Lokmat Sakhi >Relationship > वर्ल्ड कप जिंकताच लेकरांना फोन करणारा ' हा ' बाप पाहा, काय सांगता कुटुंबासाठी वेळ नाही..

वर्ल्ड कप जिंकताच लेकरांना फोन करणारा ' हा ' बाप पाहा, काय सांगता कुटुंबासाठी वेळ नाही..

Virat Kohli's video call with Anushka Sharma and kids post T20 World Cup win breaks the internet: 'Real family man' : बिझी आहे, असे बायको मुलांना सांगता? पाहा, हे विराटने बायको आणि लेकरांना केलेला हा फोन..

By भाग्यश्री कांबळे | Published: June 30, 2024 01:53 PM2024-06-30T13:53:52+5:302024-06-30T13:55:32+5:30

Virat Kohli's video call with Anushka Sharma and kids post T20 World Cup win breaks the internet: 'Real family man' : बिझी आहे, असे बायको मुलांना सांगता? पाहा, हे विराटने बायको आणि लेकरांना केलेला हा फोन..

Virat Kohli's video call with Anushka Sharma and kids post T20 World Cup win breaks the internet: 'Real family man' | वर्ल्ड कप जिंकताच लेकरांना फोन करणारा ' हा ' बाप पाहा, काय सांगता कुटुंबासाठी वेळ नाही..

वर्ल्ड कप जिंकताच लेकरांना फोन करणारा ' हा ' बाप पाहा, काय सांगता कुटुंबासाठी वेळ नाही..

भाग्यश्री कांबळे

प्रेमात पडणे ही एक अत्यंत सुंदर अनुभूती असते. प्रेमात पडणारा व्यक्ती कोणतीही अडचण असो, आपल्या व्यक्तीबद्दल आधी विचार करतो. त्याची काळजी घेतो. प्रेमात पडण्याआधी आपण स्वतःसाठी अधिक वेळ देतो. पण प्रेमात पडल्यानंतर आपण पार्टनरचाही विचार करायला लागतो. पण काही जण नातं जसं मुरतं, तसं नात्यात एफर्ट्स घालणं कमी करतात. ज्यामुळे नात्यात असणारं प्रेम आटत जातं, आणि नकळत प्रेमात दुरावा येतो.

बायको मुलांशी, प्रेयसीशी बोलायला वेळ नाही, लोक आहेत भवताली असं म्हणत काही जण बोलणं टाळतात. पार्टनरला प्रायोरिटी देणं कमी करतात. दैनंदिन जीवनातील घाई-गडबडीत पार्टनरसाठी वेळ काढणं आव्हानात्मक जरी असलं तरी, त्यांच्यासोबत प्रेमाचे दोन शब्द बोलणं गरजेचं आहे. यामुळे नात्यातील धागा हा कमकुवत नसून अधिक मजबूत होतो. पार्टनर नेहमी सुख दुःखात साथ देतो. त्यामुळे नातं जिवंत ठेवण्यासाठी एकमेकांसाठी सदैव सोबत राहणं गरजेचं आहे.

हेच कपल गोल्स क्रिकेटर विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा देत आले आहेत. दोघं एकेमकांवर खूप प्रेम करतात, आणि एकमेकांसाठी खंबीरपणे उभे राहतात, हे अनेकदा दिसून आलं आहे.

‘कमिटेड’ असतानाही दुसऱ्या व्यक्तीविषयी आकर्षण वाटतं? तुम्ही खरंच प्रेमात आहात?-रिलेशनशिप एक्सपर्ट सांगतात..

आता  टी-२० वर्ल्डकपचीच गोष्ट बघा ना. २९ जून रोजी भारताने दक्षिण आफ्रिकेला ७ धावांनी पराभव केला, आणि ‘टी-२० विश्वचषक २०२४’ चं विजेतेपद पटकावलं. विराट कोहली या अंतिम सामन्याचा सामनावीर ठरला. या ऐतिहासिक विजयानंतर विराटने मैदानातुनच अनुष्काला व्हिडिओ कॉल लावला. यावरून हे दिसून येतं, त्याला आपल्या पार्टनरप्रती किती प्रेम आणि आदर आहे. त्याने या विजयात आपल्या कुटुंबियांना सामील तर केलंच, शिवाय आनंदही शेअर केला.

एकेकाळी मी बॉयफ्रेण्डला ५०-७५ वेळा कॉल करायचे!- अनन्या पांडे सांगते, प्रेमातलं पागलपण आणि..

पत्नीशी संवाद साधताना कोहलीला अश्रू अनावर झाले होते. यानंतर आपल्या दोन्ही मुलांशी विराटने हसत-खेळत संवाद साधला. विराटचे हावभावचं सगळं काही सांगत होते. आपल्या फॅमिलीसोबत आनंद शेअर करताना त्याचा उत्साह अधिक द्विगुणीत होत होता. त्याचा हा व्हिडिओ सोशल मिडीयावर प्रचंड व्हायरल होत आहे. ज्यावर नेटकऱ्यांनी देखील प्रतिक्रियांचा पाऊस पाडला आहे.

त्यामुळे कितीही बिझी असलात तरी नात्यात वेळ द्या, पार्टनरच्या वेळेचा, ते देत असलेल्या वेळेचा आणि प्रेमाचा आदर ठेवा. कारण नातं फुलवण्यासाठी दोघांनी प्रेमाला खतपाणी घालणं गरजेचं आहे. तेव्हाच प्रेमाचे हे झाड चिरतरुण राहील.

Web Title: Virat Kohli's video call with Anushka Sharma and kids post T20 World Cup win breaks the internet: 'Real family man'

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.