किचनमधील अनेक काम ही फारच कंटाळवाणी आणि वेळखाऊ असतात. ही काम अगदी झटपट आणि चुटकीसरशी करण्यासाठी आपण अनेक उपकरणांचा वापर करतो. किचनमधील (2 in 1 Fruit & Vegetable Cutter) ही वेळखाऊ काम काही उपकरणांच्या मदतीने अगदी पटकन झाली, तर किचनमधील कामे अगदी पटकन आवरली जातात. किचनमधील अनेक वेळखाऊ आणि किचकट कामांपैकी (Cutter for Fruits & Vegetables Kitchen Gadget ) एक काम म्हणजे भाज्यांमधील बिया काढणे. ढोबळी मिरची, कारली यांसारख्या भाज्या आणि सफरचंद यांसारख्या फळांमधील बिया काढणे म्हणजे फारच बोरिंग काम असते.
ढोबळी मिरची मधील बिया या आकाराने लहान असतात त्यामुळे त्या पटकन निघत नाहीत, आणि निघाल्या तरी हाताला चिकटून बसतात. एवढंच नव्हे तर कारल्याची भाजी करताना देखील त्यातल्या बिया काढणे गरजेचे असते नाहीतर भाजी फारच कडू होते. अशावेळी सुरीच्या मदतीने या भाज्यांमधील बिया काढायला बराच वेळ लागतो. तसेच घाई - गडबडीच्या वेळी अशा भाज्यांमधील बिया काढून स्वच्छ करणे म्हणजे नकोसे वाटते. परंतु सध्या बाजारांत एक असं छोटं उपकरणं विकत मिळत ज्याच्या वापराने तुम्ही अगदी काही सेकंदात या भाज्यांमधील बिया काढू शकता. काय आहे ते नेमकं उपकरण ते पाहूयात.
२ इन १ सीड रिमूव्हर व्हेजिटेबल - फ्रुट कटर...
२ इन १ सीड रिमूव्हर व्हेजिटेबल - फ्रुट कटर हे एका विशिष्ट प्रकारचे कटर आहे. ज्याचा वापर करून आपण ढोबळी मिरची, कारली यांसारख्या भाज्या आणि फळांमधील बिया अगदी सहजपणे काढू शकता. ढोबळी मिरची, कारली यांसारख्या भाज्यांमधील बिया सुरीच्या मदतीने काढण्याचे काम कंटाळवाणे आणि वेळखाऊ असते, अशावेळी आपण या कटरचा वापर करु शकता. हे एक ढोबळी मिरच्यांच्या आकारासारखेच दिसणारे कटर असते. हे कटर आपण ढोबळी मिरचीच्या देटाकढील भागातून प्रेशर देत हलकेच आत घालावे. मग ढोबळी मिरचीच्या खालच्या भागातून हा बियांचा थर असणारा गर अगदी सहजपणे निघून बाहेर येतो. त्यामुळे तुम्हाला सुरीने चिरत बसण्याची गरजच लागणार नाही.
फक्त ५०० रुपयांत आणा हे 'सेन्सर लाईट्स', हवे तिथे लावा-आजी आजोबांसाठी खास सोय...
इतकेच नव्हे तर लांब जाड मिरची, कारली, पडवळ यांसारख्या आकाराच्या लांबलचक असणाऱ्या भाज्यांमधील बिया काढण्यासाठी या कटरच्या मधोमध एक रॉड दिलेला असतो. हा रॉड देखील उंच आणि निमुळता आकार असणाऱ्या भाज्यांमधील बिया काढण्यास किंवा सफरचंदाच्या बिया काढण्यास मदत होते. अशा प्रकारे या २ इन १ सीड रिमूव्हर व्हेजिटेबल - फ्रुट कटरचा वापर करुन ढोबळी मिरची, कारली यांसारख्या भाज्यांमधील आणि सफरचंदासारख्या फळांमधील बिया अगदी चुटकीसरशी काढू शकतो. जर आपल्याला देखील ढोबळी मिरच्या किंवा कारली यांसारख्या इतर भाज्यांमधील बिया अगदी झटपट काढता येऊ शकतात.
किचनमधील फळं आणि पदार्थांवर माशा - चिलटं घोंगावतात? आणा 'बांबू नेट बास्केट'- जगात भारी वस्तू...
किंमत आणि रेटिंग...
हे '२ इन १ सीड रिमूव्हर व्हेजिटेबल - फ्रुट कटर' आपल्याला ऑनलाईन शॉपिंग साईटवर अगदी सहजपणे विकत घेता येऊ शकते. याला ३.२ इतके रेटिंग देण्यात आले आहे. हे '२ इन १ सीड रिमूव्हर व्हेजिटेबल - फ्रुट कटर' आपल्या ऑनलाईन शॉपिंग साईट्सवर अगदी ३०० रुपयांपर्यंत सहज विकत मिळेल. असे हे '२ इन १ सीड रिमूव्हर व्हेजिटेबल - फ्रुट कटर' खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा. https://amzn.to/4lcrJLy