Lokmat Sakhi >Shopping > काश्मिरी केशराच्या किंमतीत प्रचंड वाढ! १ किलोसाठी मोजावे लागत आहेत तब्बल ५ लाख

काश्मिरी केशराच्या किंमतीत प्रचंड वाढ! १ किलोसाठी मोजावे लागत आहेत तब्बल ५ लाख

Kashmiri Saffron Has Shot up to Rs. 5 Lakhs Per Kilogram: भारत- पाकिस्तान सीमा बंद झाल्या आणि केशराच्या किमती खूपच कडाडल्या.. बघा असं नेमकं का झालं.. 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 3, 2025 14:20 IST2025-05-03T14:19:42+5:302025-05-03T14:20:41+5:30

Kashmiri Saffron Has Shot up to Rs. 5 Lakhs Per Kilogram: भारत- पाकिस्तान सीमा बंद झाल्या आणि केशराच्या किमती खूपच कडाडल्या.. बघा असं नेमकं का झालं.. 

 after Pahalgam terrorist attack the cost of Kashmiri saffron has shot up to Rs. 5 lakhs per kilogram | काश्मिरी केशराच्या किंमतीत प्रचंड वाढ! १ किलोसाठी मोजावे लागत आहेत तब्बल ५ लाख

काश्मिरी केशराच्या किंमतीत प्रचंड वाढ! १ किलोसाठी मोजावे लागत आहेत तब्बल ५ लाख

Highlightsकिमती अशाच वाढत राहिल्या तर अस्सल केशराची तहान केशराच्या इसेंन्सवर भागवावी लागेल की काय अशी वेळ आली आहे.. 

जगातला सगळ्यात महाग मसाल्याचा पदार्थ म्हणजे केशर.. भारतात तर केशराला खूपच जास्त मागणी आहे. गोडाधोडाचे पदार्थ केले की त्यात आवर्जून केशर घालण्यात येते. त्यामुळे सणासुदीला, लग्नसराईदरम्यान केशराची मागणी खूप जास्त वाढलेली असते. आधीच केशर महाग आणि त्यात आता त्याच्या किमतीमध्ये आणखी प्रचंड वाढ झाली आहे. पहलगाम येथे झालेल्या अतिरेकी हल्ल्यानंतर भारत-  पाकिस्तान सीमा बंद करण्यात आल्या. याचा परिणाम केशराच्या किमतीवर दिसून येते. भारत सरकारने सीमा बंद करण्याचा निर्णय घोषित केला आणि त्यानंतर अवघ्या ४ ते ५ दिवसांत केशराच्या किमतीमध्ये १० टक्क्यांनी वाढ दिसून आली. (after Pahalgam terrorist attack the cost of Kashmiri saffron has shot up to Rs. 5 lakhs per kilogram)

 

पहलगाम येथील हल्ल्याच्या आधी काश्मिरी केशरची किंमत ३ हजार रुपये प्रतितोळा एवढी होती. म्हणजेच त्यावेळी १ किलो केशरची किंमत ३ लाख रुपये एवढी होती. ही किंमत तशीच सर्वसामान्यांसाठी अतिशय जास्त होती.

रोज फक्त १ चमचा मेथ्या 'या' पद्धतीने खा, वजन- कोलेस्टेरॉल घटून मिळतील ५ जबरदस्त फायदे

आता त्याच किमतीत आणखी जास्त वाढ झाली असून जवळपास ५ लाख रुपये प्रतिकिलो एवढे पैसे केशरासाठी मोजावे लागत आहेत. इकोनॉमिक टाईम्सने याविषयी दिलेल्या वृत्तानुसार हल्ल्यानंतर भारत- पाक सीमा बंद झाल्यामुळे अफगणिस्तान येथून होणारी केसराची आयात बंद झाली आहे. 

 

भारतात दरवर्षी केसराची मागणी ५५ टन एवढी असते. त्यापैकी ६ ते ७ टन केशर काश्मिर येथून उत्पादित होते आणि बाकीचे केशर अफगणिस्तान आणि इरान येथून आयात केले जाते.

कमी वयातच हाडं कुरकुरू लागली? भरपूर कॅल्शियम देणारे ५ शाकाहारी पदार्थ खा, हाडं बळकट होतील

भारत आणि पाकिस्तानमध्ये सध्या जो तणाव निर्माण झाला आहे, त्याचा परिणाम आता केशराच्या आयातीवर झाला असून किमती प्रचंड वाढल्या आहेत. सर्वसामान्य लोक आधीच मोजूनमापून केशर खातात. त्यात किमती अशाच वाढत राहिल्या तर अस्सल केशराची तहान केशराच्या इसेंन्सवर भागवावी लागेल की काय अशी वेळ आली आहे.. 

 

Web Title:  after Pahalgam terrorist attack the cost of Kashmiri saffron has shot up to Rs. 5 lakhs per kilogram

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.