Join us

कोण आहेत बुशरा बिबी? इमरान खान यांच्यावर अविश्वास दाखवत तिसऱ्या पत्नीनेही सोडलं घर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 15, 2022 18:16 IST

अत्यंत महत्त्वाकांक्षी, तापट, असलेल्या बुशरा बिबी आणि इमरान खान यांच्या घटस्फोटाच्या चर्चेनं नवं वादळ

ठळक मुद्देबुशरा बिबी आणि इमरान खान, पाकिस्तानात हे नवं चर्चेचं वादळ आहे.

पाकिस्तानचे पंतप्रधान इमरान खान , त्यांचं हॅण्डसम ग्लॅमर असं की त्याची तिथल्या तारुण्याला भूरळ पडली. मात्र त्यांनी देशाला जी स्वप्न दाखवली ती पूर्ण तर झालीच नाही पण खान यांनी जनतेचा विश्वासघात केला अशी भावना आहेच. त्यात आता खान यांच्या घरातच वादळ आहे. त्यांच्या पत्नी बुशरा बिबी नाराज असून त्यांचं नातंही घटस्फोटाच्या वळणावर जातं की काय अशी चर्चा आहे. अर्थात खान यांना ना वाद नवे आहेत ना, घटस्फोट. एकेकाळी अत्यंत मॉडर्न, खुल्या विचारसरणीचा पुरस्कार करणारे इमरान खान राजकारणाच्या वळणावर अत्यंत कट्टर होत गेले. इतके की, त्यांनी पत्नीचा चेहराही माध्यमांसमोर कधी येऊ दिला नाही. 

(Image : Google)

इमरान खान यांनी आतापर्यंत तीन विवाह केले आहेत. १९९५ साली ब्रिटिश असलेल्या जेमिमा गोल्डस्मिथ यांच्याशी खान यांनी प्रेमविवाह केला होता. ब्रिटिश जेमिमा पाकिस्तानातल्या बंदिस्त वातावरणात कशा रुळणार अशी चर्चा झाली. मात्र जेमिमा यांनी इमरान खान यांच्याशी जीवनशैलीसह पाकिस्तानी वातावरणाशी जुळवून घेतले. हे लग्न झाले त्यावेळी इमरान खान ४२ वर्षांचे होते. जेमिमा फक्त २१ वर्षांची तरुणी. त्यांना दोन मुलं झाली, पण पुढे ९ वर्षांनी त्यांनी घटस्फोट घेतला आणि जेमिमा मुलांना घेऊन कायमची इंग्लंडला निघून गेली.त्याच काळात पत्रकार रेहम खान यांचं आणि इमरान खान यांचं प्रेमप्रकरण चर्चेत होतं. खुलेअरम गाजलं. रेहम घटस्फोटित होत्या. त्यांना तीन मुलंही होती. पुढे जानेवारी २०१५ मध्ये इमरान खान यांनी त्यांच्याशी लग्न केलं पण जेमतेम १० महिन्यात ऑक्टोबरमध्ये त्यांचा घटस्फोटही झाला.इमरान खान यांनी त्यानंतर २०१८ मध्ये बुशरा बिबी यांच्याशी तिसरा विवाह केला. बुशरा यांचं पहिलं लग्न त्या १५ वर्षांच्या असतानाच झालं होतं. त्या लग्नापासून त्यांना ५ मुलं आहेत. दोन मुलींची लग्नही झाली आहेत. पुढे त्यांचा घटस्फोटही झाला.आणि इमरान खान राजकीय क्षितिजावर तळपू लागताच बुशरा बिबीही चर्चेत आल्या. त्यांचं नख जगाला दिसणं मुश्किल. त्या धार्मिक असल्यानं खानही त्याकाळात अत्यंत धार्मिक झाले. पण आता मात्र परिस्थिती बदलली आहे. पाकिस्तानी माध्यमांनी दिलेल्या वृत्तांनुसार इमरान खान आणि त्यांची पत्नी बुशरा बिबी यांच्यातील संबंधही सध्या चांगले नाहीत. त्यांच्यात जोरदार भांडण झालं असून बुशरा लाहोर येथे निघून गेल्या आहेत आणि त्यांची जवळची मैत्रीण सानिया शाह यांच्याबरोबर त्या राहात आहेत.

(Image : Google)

माध्यमांच्या म्हणण्यानुसार दोघा पती-पत्नींमधील वादाला गेल्या वर्षी ऑक्टोबरपासून सुरुवात झाली. बुशरा बिबी यांचे पहिले पती खावर मनेका हे बुशरा यांचा प्रभाव आणि प्रतिष्ठेचा वापर करून पंजाब प्रांतात कोट्यवधी रुपयांची कंत्राटं घेऊन ती आपल्या कटुंबाला मिळवून देत आहेत, असा आरोप आहे. लष्करानेही याबाबत काही प्रकरणांची माहिती इमरान खान यांना दिली. बुशरा बिबी यांची जवळची मैत्रीण फराह आझमी यांच्या नवऱ्याचे सरकारी खात्यातील ‘संबंध’ आणि करोडोंचा घोटाळा उघडकीस आल्यावर या प्रकरणानं टोक गाठलं.बुशरा बिबी महत्त्वकांक्षी आहेत फार अशी चर्चा होती. त्या स्वत:ला अध्यात्मिक म्हणत असल्या तरी अत्यंत रागीट आहेत आणि एकदा दार उघडायला उशीर झाला तर त्यांनी २० कर्मचाऱ्यांना तडकाफडकी कामावरुन काढून टाकले होते अशीही वृत्त प्रसिध्द झाली.बुशरा बिबी आणि इमरान खान, पाकिस्तानात हे नवं चर्चेचं वादळ आहे.

टॅग्स :पाकिस्तानइम्रान खान