Join us

महिलांनी हस्तमैथुन केल्यास वाढतो इन्फर्टिलिटीचा धोका, कधीच मूल होत नाही; हे खरं की खोटं?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2025 19:05 IST

women’s sexual health myths : physical relationship and infertility: पुरुषांप्रमाणेच महिलांच्या हस्तमैथुनाच्या संदर्भात अनेक गैरसमज आहेत, शास्त्रीय माहिती नसेल तर समस्या गंभीर होते.

लग्न झाल्यानंतरही अनेक जोडप्यांमध्ये शारीरिक संबंधांविषयी चर्चा होत नाही.(women’s sexual health myths) ज्यामुळे त्यांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. आजही शारीरिक संबंधांविषयी बोलणे चुकीचे मानले जाते.(physical relationship and infertility) त्यामुळे पुरुषांना आणि स्त्रियांना आपले मत उघडपणे मांडता येत नाही. (truth about female fertility and self pleasure)हस्तमैथुन, कामोत्तेजना आणि लैगिंक आरोग्याशी संबंधित अनेक समस्या आहेत. (can masturbation affect women’s fertility) जिथे खुलेपणाने बोलता येत नाही. याबाबतीत महिला आणि त्यांच्या लैंगिक गरजांविषयी अनेकदा कमी बोललं जातं. (myths about female masturbation and pregnancy) अनेकांना असं वाटतं की, महिला हस्तमैथुन करत नाही किंवा त्यांना त्याची गरज नसते. पण हे खरे नाही. 

अगं बाई सासूबाई! सुनेशी पटलंच नाही तर काय अशी धास्ती वाटते? पाहा, काय करता येईल..

हार्वर्डच्या अभ्यासातून असे दिसून आले आहे की, महिलांसाठी देखील हस्तमैथुन तितकेच महत्त्वाचे आहे. अनेकांना असे वाटते की, दररोज हस्तमैथुन करणे आरोग्यासाठी हानिकारक आहे. पण खरेच असे आहे का? याबाबतीचे मत युरोलॉजिस्ट, अँड्रोलॉजिस्ट सर्जन डॉ.डी. काशिनाथम यांनी मांडले आहे. 

तज्ज्ञ म्हणतात महिलांमध्ये हस्तमैथुन करण्याची जी क्रिया आहे ती सामान्य लैगिंक क्रिया आहे आणि ती त्यांच्या आरोग्यासाठी चांगली आहे. यामुळे शारीरिक आणि मानसिक आरोग्याला कोणतेही नुकसान होत नाही. परंतु, हे सगळे अनेक गोष्टींवर अवलंबून असते. याबाबतीत पुरुषांचे वेगळे असते. पुरुषांच्या गुप्तांगात असणारे फिमोसिस आणि शॉर्ट फ्रेन्युलममुळे त्वचा घट्ट होते. ज्यामुळे हस्तमैथुन करताना रक्तस्त्राव होण्याची शक्यता असते. अशावेळी डॉक्टरांचा सल्ला घेणे आवश्यक ठरतो.  

वयाची तिशी ओलांडली म्हणून लग्न जमवण्याची घाई करताय? तरीही जोडीदार निवडताना ५ चुका नकोच

लग्नापूर्वी हस्तमैथुन केल्याने पुरुषांमध्ये इरेक्टाइल डिसफंक्शन होऊ शकते. तर महिलांना आई होण्यास अडचणी येऊ शकतात असे अनेकदा म्हटले जाते. परंतु यात कोणतेही तथ्य नाही. अनेकजण हस्तमैथुन खूप वेळा करतात. यामुळे आरोग्याला कोणताही धोका होत नाही. लैंगिक समस्या किंवा कामोत्तेजनेची भावना ही प्रत्येकासाठी वेगळी असू शकते. 

1. हस्तमैथुन करण्याचे आरोग्याला फायदे 

हस्तमैथुन करताना शरीरातून ऑक्सिटोसिन आणि एंडोर्फिन हार्मोन्स बाहेर पडतात. जे शरीरातील ताण कमी करुन आराम देतात. लैंगिक सुखाबद्दल समजून घेतल्याने आपल्या शारीरिक गरजा आणि त्याबाबतीत असणाऱ्या इच्छा समजण्यास मदत होते. डॉक्टरांच्या मते हस्तमैथुन केल्याने महिलांमधील मासिक पाळीच्या वेळी येणारे क्रॅम्प कमी होतात. हस्तमैथुन ही साधारणपणे एक लैंगिक क्रिया आहे जी आपल्या शरीराला आणि मनाला आराम देते. 

2. सतत हस्तमैथुन केल्याने आरोग्याला नुकसान होते?

हस्तमैथुन केल्याने शरीराला कोणतेही नुकसान होत नाही. परंतु, जास्त प्रमाणात केल्यास आपल्याला सवय लागते जी हानिकारक आहे. सतत हस्तमैथुन करत असाल तर ती जागा कोरडी पडून तिथे दुखापत होण्याची शक्यता अधिक असते. त्वचेवर जळजळ होण्याचा धोका निर्माण होऊ शकतो. अनेकदा याचा आपल्या मानसिकतेवर सुद्धा परिणाम होतो. ज्यामुळे मनात चिंता आणि अपराधीपणाची भावना निर्माण होऊ शकते. असं म्हटलं गेलं आहे की, महिलांनी हस्तमैथुन केल्याने त्यांचा लैंगिक आत्मविश्वास आणि नात्यातील जवळीकता जास्त वाढते. परंतु, पार्टनरकडून योग्य तो प्रतिसाद मिळाला नाही की नैराश्य येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप