लग्न हे सात जन्माचं बंधन मानलं जातं. अगदी विधीवत पद्धतीने लग्न करुन दोन जीव नवीन आयुष्याचा प्रवास सुरु करतात.(Weekend marriage trend) लग्नानंतर आयुष्यात बऱ्याच गोष्टी बदलतात.(Young couples relationship trends) आता आपण एकटे नसून आपलंही कुणीतही हक्काच माणूस आहे, जे फक्त आपलं आहे ही भावनाच काही निराळी असते.(Single after marriage trend)
एकत्र राहणं, खाणंपिणं आणि बाहेर फिरणं अशा अनेक गोष्टी एकमेकांच्या साथीने केल्या जातात.(Why weekend marriages are trending among youth) लग्न ठरल्यानंतर आपल्याला अनेकांकडून मस्ती मज्जाकमध्ये हे नेहमीच ऐकायला मिळतं आता तुझं सिंगल लाईफ संपल.(New generation marriage styles) आता तुझ्यावर बंधन येणारं, तुझी जबाबदारी वाढणार, तुझे स्वातंत्र्य संपणार.(Benefits of weekend-only marriage) त्यामुळे वय वाढू लागले तरी अनेकजण लग्न करण्यासाठी तयार नसतात. 'एकटा जीव सदाशिव म्हणत' त्यांना आयु्ष्य जगण्यात मज्जा येते. एकट्याने लाईफची मज्जा घ्यायची असते.(How weekend marriages affect relationships) अशावेळी त्यांना लग्न न करता सुखी राहावेसे वाटते. ना कसली जबाबदारी ना कसली चिंता यामुळे लग्न करण्याची इच्छा देखील वाटत नाही.
नको, लग्नच नाही करणार! -मुली का देत आहेत लग्नाला नकार, त्यांना कशाची भीती वाटते?
जपानमध्ये नवीन ट्रेंड सुरु झाला आहे आणि याची भुरळ तरुणाई देखील पडली आहे. या ट्रेंडमध्ये लग्न केल्यानंतर देखील सिंगल लाईफ अगदी आनंदाने एन्जॉय करता येते. याला वीकेंड मॅरेज असं म्हटलं जातं. या नात्यात दोन्ही जोडपी आठवडाभर इतकी व्यस्त असतात की, त्यांना एकमेकांसाठी वेळ नसतो. मग ते पती-पत्नी का असो. ते एकमेकांसोबत राहात नाही फक्त विकेंडच्या दिवशी आपल्या नात्याला फुलवतात. शनिवार- रविवार किंवा काही ठराविक दिवशी एकमेकांना भेटतात आणि एकत्र राहतात.
वीकेंड मॅरेंजची तरुण पिढीला आवड
सध्याच्या तरुण पिढीमध्ये नात्यापेक्षा आपल्या करिअरची चिंता सगळ्यात जास्त सतावात आहे. तसेच यामध्ये दोघांना एकाच शहरात नोकरी न मिळाल्याने त्यांना वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन राहावे लागत आहे. कोणत्याही नात्यात स्पेस ही महत्त्वाची आहे. त्यासाठी वीकेंड मॅरेज त्यांना अगदी चांगले वाटते. वीकेंडला आपल्या पार्टनरला भेटल्यानंतर उरलेल्या काळाच आपले लाईफ जगण्याची मुभा मिळते. तसेच एकमेकांसोबत वेळ न घालवल्याने भांडण देखील कमी होतात. आठवड्याभरानंतर भेटल्यामुळे नात्यात ओढ देखील कायम राहाते. लग्नानंतरही आपले स्वातंत्र्य टिकून राहावे असे अनेकांना वाटते. त्यामुळे हा पर्याय तरुण पिढीला अधिक आवडतो आहे. वीकेंड मॅरेजमुळे आपण आपले स्वप्न , मित्रांसोबतच्या भेटीगाठी आणि कुठल्याही नात्याच्या ओझ्याशिवाय आपण आनंदी राहू शकतो.
अगं बाई सासूबाई! सुनेशी पटलंच नाही तर काय अशी धास्ती वाटते? पाहा, काय करता येईल..
वीकेंड मॅरेजमुळे नात्यात दूरावा
वीकेंड मॅरेज हे अनेकांना चांगले वाटत असले तरी यामुळे नात्यात दूरावा येतो. इमोशनल डिस्टेंट वाढताना दिसत आहे. तसेच जर आपल्याला मुलं-बाळ असतील तर त्यांच्यावर चांगल्या पद्धतीने संस्कार करणे देखील कठीण आहे. अनेकदा कामाच्या वाढत्या ताणामुळे आणि आपलं माणूस जवळ नसल्यामुळे एकटेपणाची भीती जाणवते यामुळे मानसिक ताण वाढतो, डिप्रेशनची समस्या येते. आपण कितीही पुढे गेलो तरी आपले कुटुंबाच्या विचारात नेहमी तफावत आढळते. त्यामुळे कुटुंबाचा प्रेशर देखील यात सहन करावा लागतो.
वीकेंड मॅरेज हा ट्रेंड जरी असला तरी नातं निभावण्यामध्ये बऱ्याच गोष्टी बदल्या आहेत. प्रत्येक जोडप्याने आपल्या नात्याच्या गरजा, त्याची प्रायोरिटी ओळखायला हवी. नात्यात प्रेम, आदर आणि विश्वास असायला हवा. त्यासाठी आपण एकमेकांसोबत असो किंवा नसो. नातं हे प्रेम आणि विश्वासाच्या जोरावर टिकून राहाते.