Lokmat Sakhi >Relationship > शारीरिक संबंधांनंतर महिलांच्या हार्मोनल बॅलन्सवर काय परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...

शारीरिक संबंधांनंतर महिलांच्या हार्मोनल बॅलन्सवर काय परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...

what happens to women body within 10 minutes of sexual relation : What happens to women after sex : Hormonal changes after sexual intercourse : Women body reaction after intimacy : Hormones released after sex in women : Sexual health benefits for women : निकोप शारीरिक संबंध हे भावनिक आणि मानसिक संतुलनासह उत्तम आरोग्यासाठीही आवश्यक असतात.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 31, 2025 22:35 IST2025-07-31T22:30:00+5:302025-07-31T22:35:01+5:30

what happens to women body within 10 minutes of sexual relation : What happens to women after sex : Hormonal changes after sexual intercourse : Women body reaction after intimacy : Hormones released after sex in women : Sexual health benefits for women : निकोप शारीरिक संबंध हे भावनिक आणि मानसिक संतुलनासह उत्तम आरोग्यासाठीही आवश्यक असतात.

what happens to women body within 10 minutes of sexual relation What happens to women after sex Hormones released after sex in women Sexual health benefits for women | शारीरिक संबंधांनंतर महिलांच्या हार्मोनल बॅलन्सवर काय परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...

शारीरिक संबंधांनंतर महिलांच्या हार्मोनल बॅलन्सवर काय परिणाम होतो? डॉक्टर सांगतात...

निकोप शारीरिक संबंधांचा मानसिक आणि शारीरिक आरोग्य उत्तम ठेवण्यासाठीही महत्वाचे ठरतात. फक्त शारीरिक सुखाच्या दृष्टीनेच शारीरिक संबंध महत्वाचे नसून खरंतर, हे नातं भावनिक, मानसिक आणि वैवाहिक नात्यासाठीही आवश्यक असतात. लैंगिक संबंधानंतर शरीरात अनेक आवश्यक हार्मोनल बदल घडतात, जे आपल्या आरोग्यावर (what happens to women body within 10 minutes of sexual relation) सकारात्मक परिणाम करू शकतात. शारीरिक संबंधांनंतर (What happens to women after sex) विशेषतः महिलांच्या शरीरात वेगवेगळ्या प्रकारचे हार्मोन्स ॲक्टिव्ह होतात, जे महिलांच्या आरोग्याच्या दृष्टीने अत्यंत फायदेशीर ठरतात(Hormones released after sex in women).

 शारीरिक संबंधांनंतर अवघ्या १० मिनिटांतच महिलांच्या शरीरांतून अनेक हार्मोन्स स्रवतात. हे हार्मोन्स मन शांत ठेवण्यापासून शरीरातील वेदना कमी करण्यापर्यंत, शरीराच्या अनेक (Sexual health benefits for women) अवयवांवर सकारात्मक परिणाम करतात. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. अश्विनी राठोड यांनी 'हरजिंदगी' या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत याविषयी अधिक माहिती दिली. 

होतं काय?

१. लैंगिक संबंधाच्या अवघ्या १० मिनिटांच्या आत महिलांच्या शरीरात एक महत्त्वाचा हार्मोन तयार होतो तो म्हणजे 'ऑक्सिटोसिन'. या हार्मोनला 'लव्ह हार्मोन' किंवा 'कडल हार्मोन' असंही म्हटलं जातं. हा हार्मोन फिजिकल टच, किसिंग, ऑर्गॅझम आणि विशेषतः सेक्स दरम्यान शरीरात तयार होतो. या हार्मोनच्या मदतीने जोडप्यांमध्ये भावनिक जवळीक वाढवण्याचं मुख्य काम करण्यास मदत होते. सोबतच, परस्पर विश्वास, प्रेम आणि नातं अधिक घट्ट होत. या हार्मोन मुळेच सेक्सनंतर अनेक कपल्सना आपण एकमेकांच्या अधिक जवळ असल्याची भावना मनात तयार होते. 

