असं म्हटलं जातं की, प्रेम हे अनेक जखमांवरचं मळभ दूर करणारं औषध. जे कोणत्याही जखमेला सहज बरे करु शकते. प्रेम ही जगातील सगळ्यात सुंदर भावना.(kidney transplant love story) आपण ज्या व्यक्तीवर प्रेम करतो त्यानं आयुष्यभर आपलं राहावं असं प्रत्येकाला वाटतं असतं.(uremia patient story) प्रेमाचं नातं पुढंपर्यंत घेऊन जायचं असेल तर समाजानुसार लग्न करणं बंधनकारकच आहे. पूर्वीच्या काळी लग्न हे आई-वडिलांच्या साक्षीने होतं असतं.(cancer patient marriage story) हल्ली यातील अनेक गोष्टी आपल्याला सहज बदलताना पाहायला मिळत आहे. वय वाढलं तरी अनेकांचा लग्नासाठी नकार असतो.(true story from China) वाढत्या वयामुळे आपल्याला अनेक संकटांना तर सामोरे जावेच लागते पण काही अटी देखील आपल्यासमोर उभ्या राहतात.(woman marries man for kidney) पण नातं जसं जसं बहरत तसं तसं प्रेम फुलू लागते. अशीच एक घटना घडली चीनमधील शांक्सी प्रांतात.
गुलाबाचं रोप कोमजलं- पानं सुकली? ऑक्टोबर महिन्यात 'एवढं' कराच, टपोऱ्या फुलांनी बहरेल गुलाबाचं रोप
चीनमध्ये कॅन्सर असणाऱ्या एका तरुणाने किडनीचा त्रास असणाऱ्या महिलेसोबत लग्न केलं. लग्न करताना त्यांनी एकमेकांसोबत काही अटी देखील ठेवल्या. साउथ चायना मॉर्निंग पोस्टने एक वृत्त दिलं आहे. यानुसार किडनीची समस्या असलेल्या एका महिलेने कॅन्सर असणाऱ्या तरुणीसोबत लग्न केले.
चीनच्या शांक्सी प्रांतातील २४ वर्षीय वांग जिओ ही महिला युरेमियान या आजाराने ग्रस्त होती. डॉक्टरांनी तिला असं सांगितलं की ती किडनी प्रत्यारोपणाशिवाय फक्त एक वर्ष जगेल. तिला किडनी ट्रान्सपरंटसाठी कुणीही न मिळाल्याने तिने वेगळाच निर्णय घेतला. कॅन्सर असणाऱ्या लोकांमध्ये आपल्या लग्नाची पोस्ट टाकत म्हटलं की, लग्नानंतर मी तुझी पूर्ण काळजी घेईन, तुझ्या मृत्यूनंतर मला तुझी किडनी दे..
२७ वर्षीय यु जियानपिंग ब्लड कॅन्सरसारख्या गंभीर आजाराशी झुंज देत होता. त्याने तिच्याशी संपर्क साधत लग्नाचा प्रस्ताव स्विकारला. जुलै २०१३ मध्ये त्यांनी लग्न केले. एकमेकांच्या अटी मान्य करत युच्या मृत्यूनंतर वांगला त्याची किडनी मिळेल आणि ती त्याच्या वडीलांची काळजी घेईल, असा करार केला. पण जसं जसे ते एकमेकांना ओळखू लागले त्यानंतर त्यांच्या नात्यात प्रेम नव्याने फुलू लागले. एकमेकांची काळजी आणि प्रेमामुळे त्यांनी आपल्या आजारावर मात केली. यादरम्यान वांगने फुलांचे गुलदस्ते बनवायला सुरुवात केली आणि रस्त्याच्या कडेला विकायला सुरुवात केली. अथक प्रयत्नांमुळे युच्या शस्त्रक्रियेसाठी 70 हजार डॉलर जमा केले. ज्यामुळे यूला बोन मॅरो ट्रान्सप्लांट करता आला.
जून २०१४ मध्ये यूची प्रकृती सुधारली. इतकंच नाही तर दोघांची एकमेकांची काळजी आणि प्रेमामुळे प्रकृतीत सुधारणा पाहायला मिळाली. डॉक्टरांनी सांगितले की, डायलिसिसची आणि किडनी ट्रान्सपरंटची आवश्यकता भासणार नाही. दोघेही बरे झाल्यानंतर दोघांनी रेस्टॉरंटमध्ये लग्नाचा समारंभ आयोजित केला. काही काळाने त्यांच्यावर ‘व्हिवा ला विडा’ हा चित्रपट देखील बनवण्यात आला. सध्या हे जोडपे शियान येथे फुलांचे दुकान चालवत आनंदाने जीवन जगत आहे.
