आज व्हॅलेंटाईन दिवस. दोन प्रेमींचा दिवस. प्रत्येक जोडपे त्यांच्या तक्रारी विसरुन एकमेकांशी असलेले नाते दृढ करण्यावर भर देण्याकडे असतो. नातं हे दोन शरीराच नव्हे तर मनाचे ही मिलन करते. नाती आपल्याला प्रेम, आनंद आणि आधार देतात. आई-वडिल, मित्र-मैत्रिणीशिवाय सगळ्यात जवळच आणि हक्काच नातं असते ते आपल्या जोडीदारासोबतच. नात्यात फक्त प्रेमच नाही तर समजूतदारपणा देखील अधिक महत्त्वाचा असतो. नात्यात प्रत्येक पावलावर चढ-उतारपणा येत असतो. परंतु, अनेकदा आपण या काळात असे काही वागतो की, त्यामुळे आपल्या नात्यात दूरावा येतो.
प्रसिद्ध अमेरिकन लेखक डॉ. गॅरी चॅपमन यांच्या 'फाइव्ह लव्ह लँग्वेजेस'या पुस्तकात असे म्हटले आहे की, ८५ टक्के लोकांचा घटस्फोट किंवा नात्यात दूरावा हा संवाद न केल्यामुळे येतो. आपण आपल्या पार्टनरला कायम त्याच्या चुका दाखवून देण्याचा प्रयत्न करतो त्यामुळे नातेसंबंधात दूरावा येतो. त्यांच्या छोट्या गोष्टींकडे दुर्लक्ष करणे, अपेक्षांचे ओझे, टीका करणे यामुळे नातं बिघडते. जोडीदारासोबत नाते सुधारण्यासाठी कोणत्या ५ चुका टाळायला हव्यात जाणून घेऊया.
1. संवाद न साधणं
2. सतत टीका करणं
जर नात्यात तुम्ही तुमच्या जोडीदारावर वारंवार टीका करत असाल तर त्यामुळे त्यांच्या आत्मसन्मानाला तडा जाऊ शकतो. सततच्या वाढत्या तक्रारी आणि नकारात्मक गोष्टींमुळे कोणतेही नातं कमकुवत होते.
3. शंका आणि अविश्वास
4. वेळेचा अभाव
सध्या धावपळीच्या जगात आपल्याला नात्याताला पुरेसा वेळ देता येत नाही. ज्यामुळे नात्यातील अंतर सहज वाढते. ज्यावेळी कामामुळे आपल्याला जोडीदाराशी व्यवस्थित बोलता येतं नाही तेव्हा नात्यात दूरावा येतो. अशावेळी कामाचा आणि नात्याचा विचार करुन योग्य ते पाऊल उचलायला हवं.
5. जुन्या गोष्टी उकरुण काढणे