Lokmat Sakhi >Relationship > World Sexual Health Day 2025 : लैंगिक इच्छा हा आजार नाही तर, तर उत्तम आरोग्यासाठी आवश्यक

World Sexual Health Day 2025 : लैंगिक इच्छा हा आजार नाही तर, तर उत्तम आरोग्यासाठी आवश्यक

World Sexual Health Day 2025: sexual health awareness: importance of sexual desire: डॉक्टर म्हणतात लैंगिक आरोग्य म्हणजे फक्त आजार नाही, तर मन, शरीर आणि भावना यांचं संतुलन आहे.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 4, 2025 09:05 IST2025-09-04T09:00:00+5:302025-09-04T09:05:01+5:30

World Sexual Health Day 2025: sexual health awareness: importance of sexual desire: डॉक्टर म्हणतात लैंगिक आरोग्य म्हणजे फक्त आजार नाही, तर मन, शरीर आणि भावना यांचं संतुलन आहे.

World Sexual Health Day 2025 importance and awareness Importance of sexual education from a young age | World Sexual Health Day 2025 : लैंगिक इच्छा हा आजार नाही तर, तर उत्तम आरोग्यासाठी आवश्यक

World Sexual Health Day 2025 : लैंगिक इच्छा हा आजार नाही तर, तर उत्तम आरोग्यासाठी आवश्यक

- डॉ. राजन भोसले 

हल्ली आपलं आरोग्य, आहार आणि फिटनेसच्या बाबतीत सोशल मीडियावर अनेक व्हिडीओ किंवा संवाद आपण ऐकतच असतो.(World Sexual Health Day) वजन वाढू नये म्हणून काळजी कशी घ्यायला हवी असं देखील सांगितलं जातं. पण सेक्शुअल हेल्थ या विषयी बोलणं मात्र आजही टाळलं जातं.(sexual health awareness) खरं तर लैंगिक इच्छा हा काही आजार नाही, तर आपल्या आयुष्याचा एक नैसर्गिक भाग आहे. त्याकडे उघडपणे पाहाणं आणि त्याबद्दल योग्य माहिती असणं देखील तितकेच गरजेचे आहे.(importance of sexual desire) 

डॉक्टर राजन भोसले म्हणतात  “Sexual health is not just the absence of disease, it is about physical, mental and emotional well-being in relation to sexuality.” याचा अर्थ असा की लैंगिक आरोग्य म्हणजे फक्त आजार नाही, तर मन, शरीर आणि भावना यांचं संतुलन आहे.

Banksying: का रे दुरावा, का रे अबोला? तुमच्या नात्यातला नवा रेड फ्लॅग! डेटिंग नाही छळ..

आपल्या आई-वडिलांच्या पिढीत लैंगिक संबंधाविषयी मोठी भीती होती. त्यावेळी किशोरवयीन मुलांना प्रश्न पडले तरी आई-वडिलांना विचारु शकत नव्हते. जरी विचारलं तरी त्यांना ओरडा किंवा शिक्षा मिळायची. ज्यामुळे मुलं दडपली जायची आणि याचा त्यांच्या मनावर ताण यायचा. पण सध्याच्या पिढीची परिस्थिती फार वेगळी आहे. इंटरनेटमुळे हवी असलेली माहिती सहज मिळते. हस्तमैथुन किंवा पॉर्न साइट्समुळे त्यांच्या उफाळून आलेल्या लैंगिक इच्छांचा आणि हार्मोन्सचा ताण तात्पुरता कमी होतो. पण योग्य शिक्षणाऐवजी चुकीची माहिती मिळण्याचा धोका देखील तितकाच मोठा आहे. 

सेक्शुअल हेल्थमधला पहिला टप्पा म्हणजे सेफ सेक्सचं महत्त्व समजून घेणे. सुरक्षित लैंगिक संबंध ठेवल्यास एचआयव्ही किंवा त्यासारखे इतक गंभीर लैंगिक आजार टाळता येतात. कंडोमसारख्या साध्या उपायांचा वापर केल्याने हे आजार होण्याचा धोका कमी होतो. तसेच जोडीदारासोबतचा विश्वासही वाढतो. सुरक्षिततेकडे दुर्लक्ष केल्यास केवळ शारीरिक त्रासत नाही तर मानसिक तणाव आणि सामाजिक समस्या देखील निर्माण होतात. 

सेक्शुअल हेल्थमध्ये मानसिक आरोग्याचं स्थानही तितकचं महत्त्वाचं आहे. जर एखाद्या व्यक्तीला स्वतःच्या इच्छा, भावना आणि गरजा स्पष्टपणे व्यक्त करता येत नसतील तर त्याचा परिणाम त्यांच्या नातेसंबंधांवर होतो. जोडीदारासोबत  संवाद नसेल तर असमाधान, ताणतणाव आणि कधी कधी डिप्रेशनसारख्या समस्या उद्भवतात. त्यामुळे खुला संवाद देखील तितकाच महत्त्वाचा आहे. आजच्या पिढीमध्ये इंटरनेटमुळे बरीच माहिती मिळते, पण ती योग्य आहे का हे तपासणं गरजेचं आहे. चुकीच्या माहितीमुळे गैरसमज पसरतात. त्यामुळे लैंगिक शिक्षण शाळेतूनच मिळणं आवश्यक आहे. लहानपणापासून योग्य माहिती दिल्यास पुढे जबाबदार निर्णय घेता येतात आणि लैंगिक जीवन अधिक निरोगी होतं.

शेवटी इतकंच सेक्शुअल हेल्थ म्हणजे केवळ लैंगिक आनंद नव्हे, तर जबाबदारी, सुरक्षितता आणि परिपूर्ण आरोग्य यांचा संगम आहे. शरीर आणि मनाचं संतुलन साधलं, सुरक्षिततेकडे लक्ष दिलं आणि योग्य माहिती घेतली तर जीवन अधिक आनंदी आणि समाधानी होऊ शकतं.

डॉ. राजन भोसले 
(लैंगिक आरोग्यतज्ज्ञ)
+91 98210 93902


 

Web Title: World Sexual Health Day 2025 importance and awareness Importance of sexual education from a young age

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.