Join us

ब्रेकअप झालं तरीही एक्स पार्टनर तुमचा पाठलाग करतो? ' ऑर्बिटिंग' नावाचा नवा त्रास, पाहा त्याचा अर्थ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 18, 2024 18:37 IST

What Is Orbiting in Dating? Why Ex still Stalks in Internet : हल्लीच्या रिलेशनशिपमध्ये बरेच शब्द उदयास येत असतात..

आजकाल रिलेशनशिपमध्ये (Relationship) बरेच गोष्टी ऐकायला मिळतात. पहिले फक्त प्रेमसंबंधांवर बोलले जायचे. पण आता विविध प्रकार आपल्याला पाहायला मिळतील (Orbiting). ब्रेकअप (Breakup), हुकअप, ब्रेड क्रम्बिंग, घोस्टिंग आणि आता, ऑर्बिटिंग हा नविन ट्रेण्ड सोशल मीडियात व्हायरल होत आहे.

प्रेमाच्या दुनियेतले हे शब्द कानावर पडले, की रिलेशनशिप हे किती फास्ट फॉरवर्ड होत चाललं आहे, याची कल्पना येते. ब्रेकअपनंतर सहसा एक्स पार्टनर ऑर्बिटिंग करतात. पण ऑर्बिटिंग म्हणजे काय? ब्रेकअपनंतर ऑर्बिटिंगचा वापर करून पार्टनर नक्की काय करतात?(What Is Orbiting in Dating? Why Ex still Stalks in Internet).

ऑर्बिटिंग म्हणजे काय?

- ब्रेकअपच्या या युगात ऑर्बिटिंग करणे म्हणजे, सोशल मीडियाच्या माध्यमातून ती किंवा तो व्यक्ती तुमच्या आयुष्यात ‘व्हर्च्युअल प्रेजेंट’ असतो. तुमचे पोस्ट एक्स लाईक करतो. तुमच्या स्टोरी पाहतो. परंतु, थेट मेसेजचे रिप्लाय किंवा संभाषण सुरु करत नाही.

- एक्सचं असं वागणं म्हणजे तुमच्या 'ऑर्बिट' मध्ये राहणे. तुमच्याभोवती फिरत असतात. परंतु शारीरिकदृष्ट्या कधीही जवळ येत नाही. यालाच ऑर्बिटिंग असे म्हणतात.

फराळ खाल्ले नी वजन वाढले? करा ५ सोप्या गोष्टी; पचनक्रिया होईल सुरळीत - वजन घटेल

ब्रेकअपनंतर असे का होते?

इमोशनल कंट्रोल

ब्रेकअपनंतर काही लोक जोडीदारापासून पूर्णपणे वेगळे होऊ शकत नाहीत. सोशल मीडियाद्वारे कनेक्ट राहतात. ज्यामुळे त्यांना तुमच्या जीवनाचा भाग असल्यासारखं वाटतं. जरी ते एकतर्फी अटेचमेंट असले तरीही.

कुतूहल

ब्रेकअपनंतर तुम्ही काय करत आहात हे एक्स पार्टनरला बघायचे असते. तुम्ही दुसऱ्या कुणासोबत तरी आहात का? हे जाणून घेण्याचं ते प्रयत्न करत असतात. एक प्रकारे ते तुमचा ऑनलाइन पाठलाग करत असतात.

थुलथुलीत पोट होईल सपाट - बॅड कोलेस्टेरॉलही येईल नियंत्रणात; फक्त रोज चमचाभर 'ही' चटणी खा

फिअर ऑफ मिसिंग आउट

सोशल मीडियामुळे लोकांमध्ये ‘FOMO’ म्हणजेच ‘फिअर ऑफ मिसिंग आउट’ची ​​भावना वाढली आहे. तुमच्या आयुह्स्यात काय चालू आहे, हे जाणून घेण्याचं ते प्रयत्न करत असतात. 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप