Join us  

सुश्मिता सेन ते एकता कपूर : दत्तक मूल किंवा सरोगसीने आई झालेल्या बॉलिवूडच्या सिंगल मदर्स; पाहा फोटो

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 27, 2021 1:27 PM

आम्ही एकट्या असलो म्हणून काय झालं, आम्हालाही मूल हवंय म्हणत अभिनेत्री निभावतायंत आपली भूमिका

ठळक मुद्देबी टाऊनमधील या अभिनेत्री आहेत सिंगल मदर एकट्या आहोत पण मूल हवंय असं वाटल्याने त्यांनी घेतला आई होण्याचा निर्णय

घरात एखादं लहानसं बागडतं मूल असावं असं वाटतं पण लग्नाच्या बंधनात तर अडकायचं नाही. अशावेळी सरोगसी किंवा मूल दत्तक घेण्याला प्राधान्य दिलं जातं. विशेष म्हणजे बॉलिवूडमधील अभिनेत्रींचाही यामध्ये पुढाकार असल्याचे दिसते. सिंगल आहे म्हणून काय झाले मलाही मूल हवे असे म्हणत या अभिनेत्री कधी सरोगसी तर कधी मूल दत्तक घेत आई होण्याची आपली इच्छा पूर्ण करतात. सिंगल मदर असल्या तरी या मूलाचा सांभाळ करुन त्याला वाढवण्यात आपण कुठेही कमी पडणार नाही आणि त्यातून आपल्याला समाधानही मिळेल यामुळे त्या सरोगसी किंवा मूल दत्तक घेण्याचा पर्याय निवडतात. नुकतेच स्वरा भास्कर हिने मूल दत्तक घेणार असल्याचे जाहीर केले आणि पुन्हा बॉलिवूडमधील सिंगल मदरविषयी चर्चा सुरू झाली. पाहूयात बॉलिवूडमध्ये कोण आहेत सिंगल मदर

 

१. स्वरा भास्कर - स्वरा म्हणते, मी यावर्षी मार्चमध्ये एका अनाथाश्रमाला भेट दिली होती. तेव्हापासूनच माझ्या डोक्यात मूल दत्तक घेण्याचा विचार सुरू झाला. त्यामुळे मी दत्तक मूलासाठी नोंदणी केली. पुढे ती म्हणते भारतात अनाथ मुलांचा आकडा २.९ कोटी इतका असून त्यातील केवळ ५० लाथ मुले अनाथाश्रमात आहेत. पण मी मूल दत्तक घेण्याचे हे कारण नसून माझा निर्णय घ्यायला हे एक कारण आहे असे म्हटल्यास वावगे ठरणार नाही. 

२. सुश्मिता सेन - बराच कायदेशीर लढा दिल्यानंतर सुश्मिता सेन हिने तिच्या वयाच्या २४ व्या वर्षी पहिली मुलगी दत्तक घेतली होती, तिचे नाव अलिशा. त्यानंतर रीनी या दुसऱ्या मुलीला सुश्मिताने २०१० मध्ये दत्तक घेतले. मूल दत्तक घेण्याविषयी माझ्या मनात कधीही शंका नव्हती असे सुश्मिता सांगते. तर तिच्या दोन्ही मुलीही मूल दत्तक घेण्याविषयी भरभरुन बोलतात. सुश्मिता म्हणते, मी वयाच्या २४ व्या वर्षी अतिशय योग्य निर्णय घेतला. लोकांना वाटते मी अशाप्रकारे मुलींना दत्तक घेऊन मोठे सामाजिक काम केले आहे, पण तसे नसून मी स्वत:च्या रक्षणासाठी हा निर्णय घेतला होता. 

(Image : Google)

३. रविना टंडन - वयाच्या २१ व्या वर्षी लग्नाच्या आधीच रविनाने दोन मुलींना दत्तक घेतले होते. पूजा आणि छाया अशी या मुलींची नावे आहेत. त्यानंतर रविनाने अनिल थडानी यांच्याशी लग्न केले आणि त्यांच्यापासून तिला एक मुलगा आणि मुलगी झाले. त्यामुळे आता रविना ४ मुलांचा सांभाळ करते. 

(Image : Google)

४. एकता कपूर - प्रसिद्ध दिग्दर्शक आणि निर्माती एकता कपूर सरोगसीच्या माध्यमातून आई झाली आहे. पाच वर्षांपूर्वी तिने आपल्या काही वर्षांपूर्वी रवी या मुलाला जन्म दिला होता. तंत्रज्ञानाच्या प्रगतीमुळे अशाप्रकारे लग्न न करताही सरोगसीसारख्या तंत्रज्ञानाने तुमचे आई होण्याचे स्वप्न पूर्ण होऊ शकते. एकता सिंगल मदर असून ती आपल्या मुलाचा अतिशय चांगल्यारितीने सांभाळ करत आहे. 

(Image : Google)

५. नीना गुप्ता - आताच्या काळात सिंगल मदरचा विचार करणे ठिक आहे. पण ८० च्या दशकात हा विचार करणे म्हणजे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. प्रसिद्ध अभिनेत्री नीना गुप्ता यांनी लग्न न करताच मसाबा हिला जन्म दिला. मसाबा नीना गुप्ता आणि वेस्ट इंडिजचे प्रसिद्ध खेळाडू  विवियन रिचर्डस यांची मुलगी आहे. हे दोघेही रिलेशनमध्ये होते, मात्र त्यांनी लग्न केलेले नव्हते. त्यावेळी नीना यांनी सिंगल मदर होण्याचे आव्हान स्विकारले आणि अतिशय उत्तम रितीने आपल्या मुलीचे पालनपोषण केले. आज मसाबा एक प्रसिद्ध डिझायनर म्हणून आपल्याला माहित आहे. 

(Image : Google)

टॅग्स :रिलेशनशिपपालकत्वस्वरा भास्करएकता कपूरसुश्मिता सेनरिलेशनशिपरवीना टंडन