उन्हाळ्यात घरोघरी लागणारी एक वस्तू म्हणजे माठ. आता नाही म्हणायला काही घरांमध्ये उन्हाळ्यात सर्रास फ्रिजमधलं पाणी प्यायलं जातं. त्या घरांमध्ये माठ नसतोच. पण बहुतांश घरं अशी आहेत की त्यांना उन्हाळ्यात हमखास माठातलंच पाणी लागतं. माठातलं पाणी प्यायल्याशिवाय त्यांना तहान भागल्यासारखं वाटतच नाही. त्यामुळे उन्हाळ्यात आवर्जून माठ खरेदी केला जातोच. माठातलं पाणी थंडगार व्हावं यासाठी खरंतर आपण माठ घेतो. पण काही जणांच्या बाबतीत असं होतं की नवा माठ घेऊनही पाणी थंड होतच नाही (4 tips for purchasing math or mitti ka matka for summer season). असं तुमच्याही बाबतीत झालं असेल आणि पुन्हा एकदा माठ घेण्याचा विचार असेल तर कोणता माठ घ्यावा आणि कोणता टाळावा ते पाहुया...(how to choose perfect math or matka for summer?)
उन्हाळ्यात माठ खरेदी करताना कोणती काळजी घ्यावी?
१. माठ खरेदी करताना त्याचे वजन किती आहे याकडे लक्ष द्या. कारण माठ मातीचा असेल आणि त्यात सिमेंट मिसळलेले नसेल तर तो नक्कीच वजनाने हलका असेल. सिमेंट मिसळून तयार केलेले माठ जड असतात. शिवाय त्यातलं पाणी जास्त गारही होत नाही आणि ते आरोग्यदायीही नसतेच.
Summer Trip Wear: उन्हाळ्यात सहलीला जाताना घाला 'हे' हलकेफुलके कपडे, स्टायलिश आणि कम्फर्टेबल
२. माठ खरेदी करताना किंवा खरेदी केल्यानंतरही आपण जेव्हा त्यात पाणी भरून ठेवतो तेव्हा त्या पाण्याला मातीचा वास येतो की नाही ते नक्की बघा. मातीचा वास ज्यातून येतो, तो माठ अधिक चांगला आणि पुर्णपणे मातीपासून बनवलेला असण्याची शक्यता जास्त असते.
३. माठ खरेदी करताना त्यावर हाताने थोडं मारून पाहा. माठाचा आवाज कसा येतो यावरूनही त्याची परीक्षा करता येते. माठाचा आवाज थोडा पातळ आला किंवा त्या आवाजावरून आता काहीही नाही, असे जाणवले तर त्या माठातलं पाणी गार होण्याची शक्यता जास्त असते.
PCOD त्रास १ महिन्यात कमी करण्यासाठी खा 'हे' पदार्थ, मासिक पाळीच्या तक्रारी होतील दूर..
कारण तो माठ मातीचा असतो. सिमेंटमिश्रीत माठावर मारल्यास त्याचा आवाज थोडा जाडसर येतो.
४. माठाचा रंग जर हाताला लागत असेल किंवा माठ २ ते ३ वेळा धुवूनही त्यातून रंगाचंच पाणी जात असेल तर पाणी पिण्यासाठी तो माठ वापरणं योग्य नाही.
