brut.india यांच्यातर्फे Gen Z पिढीबाबत नुकताच एक सर्व्हे करण्यात आला. यामध्ये जे काही मुद्दे समोर आले आहेत, ते वाचल्यानंतर कोणालाही असंच वाटेल की हे विचार नक्की कोणाचे आजची तरुण, आधुनिक पिढी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जेन झी पिढीतल्या नवऱ्यांचे की ६०- ७० वर्षांच्या आजोबांचे?या सर्व्हेक्षणात जवळपास २३ हजार जेन झी पिढीतल्या तरुण मुलांचा अभ्यास करण्यात आला. यामध्ये त्यांनी जे विचार मांडले आणि त्यातून जी काही माहिती पुढे आली ती खरोखरच चक्रावून टाकणारी आहे. बघा ही पिढी नेमकं काय सांगते आहे..
या अभ्यासातून असं समोर आलं आहे की जेन झी पिढीचं प्रतिनिधीत्व करणाऱ्या जवळपास ३१ टक्के नवऱ्यांना त्यांच्या बायकोने त्यांचं नेहमीच सगळं काही ऐकलं पाहिजे, असं वाटतं..
आतापर्यंत महिलांनी सक्षम व्हावं, स्वत:च्या पायावर उभं राहावं म्हणून कित्येकांनी कित्येक प्रयत्न केले. त्याला आता बऱ्याचअर्थी यशही आल्याचं दिसतं. पण जेन झी नवऱ्यांना मात्र बायकोने पुर्णपणे स्वावलंबी असणं थोडं धोकादायक वाटतं. दर ४ पैकी १ नवरा असाच विचार करणारा आहे.
५० टक्क्यांपेक्षा जास्त नवऱ्यांना असं वाटतं की स्त्री- पुरुष समानतेसाठी त्यांना खूपच जास्त तडजोड करावी लागते आणि त्याबाबतीत त्यांच्याकडून जरा जास्तच अपेक्षा ठेवल्या जातात. हे या पिढीला अजिबातच मान्य नाहीये. तसेच महिलांना पुढे आणण्याच्या नादात आता पुरुषांवरच अन्याय होत आहे, असंही या पिढीचं मत आहे.
एवढंच काय तर जेन झी पुरुषांना महिलांच्या लैंगिक इच्छांबाबतही आक्षेप आहे. या सर्व्हेक्षणातून पुढे आलेल्या माहितीनुसार २१ टक्के जेन झी पुरुषांना असं वाटतं की तीच स्त्री उत्तम आहे जी कधीही शारिरीक संबंधांबाबत स्वत:हून पुढाकार घेत नाही..
जी स्त्री करिअरमध्ये यशस्वी असते, ती स्त्री जेन झी पुरुषांच्या नजरेत जास्त आकर्षक असते. आता खरंतर एकीकडे बायकोने जास्त इंडिपेंडंट असणं यांना मान्य नाही. आणि दुसरीकडे मात्र त्यांना अशीच स्त्री आवडते आहे जी करिअरमध्ये यशस्वी आहे.. यातच किती विरोधाभास आहे..
मुलांना सांभाळणं किंवा बायकोची मुलांना सांभाळण्यात मदत करणं, हे देखील जेन झी ला फार आवडण्यासारखं नाही. त्यात त्यांना कमीपणा वाटतो.
Web Summary : A survey reveals that many Gen Z husbands want wives who always obey them and are wary of independent women. They feel men are being treated unfairly in the pursuit of gender equality and prefer women who don't initiate physical intimacy. Contradictorily, career-oriented women are favored.
Web Summary : एक सर्वेक्षण से पता चलता है कि कई जेन जेड पति ऐसी पत्नी चाहते हैं जो हमेशा उनकी आज्ञा का पालन करें और स्वतंत्र महिलाओं से सावधान रहें। उन्हें लगता है कि लैंगिक समानता की खोज में पुरुषों के साथ अन्याय हो रहा है और वे उन महिलाओं को पसंद करते हैं जो शारीरिक अंतरंगता शुरू नहीं करती हैं। विरोधाभासी रूप से, करियर उन्मुख महिलाओं को पसंद किया जाता है।