आपल्या आई-आज्जीच्या काळात मुला-मुलीला न पाहाताच पसंती मिळायची. त्यानंतर मागच्या काही दशकापासून मुला-मुलींना पाहण्यासाठी कांदे-पोह्याचा कार्यक्रम रंगू लागला.(How to choose the right partner) पण सध्या जोडीदार निवडण्याच्या पद्धतींमध्ये अनेक बदल दिसून येत आहेत. (Choosing a life partner independently)वय उलटून गेले तरी अनेकांचे लग्न मात्र काही लवकर होत नाही. ओळखीतल्या किंवा काही डेटिंग साइट्स वर आपण आपला भावी जोडीदार शोधण्याचा प्रयत्न करत असतो.(Compatibility over tradition) तरुण पिढीला आपल्या जोडीदाराबद्दल अनेक अपेक्षा असतात. घर, कुटुंब, नोकरी अशा विविध गोष्टींमध्ये त्यांना आपला पार्टनर फिट बसतोय का हे पाहायचं असतं.(Partner choice without family pressure) लग्न हे साता़ जन्माचा बंधन असलं तरीसुद्धा यात काही बदल होताना दिसत आहे. अशातच सध्याच्या पिढीमध्ये लग्न करण्याआधीच मुलगा किंवा मुलगी एकमेकांना डेट करतात.(Speed dating for youngsters) ज्यावेळी त्यांना असं वाटतं की, समोरचा व्यक्ती आपल्या अपेक्षांमध्ये आपल्या भावनांशी तंतोतंत जुळवून घेत आहे.(Modern dating trends 2025) तेव्हाच पुढे लग्नाचा विचार केला जातो. सध्या कॅज्युल डेटिंग, लिव्ह इन रिलेशनशिप, ऑनलाइन डेटिंग, सिच्युएशनशिप यांसारखे अनेक ट्रेंड नात्यामध्ये पाहायला मिळतात.(Youth and speed dating culture) त्याच नवा ट्रेंड आला आहे, स्पीड डेटिंगचा. स्पीड डेटिंग म्हणजे काय? तरुण पिढीचा याला उत्स्फूर्त प्रतिसाद का मिळत आहे जाणून घेऊया.(Gen Z dating habits)
दोघेही प्रेमात की मामला एकतर्फी ? ८ गोष्टी सांगतील पार्टनर धोका देतोय की प्रेमात पडलाय..
१९९० साली यहुदी समाजामध्ये स्पीड डेटिंग हा प्रकार सुरु झाला होता. त्यावेळी आपला पार्टनर शोधण्यासाठी हा मार्ग निवडण्यात आला. एकाच ठिकाणी तरुण मुलं -मुली जमायचे, काही मिनिटे एकमेकांशी बोलायचं तर काही जण पुढे भेटायचा का यावर विचार करायचे. सध्याच्या धावपळीच्या जीवनशैलीत डेट करण्यासाठी तरुण पिढीकडे वेळ नाही, म्हणूनच हा स्पीड डेटिंगचा ट्रेंड पुन्हा चर्चेत आला आहे.
यामध्ये तरुण-तरुणींना एकमेकांशी बोलण्याचा अवधी हा फक्त ३ ते ८ मिनिटांचा असतो. एकमेकांशी चर्चा झाल्यानंतर सगळ्यात शेवटी स्कोअरकार्ड दिला जातो. ज्यांना पुन्हा भेटायचे असते त्यांनी त्याचे नाव लिहिायचे. जर त्या दोघांचे जुळले तर तिथला आयोजक त्यांचे नंबर एकमेकांना शेअर करतात. हे कार्यक्रम पब, रेस्टॉरंट, कॅफे किंवा कोणत्याही कार्यक्रमाच्या ठिकाणी आयोजित केले जातात. सध्या वेगवेगळे डेटिंग साइट्स प्लॅटफॉर्म स्पीड डेटिंगशी संबंधित कार्यक्रमांना आयोजित करत आहे.
आम्हाला नातवंडाचं तोंड पहायचंय, घेऊन टाका चान्स! असं म्हणून घरातले बाळासाठी हट्ट करतात?
स्पीड डेटिंगचे फायदे
1. स्पीड डेटिंगमध्ये ज्या लोकांकडे वेळ नाही किंवा ऑनलाइन डेटिंगचा ज्यांना कंटाळा येतो. प्रोफाइल स्वाइप करण्यापेक्षा किंवा तासनतास कुणाशी गप्पा मारण्याऐवजी तरुण पिढी या गोष्टींना अधिक प्राधान्य देत आहे.
2. ऑनलाइन डेटिंगमध्ये फोटो आणि प्रोफाइल अनेकदा फसवे असतात. ज्यामुळे आपल्या मानसिक त्रासाला देखील सामोरे जावे लागू शकते. स्पीड डेटिंगमध्ये आपल्याला प्रत्यक्षपणे पाहता येते, आवाज ऐकता येतो त्याचे व्यक्तिमत्व समजते.
3. असे कार्यक्रम हे आयोजित केले जातात. त्यामुळे ती जागा सुरक्षित असते. तसेच एकट्याने अनोळखी लोकांना भेटण्याचा धोकाही कमी असतो. आपण अशा लोकांना भेटतो जिथे नवीन लोकांना भेटण्याची संधी मिळते. संवाद साधण्याचा काळ हा कमी असल्याने जास्त दबावही येत नाही. आपल्याला कुणी नसेल आवडले तर आपण पुढच्या व्यक्तीशी बोलण्याची सहमती दर्शवू शकतो.
स्पीड डेटिंगमुळे नुकसान
1. स्पीड डेटिंगमुळे आपल्याला फायदा होत असला तरी त्याचे नुकसान देखील आहे. कमी वेळात आपण एखाद्याला पूर्णपणे ओळखू शकत नाही. संवादाचा अभाव असल्यामुळे आपल्याला नाते पुढे नेता येणार नाही.
2. अनेकदा अशा कार्यक्रमांसाठी अधिकचे पैसे आकारले जातात. जे आपल्याला महागात पडू शकते.
3. पहिल्याच भेटीत आपण चेहरा पाहून एखाद्या व्यक्तीविषयी मत मांडतो परंतु यामुळे आपण एक चांगला व्यक्ती देखील गमावू शकतो.