Join us  

Relationship Tips : सर्वाधिक भारतीय आपल्या पार्टनरकडून ठेवतात 'या' अपेक्षा; डेटिंग अ‍ॅपमधून खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 31, 2021 6:51 PM

Relationship Tips : भारतीय रिलेशनशिपबाबत स्वतःला कसे व्यक्त करतात. त्यांच्या जीवनात पार्टनरला किती महत्व देतात, पार्टनरकडून त्यांच्या अपेक्षा काय असतात याबाबत खुलासा केला आहे. 

डेट हा लग्नापुर्वीचा सगळ्यात आनंददायक सोहळा. डेटींग अ‍ॅ प्सचा वापर गेल्या काही वर्षात प्रचंड वाढला आहे. भारतात आजही लोक आपलं खासगी आयुष्य, लव्ह लाईफ, रिलेशनशिपबाबत खुलेपणानं बोलायला तयार होत नाहीत. डेटिंग अ‍ॅ प  OkCupid नं एक आकडेवारी समोर आणली आहे. यात भारतीय रिलेशनशिपबाबत स्वतःला कसे व्यक्त करतात. त्यांच्या जीवनात पार्टनरला किती महत्व देतात, पार्टनरकडून त्यांच्या अपेक्षा काय असतात याबाबत खुलासा केला आहे. 

या सर्वेक्षणात युझर्सना विचारण्यात आलं की, त्यांना सगळ्यात जास्त रिलॅक्स, स्वातंत्र्य कशात वाटतं.  त्यांच्या प्रतिक्रियांनुसार  ३९ लोकांना आर्थिक बाबतीत, ३० टक्के लोकाना प्रवास करताना, २२ टक्के लोकांना  सेक्यूअलिटी आणि ९ टक्के लोकांना आर्ट म्हणजेच स्वतःच्या कलेसाठी वेळ देत असताना रिलॅक्स वाटतं. 

जेव्हा युझर्सना विचारलं की त्यांना पैसे की स्वातंत्र्य सगळ्यात जास्त काय आवडतं. त्यावेळी ६५ टक्के लोकांनी स्वातंत्र्यात राहणं आवडत असल्याचं नमुद केलं तर ३५ टक्के लोकांनी पैश्यांना प्राथमिकता दिली आहे. या आकड्यांवरून स्पष्ट झालं की, भारतातील जास्तीत जास्त लोक पैश्याच्या मागे धावून आपल्या स्वातंत्र्याशी तडदोड करू इच्छित नाहीत. तर काहींना आपलं स्वातंत्र्य पैश्यांपुढे लहान वाटतं. 

रिलेशनशिपबाबत ६८ टक्के लोकांना आपल्या पार्टनरला स्वातंत्र्य देणं पटतं. ७३ टक्के युजर्सना  लॉन्ग टर्म रिलेशनशिपमध्ये आपल्या पर्सनल बँक खात्यातून फायनेंशियल स्वातंत्र्याचा आनंद घ्यावासा वाटतो.  २७ टक्के युजर्सना आपल्या पार्टनरसोबतच्या जॉईंट अकाऊंटबाबत समस्या होती. या आकडेवारीतून दिसून आलं की, भारतीय डेटरर्स, आपल्या आयुष्यातील वेगवेगळ्या पैलूंना कशाप्रकारे बघतात.

९० टक्के लोकांनी माध्यमांचे स्वातंत्र्य मिळायला हवं असं नमुद केलं तर ७६ टक्के लोकांनी धार्मिक स्वातंत्र्य टिकवण्यासाठी कायदा गरजेचा असल्याचं सांगितलं. OkCupid सिनियर मार्केटिंग मॅनेजर सितारा मेनन यांनी सांगितले की, ''भारतीय लोक स्वातंत्र्याला राष्ट्रीय किंवा वैयक्तीक पातळीवर मोकळेपणानं व्यक्त होण्याच्या अधिकाराच्या स्वरूपात पाहतात.'' 

बायको किंवा गर्लफ्रेंडकडून पुरुषांना नेमकं काय ऐकायचं असतं?

1) कधीकधी आपल्या नवऱ्यावर किंवा बॉयफ्रेंडवर आपण दाखवलेला अविश्वास आपल्यासाठीच धोकादायक ठरू शकतो. त्यामुळे माझा तुझ्यावर विश्वास आहे, हे एक वाक्य जरी तुम्ही प्रेमाने म्हंटलं तरी त्याचा समाेरच्या व्यक्तीवर खूप चांगला परिणाम होतो. आपल्या जोडीदाराचा आपल्यावर विश्वास आहे, हे वाक्य खूप प्रेरणादायी असतं. आपल्या बायकोने किंवा गर्लफ्रेंडने आपल्यावर दाखवलेला विश्वास पुरूषांना सुखावणारा असतो. 

2) स्वत:ची तारीफ ऐकुन जशा महिला सुखावत असतात, तसाच आनंद पुरूषांनाही होत असतो. त्यामुळे अगदी सहज बोलता- बोलता जरी तुम्ही नवऱ्याच्या किंवा बॉयफ्रेंडच्या दिसण्याचे कौतूक केले, त्याला हॅण्डसम म्हंटले तरी एवढ्यावरच तुमचा पुढचा एक आठवडा तरी उत्तम जाईल. 

3) आपण चारचौघांसारखे नाही, आपण खरोखरंच कुणीतरी स्पेशल आहोत, असे वाक्य जेव्हा आपण इतरांकडून ऐकतो तेव्हा नकळतच मन फुलपाखराप्रमाणे हलकं होऊन उडू लागतं. असंच काहीसं पुरूषांचं पण असतं. तु इतरांसारखा नाहीस, तु खूप वेगळा, स्पेशल आहेस हे वाक्य पुरूषांनाही त्यांच्या बायकोकडून किंवा गर्लफ्रेंडकडून ऐकायला भारी आवडत असतं.

4) आपल्याला सतत कुणी बदलण्याचा प्रयत्न करत असेल, तर आपल्याला ते आवडत नसते. असं कुणी करत असेल तर शेवटी एक वेळ अशी येते की 'आपण जसे आहोत, तसे आहोत...' असे आपण स्वत:ला आणि समोरच्याला देखील ठणकावून सांगत असतो. आपल्याला अशी व्यक्ती हवी असते, जी आपल्याला आपल्या गुणदोषांसह स्विकारेल. म्हणूनच तर तु जसा आहेस, तसा मला खूप आवडतोस, हे वाक्य आठवड्यातून एकदा तरी नवऱ्याला म्हणा. बघा तुमच्यात भांडण होणारंच नाही.

टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप