिकीनी आणि टॉप अशा प्रकारातले स्विमसूट निवडू नका. एक सिंगल स्विमसूट निवडा. अशा प्रकारचा स्विमसूट पाहण्यासाठी तुम्ही खाली दिलेली लिंक क्लिक करू शकता. अगदी ६०० रूपयांपासून चांगल्या दर्जाचे स्विमसूट उपलब्ध आहेत. शिवाय हे स्विमसूट असे आहेत की ते पहिल्यांदा घातल्यावर तुम्हाला मुळीच ऑकवर्ड होणार नाही.

https://www.myntra.com/swimwear/nabaiji-by-decathlon/nabaiji-by-decathlon-women-blue--pink-printed-swim-dress/14171322/buy


२. स्विमसूटमुळे तुमच्या शरीरावरचे वेगवेगळे भाग खूपच जास्त उठून दिसतात. हे टाळण्यासाठी योग्य स्विमवेअर कपड्यांची निवड करा. अवघडलेपण टाळण्यासाठी तुम्ही शॉर्ट्स आणि त्यावर स्विमसूट असंही करू शकता. शॉर्ट्स घेताना ती काळी किंवा स्किन रंगाची असावी. 
३. स्विमसूटचा कपडा जरा जाडसर आणि त्याच्यावर टेक्स्चर असणारा हवा. प्लेन कपडा असेल तर तुमचा ऑकवर्डनेस वाढू शकतो. अशा पद्धतीचा स्विमसूट बघण्यासाठी तुम्ही खाली दिलेली लिंक क्लिक करू शकता. असा स्विमसूट सगळ्याच वयोगटातल्या महिलांसाठी आरामदायी आहे. 
https://www.myntra.com/swimwear/amante/amante-women-navy-blue--green-colourblocked-racerback-legsuit/15502712/buy
४. स्विमसूट हे नेहमी फ्लोरोसंट रंगाचेच घ्या. कारण बीचवर असेच रंग उठून दिसतात.
५. स्विमसूट घालण्याआधी तुम्ही बॉडी व्हॅक्स करणं खूपच गरजेचं आहे. 

 

 


 

Web Title: Anushka Sharma's sizzling swim suit of Rs 9,000! Here are 5 important things to buy a swim suit for the holidays

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

संबंधित बातम्या

Low Cost Necklace Designs : फक्त ३०० रूपयात घ्या आकर्षक नेकलेस सेट; साडी, ड्रेस कशावरही ट्राय करू शकता लेटेस्ट पॅटर्न्स - Marathi News | Low Cost Necklace Designs : Low Cost Artificial Necklace Designs | Latest sakhi Photos at Lokmat.com

सखी : फक्त ३०० रूपयात घ्या आकर्षक नेकलेस सेट; साडी, ड्रेस कशावरही ट्राय करू शकता लेटेस्ट पॅटर्न्स

Low Cost Necklace Designs : कोणत्याही खास प्रसंगी हे नेकलेस घातल्यावर तुम्हाला इंडीयन लूक मिळेल. हा ज्वेलरी सेट एखाद्याला भेटवस्तू देण्यासाठी देखील एक उत्तम पर्याय आहे. ...

गोड आंबा कसा ओळखावा? ५ सोप्या ट्रिक्स! आंबे खरेदी करताना लक्षात ठेवा, खरेदी होईल चवदार - Marathi News | Mango Shopping: 5 Tips to understand whether mango in sweet and ripen or not  | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :गोड आंबा कसा ओळखावा? ५ सोप्या ट्रिक्स! आंबे खरेदी करताना लक्षात ठेवा, खरेदी होईल चवदार

Tips To Buy Sweet Mango: आंबे गोड निघतच नाहीत.. ही अनेक जणांची तक्रार. म्हणूनच तर आंब्याची निवड कशी करायची, म्हणजे ते हमखास गोड निघतील, यासाठी जाणून घ्या हे खास तंत्र..(how to identify ripen mango?) ...

Saree Shopping Tips : साडी घेताय? आवडेल ती घेऊ असं म्हणू नका, लक्षात ठेवा ४ गोष्टी; निवडा परफेक्ट साडी - Marathi News | Saree Shopping Tips: Do you buy sarees? Don't say take what you like, remember 4 things; Choose the perfect saree | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :साडी घेताय? आवडेल ती घेऊ असं म्हणू नका, लक्षात ठेवा ४ गोष्टी; निवडा परफेक्ट साडी

Saree Shopping Tips : साडी खरेदी हे महिलांसाठी सर्वात आवडीचे काम, पण ते सोपे व्हावे म्हणून आधीच काही गोष्टींची नियोजन करायला हवे. ...

Mother's Day 2022 :  बजेट एक हजार रुपयांहूनही कमी, आईला गिफ्ट द्या खास ‘पर्सनल’ वस्तू! पाहा एकापेक्षाएक गिफ्ट आयडिया - Marathi News | Mother's Day 2022 :  Gift Ideas For Mother's day 2022 gifts under 1000 rupees | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :बजेट एक हजार रुपयांहूनही कमी, आईला गिफ्ट द्या खास ‘पर्सनल’ वस्तू!

Mother's Day 2022 : आई रोजआपल्यासाठी राबराब राबते. हीच वेळ आहे, तुम्ही तिच्यासाठी काहीतरी करू शकता. ...

अनुष्का शर्माने वाढदिवसाला घातला ८५ हजारांचा ड्रेस, कॉटन आणि लिनन ब्लेंडच्या कापडाची खासियत अशी की.. - Marathi News | Anushka Sharma's cool cotton linen blend dress worth Rs. 85k! What is the speciality of her dress? | Latest sakhi News at Lokmat.com

सखी :अनुष्का शर्माने वाढदिवसाला घातला ८५ हजारांचा ड्रेस, कॉटन आणि लिनन ब्लेंडच्या कापडाची खासियत अशी की..

Anushka Sharma's Birthday Dress: अनुष्का शर्माने नुकताच तिच्या वाढदिवसाला घातलेला पांढऱ्या रंगाचा मिनी फ्रॉक पाहिला का? वाचा तब्बल ८५ हजारांच्या या ड्रेसमध्ये आहे तरी काय? ...