Join us  

'मला काजोलला भेटण्याची जराही इच्छा नव्हती...'; जेव्हा अजय देवगण आपल्या लव लाईफबद्दल खुलासा करतो

By ऑनलाइन लोकमत | Published: August 18, 2021 5:26 PM

Relationship Tips : पहिल्या भेटीत जी व्यक्ती तुम्हाला फारशी आवडली नाही किंवा तुम्ही तिला जसं समजताय ती तशीच असेल असं नाही.

ठळक मुद्देअनेकदा लोक पहिल्याचवेळी त्यांची मतं तयार करतात, ज्यामुळे ते अशा व्यक्तीला गमावतात जो त्यांच्यासाठी सर्वोत्तम जोडीदार असू शकतो. नंतर, जेव्हा समोरच्या व्यक्तीच्या चांगुलपणाबद्दल कळते. तेव्हा तुम्हाला फक्त खंत वाटतेजेव्हा तुम्ही पहिल्यांदा कोणाबरोबर डेटवर जाता, तेव्हा पहिल्या भेटीत त्या व्यक्तीबाबत मतं बनवू नका. कदाचित ती व्यक्ती तुम्हाला पहिल्यांदा भेटेल तेव्हा तिला थोडं अवघडल्यासारखं वाटत असेल.

जेव्हा आपण कोणत्याही व्यक्तीला पहिल्यांदा भेटतो तेव्हा त्या व्यक्तीबद्दल एक माईंडसेट ठरवला जातो. उदा. हा खूप बोअर करतो, हिचा चेहरा जराही हसरा नाही, त्याला खूपच अटिट्यूनं बोलायला आवडतं. असे विचार डोक्यात येत असतात.  अनेकदा एखादी व्यक्ती पहिल्या भेटीत आपल्याला आवडते तर काहीजण पहिल्याचवेळी मनातून उतरतात. पहिल्या भेटीत जी व्यक्ती तुम्हाला फारशी आवडली नाही किंवा तुम्ही तिला जसं समजताय ती तशीच असेल असं नाही. अनेकजण डेटिंगदरम्यान चुका करतात आणि त्यानंतर त्यांना पश्चाताप होतो. 

पहिल्या भेटीत तुम्ही एखाद्या व्यक्तीला ओळखाल असं तुम्हाला वाटत असेल तर हे शक्य नाही.  एखाद्या  व्यक्तीसोबत काहीवेळ घालवल्यानंतरच तुम्ही नातं पुढे वाढवण्याचा निर्णय घ्यायला हवा. बॉलीवूड एक्टर अजय देवगण आणि काजोलसोबतही असाच एक गमतीदार  किस्सा झाला होता. 

मला काजोलला पुन्हा भेटायचं नव्हतं

अजयनं एका मुलाखतीदरम्यान सांगितले  होते की, काजोलच्या पहिल्या भेटीतच त्यानं पुन्हा कधीच भेटणार नाही असं ठरवलं होतं. हलचल चित्रपटादरम्यान या दोघांची भेट झाली. तेव्हा काजोलला पुन्हा भेटेल असं अजयला वाटलं नव्हतं. कारण जेव्हा पहिल्यांदा अजय आणि काजोल भेटले होते तेव्हा  तिनं मोठ्या आवाजात, एटिट्यूट दाखवत बोलायला सुरूवात केली. नंतर हळूहळू अजयला काजलचा स्वभाव कळू लागला आणि मैत्री वाढत गेली. अजयनं काजोलबाबत सांगितले की,''ते तिचे फर्स्ट इम्प्रेशन होते. हळूहळू मी तिला समजून घ्यायला सुरूवात केली आणि नंतर माझा विचार बदलला.'' दोघांकडे आज बॉलीवुडचे आइडियल कपल म्हणून पाहिले जातं. 

पहिल्याच भेटीत एखाद्याबाबत मत ठरवू नका

जेव्हा तुम्ही पहिल्यांदा कोणाबरोबर डेटवर जाता, तेव्हा पहिल्या भेटीत त्या व्यक्तीबाबत मतं बनवू नका. कदाचित ती व्यक्ती तुम्हाला पहिल्यांदा भेटेल तेव्हा तिला थोडं अवघडल्यासारखं वाटत असेल. अशा स्थितीत, आपण त्यांना कर्फर्टेबल करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. आपल्याला हे समजून घ्यावे लागेल की आपण कदाचित एखाद्याला जवळून ओळखू शकत नाही, आपल्याला नातेसंबंध सुरू करण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. त्यानंतरच निर्णय घेणं योग्य ठरेल.

गमावू शकता बेस्ट पार्टनर

कधीकधी जेव्हा आपण पहिल्यांदाच व्यक्तीबद्दल मत ठरवता आणि बरेच काही गमावता. तुमच्यासाठी हे समजून घेणे महत्वाचे आहे की जर कोणी तुम्हाला आवडत असेल, तर तुम्हाला त्यांना जाणून घेण्यासाठी आणि समजून घेण्यासाठी थोडा वेळ द्यावा लागेल. अनेकदा लोक पहिल्याचवेळी त्यांची मतं तयार करतात, ज्यामुळे ते अशा व्यक्तीला गमावतात जो त्यांच्यासाठी सर्वोत्तम जोडीदार असू शकतो. नंतर, जेव्हा समोरच्या व्यक्तीच्या चांगुलपणाबद्दल कळते. तेव्हा तुम्हाला फक्त खंत वाटते.

दोन वेगळ्या विचारांचे लोक सर्वोत्तम कपल्स बनवतात

दोन वेगळ्या विचारांचे लोक चांगले पार्टनरर्स बनतात. बऱ्याचदा तुम्ही पाहिले असेल की जोडप्यांमध्ये अनेक गोष्टी वेगळ्या असतात, पण तरीही त्या एकमेकांसोबत खूप आनंदी असतात. याचे कारण असे की सहसा जेव्हा दोन भिन्न लोक नात्यात येतात तेव्हा ते दररोज काहीतरी नवीन शिकतात. हीच गोष्ट आपले संबंध सुधारते. म्हणून आपल्यापेक्षा वेगळ्या विचारांची व्यक्ती असल्यासं एकदा संधी घेऊन पाहा, त्या व्यक्तीला समजण्याचा प्रयत्न करा. 

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिपकाजोलअजय देवगण