Lokmat Sakhi >Relationship > Banksying: का रे दुरावा, का रे अबोला? तुमच्या नात्यातला नवा रेड फ्लॅग! डेटिंग नाही छळ..

Banksying: का रे दुरावा, का रे अबोला? तुमच्या नात्यातला नवा रेड फ्लॅग! डेटिंग नाही छळ..

Banksying vs Ghosting : Mental abuse in modern love: Banksying meaning in dating: Banksying: new Breakup trend : नात्यातला कोरडेपणा अचानक वाढून टाळलं जाणं येतंय वाट्याला.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 16, 2025 14:45 IST2025-07-16T14:45:01+5:302025-07-16T14:45:46+5:30

Banksying vs Ghosting : Mental abuse in modern love: Banksying meaning in dating: Banksying: new Breakup trend : नात्यातला कोरडेपणा अचानक वाढून टाळलं जाणं येतंय वाट्याला.

What is Banksying in relationships Modern dating red flags Emotional detachment in dating Toxic relationship signs 2025 | Banksying: का रे दुरावा, का रे अबोला? तुमच्या नात्यातला नवा रेड फ्लॅग! डेटिंग नाही छळ..

Banksying: का रे दुरावा, का रे अबोला? तुमच्या नात्यातला नवा रेड फ्लॅग! डेटिंग नाही छळ..

प्रेम म्हटलं की, त्यात रुसणं-फुगणं सुरुच असतंच. आवडणाऱ्या व्यक्तीसाठी आपण सगळं काही करायला तयार असतो.(Relationship Tips) 'ती' म्हणेल तीच पूर्व दिशा असं काही आपलं गणित. प्रेमात पडलेल्या सगळ्यांचंच असं होतं. परंतु, प्रत्येक नात्यात जसा चांगला काळ असतो तसाच वाईट काळही येतो.(new Breakup trend) कधी एकत्र वेळ घालवता येतो, तर कधी भांडणही होतात. परंतु अनेकदा असं घडतं की, एकजण बोलणंच कमी करतो. त्याच्या स्वभावाविरुद्ध वागू लागतो.(Banksying vs Ghosting) तो किंवा ती एखादी गोष्ट पूर्वीसारखी शेअर करणंच बंद करतो. सतत आपल्याच विचारात राहणं, विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर 'काही नाही' असं देणं असंही होऊ लागतो.(Mental abuse in modern love) यालाच नव्या शब्दात म्हणतात बँक्सिंग! (banksying) नव्या नात्यातला हा एक मोठा रेड फ्लॅग आहे.

Women and stress: बायका खूप चिडचिड का करतात, सतत इतक्या कुणावर वैतागलेल्या असतात?

बँक्सिंग- banksying म्हणजे काय?

बँक्सिंग हा एक नवीन डेटिंग ट्रेंड आहे. ज्याचे नाव प्रसिद्ध कलाकार 'बँक्सी' याच्या नावावरुन घेतले. असं म्हटलं जातं की, बँक्सी त्याचे पेंटिंग्ज बनवत आणि काही न सांगता गायब व्हायचा. त्याचप्रमाणे जेव्हा नातेसंबंधातील लोक हळूहळू त्यांच्या जोडीदारांना न सांगता भावनिकदृष्ट्या दूर जाऊ लागतात, तेव्हा त्याला बँक्सिंग असं म्हणतात. 

'या' लक्षणांकडे दुर्लक्ष करु नका. 

1. जर आपला जोडीदार पूर्वीसारखा बोलत नसेल तर

2. आपल्याला समोरासमोर भेटण्यासाठी किंवा बोलण्यासाठी वेळ काढत नसेल तर

3. प्रत्येक गोष्टीमध्ये तुम्हाला चुकीच ठरवणं किंवा दोष देणं

4. काही प्रश्न विचारले की तू खूप अतिविचार करते आहेस, सर्व काही ठीक आहे असं उत्तर देणे. नात्यात पूर्वीसारखा आनंद, उत्साह न वाटणे, नात्यात दूरावा येणे यांसारख्या गोष्टी वारंवार घडत असतील तर सर्व बँक्सिंगचे लक्षण असू शकतात. 

दोघेही प्रेमात की मामला एकतर्फी ? ८ गोष्टी सांगतील पार्टनर धोका देतोय की प्रेमात पडलाय..

असं करण्यामागे पार्टनरची अनेक कारणे असू शकतात. यामध्ये सगळ्यात आधी येते ती भीती. अनेकदा आपल्या जोडीदाराशी स्पष्टपणे बोलण्यासाठी घाबरतात. त्यांना असं वाटतं की, कमिटमेंट दिल्यानंतर आता ब्रेकअप केले तर खूप भांडण होतील. त्यासाठी ते शांतपणे नात्यातून दूर जावू लागतात. ज्यामुळे नात्यात अधिक संघर्ष करावा लागणार नाही. तसेच याचा मानसिक आरोग्यावर देखील अधिक परिणाम होतो. नात्यात अशी परिस्थिती निर्माण झाल्यानंतर समोरच्याला समजत नाही नेमकं आपलं कुठे चुकलं. अशावेळी ती व्यक्ती स्वत:वर शंका घेऊ लागते. तिचा आत्मविश्वास कमी होऊ लागतो. ती व्यक्ती नातेसंबंधात येण्यास घाबरु लागते. यावेळी आपण जोडीदाराशी मोकळेपणाने बोला. जर तो बोलणे टाळत असेल तर स्वत:च्या आनंदाला सगळ्यात जास्त महत्त्व द्या. कोणत्याही नात्यात एकटे राहण्यापेक्षा त्यातून वेळीच बाहेर पडणे जास्त गरजेचं असतं. 
 

Web Title: What is Banksying in relationships Modern dating red flags Emotional detachment in dating Toxic relationship signs 2025

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.