आपल्या पार्टनरला मीठी मारुन झोपणे ही फक्त भावना नाही तर आपल्या आरोग्यासाठी देखील चांगले आहे.(mental health and physical touch) आपल्या दैनंदिन धकाधकीच्या आयुष्यात मानसिक आरोग्याची काळजी घेणं जास्त गरजेचे आहे.(sleep cuddling benefits) पण कामाचा ताण, नात्यांमधील दडपण, मोबाईल आणि सोशल मीडियाचा अति वापर या सगळ्यांमुळे आपलं मन थकते. बरेचदा आपल्याला खूप टेन्शन आल्यानंतर आपण जवळच्या माणसाच्या सहवासात जातो.(cuddling with partner health benefits) ज्यामुळे काही प्रमाणात आपल्याला बरे वाटते. (couple bonding tips)
आपल्या जोडीदाराजवळ झोपल्याने केवळ प्रेम वाढत नाही तर ताण कमी होतो, झोप वाढते आणि नातं अधिक मजबूत होते.(emotional health benefits of hugging) अनेक अभ्यासातून असं सिद्ध झालं की, जोडीदाराजवळ झोपल्याने शरीरात ऑक्सिटोनिन नावाचा प्रेम संप्रेरक वाढतो, जो आपला मूड चांगला करतो. आपले हृदय निरोगी ठेवून नाते अधिक घट्ट करतो.(mental relaxation through physical touch) त्यासाठी पार्टनरला मिठी मारणे किंवा त्याच्या जवळ झोपणे हे निरोगी आणि आनंदी नात्याचे रहस्य आहे. पार्टनरला मिठी मारुन झोपण्याचे फायदे जाणून घेऊया.
ज्यावेळी आपण पार्टनरला मीठी मारुन झोपतो तेव्हा आपले शरीर ऑक्सिटोसिन नावाचा हार्मोन बाहेर सोडतो, ज्याला प्रेम हार्मोन असंही म्हणतात. हा हार्मोन आपला मूड सुधारतो, तणाव आणि चिंता कमी करतो. ज्यामुळे आपल्याला बरे वाटते.
आपल्या जोडीदाराच्या सहवासाने आपल्याला शांत झोप लागते. हृदयाचे ठोके देखील सुरळीत राहतात. पार्टनरला मिठी मारुन झोपल्याने शरीरातील हॅप्पी हार्मोन्स रिलीज होतात.
एकत्र मिठी मारुन झोपल्याने भावनिक बंध आणि विश्वास मजबूत होतो. जेव्हा आपण नियमितपणे एकमेकांना मिठी मारुन झोपतो तेव्हा आपले प्रेम आणि संबंध घट्ट होतात.
ऑक्सिटोसिन केवळ मूडवरच नाही तर शरीरावरही परिणाम करते. ते आपल्या रक्तदाब सुरळीत करण्यास मदत करते. ज्यामुळे हृदयाचे आरोग्य सुधारते. जोडीदाराचा स्पर्श आपले नैराश्य, चिंता कमी करते. मनाला शांत करते. यामुळे एकाकीपणा टाळण्यास मदत होते.
तसेच पार्टनरला मिठी मारुन झोपल्याने आपली रोगप्रतिकारशक्ती मजबूत करते. ज्यामुळे इतर आजारांशी लढण्यास मदत होते. कपल्स एकत्र झोपल्याने नात्यातील जवळीक वाढते. शरीरातील उष्णतेचा नैसर्गिक स्पर्श, पार्टनरच्या श्वासाची लय आणि सुरक्षिततेची भावना हे सगळं मिळून मनात शांतता मिळते. तज्ज्ञांच्या मते, नियमितपणे मिठी मारून झोपणाऱ्या जोडप्यांमध्ये एन्झायटी, डिप्रेशन आणि इन्सोम्निया सारख्या समस्या तुलनेने कमी दिसतात. पार्टनरला मिठी मारुन झोपण्याचे फक्त मानसिक नाही, तर शारीरिक फायदेसुद्धा आहेत.