वर्क-लाइफ बॅलन्स बिघडलाय? ऐश्वर्या रायचा महत्वाचा सल्ला लक्षात ठेवा- करिअर की मूल असं कशाला...

२. फक्त ऑक्सिटोसिनच नव्हे, तर 'डोपामिन' नावाचा आणखी एक महत्त्वाचा हार्मोनही तयार होतो. 'डोपामिन' हा हार्मोन आनंद, समाधान मिळाल्याची भावना निर्माण करतो. यामुळे मन आनंदी, प्रसन्न आणि समाधानी वाटतं. हा हार्मोन 'रिवॉर्ड सिस्टम' प्रमाणे काम करतो, म्हणजेच तुम्हाला पुन्हा एकदा तो आनंददायी अनुभव घ्यावा, असं वाटतं. यामुळे नात्यातील आकर्षण आणि जवळीक टिकून राहते.

३. सेक्स दरम्यान एंडोर्फिन हा हार्मोन शरीरात फार मोठ्या प्रमाणात स्रवतो. याला शरीराचा 'नॅचरल पेनकिलर' असंही म्हणतात. या हार्मोन्समुळे शरीरातील दुखणं आणि वेदना कमी करण्यास मदत होते. मनाला शांतता आणि स्ट्रेस फ्री झाल्याचा आनंद मिळतो. आपला मूड सुधारतो आणि मानसिक आरोग्यासाठी फायदेशीर ठरतो. यामुळेच सेक्सनंतर महिलांना आरामदायक वाटण, खुश असणं आणि मनःशांती याचा अनुभव येतो.

सैय्याराच्या प्रेमात असलेले तरुर-तरुणी प्रत्यक्षात मात्र प्रेमालाच घाबरतात, कमिटमेंट नको म्हणतात असं का?

४. 'प्रोलॅक्टिन' नावाचा हार्मोनही मोठ्या प्रमाणात स्रवतो. हा हार्मोन मुख्यतः झोप, मानसिक विश्रांती आणि समाधान यासाठी कारणीभूत असतो. प्रोलॅक्टिन हार्मोन्समुळे सेक्सनंतर शरीरात सॅटिस्फॅक्शन आणि रिलॅक्सेशन वाटू लागत. याचबरोबर, हा हार्मोन गर्भधारणेच्या प्रक्रियेतही महत्त्वाची भूमिका बजावतो. प्रेग्नंसीनंतर महिलांमध्ये ब्रेस्टमिल्क तयार होण्यासाठी हा हार्मोन फार गरजेचा असतो. यामुळे सेक्सनंतर अनेक महिलांना झोप येते, आणि शरीर-मन दोन्ही शांत राहतं. 

इतरही फायदे... 

१. सेक्सनंतर मेंदूमध्ये ऑक्सीटोसिन व प्रोलॅक्टिन असे रिलॅक्स करणारे हार्मोन्स स्रवतात, जे शांत झोप येण्यास मदत करतात. 

२. हेल्दी शारीरिक संबंधांमुळे इम्यून सिस्टम मजबूत राहते, ज्यामुळे आजारी पडण्याचा धोका कमी होतो.

३. ऑक्सीटोसिन आणि एंडोर्फिन हे हार्मोन्स मिळून मानसिक तणाव कमी करतात. त्यामुळे महिलांना शांती व आनंदाचा अनुभव येतो. 

४. पार्टनर्समधील नात्यांची वीण अधिक घट्ट होते, जे नातं मजबूत करण्यासाठी फायदेशीर ठरतं. 

५. शारीरिक संबंधांमुळे शरीरात विविध हार्मोन्सचे संतुलन राखले जाते, ज्याचा त्वचा, केस, मूड आणि एकूणच आरोग्यावर चांगला परिणाम होतो.

६. शारीरिक संबंधांमुळे रक्तदाब नियंत्रित राहतो, ज्याचा थेट फायदा हृदयाच्या आरोग्यावर होतो.

Web Title: what happens to women body within 10 minutes of sexual relation What happens to women after sex Hormones released after sex in women Sexual health benefits for women

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.