Join us  

Vaginal Health : SEX नंतर योनीमार्गात आग होते, खूप वेदना होतात, त्याची ही 4 कारणे....

By ऑनलाइन लोकमत | Published: July 21, 2021 6:49 PM

Vaginal Health : जर किरकोळ वेदना, खाज सुटणे, जळजळ होणे किंवा असामान्य स्त्राव, अस्वस्थता वाटत असेल तर आपल्याला संसर्ग होऊ शकतो.  

ठळक मुद्देआपल्याला जास्त त्रास होत असेल तर आपण योनीवर बाहेरील बाजूनं बर्फ लावावा आणि तीव्र वेदना झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्या. जर सेक्स आपल्याला त्रास देत असेल तर आपल्या स्त्रीरोगतज्ञाशी बोला.

शारीरिक संबंध ठेवल्यानंतर अनेक महिलांच्या योनी मार्गात वेदना होतात. तुम्हालाही अशी समस्या जाणवत असेल तर याची कारणं माहीत करून घेणं गरजेचं आहे. सेक्सदरम्यान जाणवत असलेल्या वेदना या वेगवेगळ्या प्रकारच्या असतात. अनेकजण रफ सेक्सचा आनंद घेतात जे वेदनांचे  कारण ठरू शकतो.

सेक्सनंतर योनी मार्गात तीव्रतेनं वेदना जाणवणं सामान्य नाही. असं दुखणं अनेक गंभीर आजाराचं कारणही ठरू शकतं. कधीकधी लैंगिक वेदना आणि परिणामी योनीतून होणारा स्त्राव अस्वस्थ करतो. याचा अर्थ असा नाही की आपल्याला आयुष्यभर वेदनादायक सेक्स करावे लागेल. लैंगिक संबंधानंतर योनीत वेदना होण्याची अनेक कारणे आहेत  

लुब्रिकेंट्ससाठी लिक्विड, जेलचा वापर

सेक्स दरम्यान वेदना होण्याचे सर्वात सामान्य कारण म्हणजे लुब्रिकेंट्सचा वापर करणं. प्रत्येकजण वेगवेगळ्या प्रमाणात नैसर्गिक लुब्रिकेंट्सचा वापर करतो. यामुळे आरामदायक सेक्स होऊ शकतो. अन्यथा कोरडी त्वचा असल्यास त्वचेवर लहान लहान जखमा होऊ शकतात. हा लालसरपणा, जखमा संक्रमणाचं कारण ठरू शकते. अनेकांच्या त्वचेला जेल, तेल यांसारखे लुब्रिकेंट्स सुट करत  नाहीत त्यामुळे त्रास वाढू शकतो.

बर्फाचा योग्य वापर

लैंगिक संबंधानंतर जर  योनी दुखत असेल किंवा तो भाग फुगला असेल तर स्वच्छ रूमालावर बर्फ घेऊन आपल्या अंतर्वस्त्राच्या बाहेरील भागावर 10 ते 15 मिनिटे बर्फ ठेवा. योनीच्या आतल्या भागात थेट बर्फ ठेवू नका. यामुळे वेदना अधिक वाढू शकतात. घरी उपाय केल्यानंतरही वेदना कमी होत नसतील तर वेळ न घालवता डॉक्टरांचा सल्ला घ्या.

त्वचा संवेदनशील 

काही लोकांना लेटेक्सपासून एलर्जी होते. लेटेक्स कंडोममुळे आपल्याला योनीतून जळजळ होऊ शकते. आपल्याला जास्त त्रास होत असेल तर आपण योनीवर बाहेरील बाजूनं बर्फ लावावा आणि तीव्र वेदना झाल्यास डॉक्टरांचा सल्ला घ्यावा.

संक्रमण झाल्यास अशी घ्या काळजी

जर किरकोळ वेदना, खाज सुटणे, जळजळ होणे किंवा असामान्य स्त्राव, अस्वस्थता वाटत असेल तर आपल्याला संसर्ग होऊ शकतो. यीस्टचा संसर्ग, बॅक्टेरियल इन्फेक्शन,  एसटीआय या आजारांचे लक्षण असू शकते. वेळीच स्त्रीरोगतज्ञाशी बोलून आजार वाढण्यापासून रोखणं फायद्याचे ठरेल.

आपल्याला असा त्रास झाल्यास स्वत: उपचार करू नका. तज्ज्ञांच्या सल्ल्यानुसार उपचार घ्या. जर सेक्स आपल्याला त्रासदायक वाटत असेल तर आपल्या स्त्रीरोगतज्ञाशी बोला. यामागचं कारण शोधण्यासाठी आपल्या डॉक्टरांचा सल्ला घ्या कारण सेक्स नेहमीच आरामदायक, आनंददायक आणि वेदनारहित असावा

टॅग्स :लैंगिक जीवनरिलेशनशिपरिलेशनशिपमहिला