'ब्रेकअप' हा कोणत्याही नात्यातील एक भावनिक आणि कुणालाही न आवडणारा असा दुःखद टप्पा असतो. सुरुवातीला तो वेदनादायक वाटू शकतो, पण अनेकदा याच अनुभवातून मुलींमध्ये सकारात्मक बदल घडताना दिसतात. ब्रेकअपनंतर त्या अधिक आत्मनिर्भर, आत्मविश्वासू आणि स्वतःकडे नव्याने पाहू लागतात. काहीजणी आपला लूक बदलतात, फिटनेसकडे लक्ष देतात, करिअरवर फोकस करतात किंवा स्वतःच्या आवडी-निवडींना अधिक वेळ देतात. हा बदल फक्त बाह्य स्वरूपापुरता मर्यादित नसतो, तर तो मानसिक आणि भावनिक पातळीवरही दिसून येतो. स्वतःची किंमत ओळखणे, स्वाभिमान जपणे आणि आयुष्यात पुढे जाण्याची तयारी करणे — या सगळ्यामुळेच ब्रेकअपनंतर मुली अधिक सुंदर आणि कॉन्फिडन्ट दिसतात...(why girls look beautiful after breakup).
आपण असं म्हणतो ब्रेकअप झाल्यावर माणूस खचतो, पण सध्याचा 'ग्लो-अप' (Glow-up) ट्रेंड काही वेगळंच सांगतो. अनेकदा आपण पाहतो की, ब्रेकअपच्या वेदनेतून बाहेर पडल्यानंतर मुली आधीपेक्षा अधिक सुंदर, फिट आणि कमालीच्या कॉन्फिडन्ट दिसू लागतात. त्यांच्या चेहऱ्यावरचा हा बदल केवळ मेकअपमुळे नसून, तो त्यांच्या (girls glow up after breakup) अंतर्मनात झालेल्या बदलाचा परिणाम असतो.
नात तुटलं की, सुरुवातीला अश्रू आणि एकाकीपणा असतो, पण त्यानंतर जे काही बदल घडतात ते थक्क करणारे असतात...ब्रेकअपच्या धक्क्यातून सावरताना एक मुलगी जेव्हा स्वतःला पुन्हा उभी राहते, तेव्हा तिचे सौंदर्य आणि आत्मविश्वास एका वेगळ्याच उंचीवर असतो. म्हणतात ना, 'काच तुटली की ती अधिक धारदार होते', अगदी तसेच काहीसे मुलींच्या बाबतीत घडते. स्वतःच्या गरजांकडे लक्ष देणे, नवीन छंद जोपासणे आणि स्वतःची किंमत ओळखणे यातूनच त्यांच्या व्यक्तिमत्वाचा कायापालट होतो(revenge glow up meaning).
बॉयफ्रेंड चांगला आहे पण नवरा म्हणून तो चांगला वागेल का? लग्न करण्यापूर्वी वेळीच पाहा ७ गोष्टी...
मानसशास्त्रामध्ये या प्रक्रियेला 'Revenge Dressing' (रिव्हेंज ड्रेसिंग) असे नाव देण्यात आले आहे. याचा अर्थ केवळ आपल्या 'एक्स' (Ex) कडून बदला घेणे असा होत नाही, तर स्वतःला एका नवीन रूपात ओळख मिळवून देणे असा होतो. जेणेकरून समोरच्या व्यक्तीला जाणीव होईल की त्याने काय गमावले आहे.
हे स्वतःची ओळख पुन्हा एकदा भक्कम करण्याची एक प्रक्रिया असू शकते. कारण नातं तुटल्यानंतर मनासोबतच ज्या गोष्टीला सर्वाधिक तडा जातो, तो असतो 'आत्मसन्मान' (Self-esteem). अशा वेळी बाह्य बदल - जसे की नवीन हेअरकट किंवा नवीन स्टाईल - हे मुलींमध्ये स्वतःच्या आयुष्यावर नियंत्रण मिळवल्याची भावना पुन्हा निर्माण करण्याचे एक साधन बनतात.
मानसशास्त्रामध्ये “Enclothed Cognition” नावाचा एक अतिशय महत्त्वाचा सिद्धांत आहे. हा सिद्धांत सांगतो की, आपण जे कपडे घालतो किंवा ज्या प्रकारे नटतो-थटतो, त्याचा थेट परिणाम आपल्या विचार करण्याच्या पद्धतीवर आणि आपल्या वागणुकीवर होत असतो.
फक्त २१ दिवस मुलांवर ओरडू नका ! दिसतील ३ बदल, करून तर पाहा 'हा' छोटासा प्रयोग...
क्लिनीकल सायकॉलॉजिस्ट डॉ. शालिनी वर्मा यांच्या मते, “ब्रेकअप झाल्यानंतर व्यक्ती आपल्या प्रतिमेवर (Image) पुन्हा नव्याने काम करू लागते. जेव्हा ती व्यक्ती स्वतःला आरशात पाहते आणि तिला स्वतःबद्दल चांगलं वाटू लागतं, तेव्हा तिचा आत्मविश्वास नैसर्गिकरित्या वाढतो. हे केवळ इतरांना दाखवण्यासाठी केलेले प्रदर्शन नसून, ती एक मानसिक रिकव्हरीची प्रक्रिया असते.”
जेव्हा आपण स्वतःला पसंत करू लागतो, तेव्हा आपल्या मेंदूमध्ये 'डोपामाइन' (Dopamine) सारखे ‘फील-गुड’ न्यूरोट्रांसमीटर्स उत्सर्जित होतात. यामुळे आपला मूड सुधारतो आणि मानसिक तणाव कमी होण्यास मदत होते. मुलींनी केलेला हा 'नवा लूक' प्रत्यक्षात एका “नवीन सुरुवातीचा” संकेत असतो. हा बदल जुन्या नात्यातील कटू आठवणींमधून बाहेर पडण्याचे आणि स्वतःचे अस्तित्व नव्याने निर्माण करण्याचे एक प्रतीक बनतो.
अर्थात, प्रत्येक व्यक्ती ब्रेकअपनंतर हाच मार्ग निवडते असे नाही... काही लोक शांत राहून, एकांतात स्वतःला सावरत पुढे जाणे पसंत करतात, तर काहीजण बाह्य बदलांचा मार्ग निवडतात. तज्ज्ञांच्या मते, जर हा बदल तुमचा आत्मसन्मान (Self-esteem) वाढवण्यासाठी आणि मानसिक आरोग्य सुधारण्यासाठी मदत करत असेल, तर ही एक चांगली गोष्ट आहे. परंतु, जर हा बदल केवळ कोणाला तरी जळवण्यासाठी किंवा स्वतःला सिद्ध करण्याच्या दबावापोटी केला जात असेल, तर त्याचा परिणाम तात्पुरता असू शकतो. खरा बदल तोच असतो जो तुम्हाला आतून शांतता आणि आनंद देतो.
