विवाहनंतर जोडप्यानं हनिमूनला देश-विदेशात जाणं हे तसं काही नवीन नाही. पण रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडा लग्नानंतर बडीमुनिंगला गेल्याची चर्चा आहे. जेन झी तारुण्यात सध्या हा अजून एक नवीन ट्रेंड आहे. ते दोघंच दोघे आता हनिमूनला जात नाहीत. तर बडीमुनिंगला जातात.(Rashmika Mandanna latest news today) म्हणजेच काही जवळचे मित्रमैत्रिणी किंवा भाऊबहीण किंवा अगदी दोन्हीकडचे आईबाबा असे सारे कुटुंबच कुठंतरी फिरायला जाते.(Rashmika Mandanna and Vijay Deverakonda Buddymoon) विवाहानंतर सर्वांनी काहीकाळ एकत्र राहून आराम करणं आणि सोबत असणं महत्त्वाचं असं सांगणारा हा नवीन ट्रेंड.(Why couples are choosing Buddymoons)
Apple Cider Vinegar आणि पाणी! नॅशनल क्रश रश्मिका मंदानाचं फिटनेस सिक्रेट, पाहा तिचा डाएट प्लानरश्मिका मंदाना आणि विजयही आपल्या मित्रमैत्रिणींसोबत थायलंडला बडीमुनिंगला गेले म्हणून या ट्रेंडची चर्चा आहे. आजकाल अनेक तरुण जोडपी हा नवा ट्रेंड स्वीकारून आपल्या नव्या आयुष्याची सुरुवात करत असल्याचे दिसते.आजच्या धकाधकीच्या जीवनात मित्रांसोबत वेळ घालवणे कठीण झाले आहे. त्यामुळे लग्नानंतरचा हा खास काळ मित्रांसोबत साजरा करण्यासाठी बड्डीमूनिंग ही संकल्पना लोकप्रिय होत आहे. मित्रांसोबत फिरताना विविध खेळ, गप्पा, साहसी उपक्रम आणि नवीन ठिकाणांचा अनुभव घेता येतो. यामुळे नवविवाहित जोडप्याला केवळ एकमेकांना समजून घेण्यास मदत होत नाही, तर त्यांच्या मित्रांशी असलेले नातेही अधिक दृढ होते. काही ठिकाणी मित्रांसह दोन्हीकडचे भाऊबहीण, आईवडीलही सोबत प्रवासाला जातात.
Web Summary : Rashmika Mandanna and Vijay Deverakonda's buddymoon sparks a new trend. Instead of traditional honeymoons, couples vacation with friends and family. This allows for shared experiences and strengthens bonds during this special time.
Web Summary : रश्मिका मंदाना और विजय देवरकोंडा का बडीमून एक नया चलन शुरू करता है। पारंपरिक हनीमून के बजाय, जोड़े दोस्तों और परिवार के साथ छुट्टियां मनाते हैं। यह साझा अनुभवों और इस विशेष समय के दौरान रिश्तों को मजबूत करने की अनुमति देता है।