सध्याच्या धकाधकीच्या काळात जोडप्यांना नात्यात एकमेकांना हवा तसा वेळ देता येत नाही.(Relationship advice) ज्यामुळे गैरसमज, दुरावा मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे. नातं टिकवणं हे प्रेमापेक्षा अधिक महत्त्वाचं असतं.(Premanand Maharaj guidance) नात्याला समजून घेणे, जपणं आणि रोज टिकवण्यासाठी नव्याने प्रयत्न करावा लागतो. यासाठी प्रयत्न, संयम आणि मनाची परिपक्वता देखील लागते.(How to build trust in relationships) घर, नोकरी, जबाबदाऱ्या आणि सोशल मीडियाच्या नादात आपण आपल्या जोडीदाराकडे दुर्लक्ष करतो.(Couple tips India) बरेचदा आपण समोरच्याला गृहित देखील धरतो, ज्यामुळे संवादाची कमतरता जाणवते आणि नात्यात दुरावा येऊ लागतो. (Relationship mistakes to avoid)हा नात्यातील दुरावा अनेकदा छळतो, त्रास देतो.. यामुळे आपल्या मानसिक आणि शारीरिक आरोग्यावर देखील परिणाम होतो. पण अशावेळी संवाद साधण, नात्याबद्दल सकारात्मक राहणं आणि जीवनाला नव्याने पाहण्याचा दृष्टीकोन या गोष्टी नात्याला स्थिरता देतात. या जीवनमूल्यांवर भर देताना प्रेमानंद महाराजांनी अलीकडेच कपल्ससाठी अतिशय उपयुक्त सल्ला दिला आहे. त्यांच्यामते पती-पत्नीमधील दुरावा मोठ्या गोष्टींमुळे नाही तर लहान लहान चुकीच्या सवयींमुळे, अहंकारामुळे आणि संवादाच्या अभावामुळे निर्माण होतो. नातं तुटत नाही ते हळूहळू, नकळत, दिवसेंदिवस कमकुवत होत जातं. अशावेळी काय करायला हवं, पाहूया.
नव्या नवरीसाठी डायमंड मंगळसूत्राच्या सुंदर नाजूक डिझाइन्स! कमी वजनाचे डेलिकेट पॅटर्न- स्टायलिश लूक
प्रेमानंद महाराज म्हणतात विश्वास हा प्रत्येक नात्याचा पाया असतो. लग्नासारखं पवित्र नातं हे विश्वासाच्या जोरावर टिकून राहाते. जोपर्यंत जोडीदार एकमेकांवर विश्वास ठेवतात तोपर्यंत हे नातं मजबूत आणि निरोगी राहते. कोणत्याही नात्याचा पाया विश्वासावर अवलंबून असते. त्यासाठी लग्नापूर्वी किंवा कोणत्याही नात्यात जाणण्यापूर्वी जोडीदारासोबत मनमोकळेपणाने आणि खरेपणाने संवाद साधा. ज्यामुळे तुमचे नातं सत्याच्या आधारावर सुरु होईल.
सध्याच्या जोडप्यांची समस्या ही आहे की ते एकमेकांचे ऐकत नाहीत. त्यांना वाटतं की ते बरोबर आहे. या गैरसमजामुळे अनेक वेळा नात्यात दुरावा येतो. अनेकदा नाते तुटते देखील. सोशल मीडियामुळे जितक्या गोष्टी चांगल्या वाटतात तितकेच ते वाईट आहे. त्यासाठी कोणता निर्णय घेताना आपल्या जोडीदाराची संमती घ्या. गैरसमज करुन घेण्याऐवजी एकमेकांशी चर्चा करा.
भारतात लग्नपद्धतीला पूर्वीपासूनच महत्त्वाचे मानले गेले आहे. हे नाते दोन व्यक्तींमधील नसून दोन कुटुंबांना जोडणारे आहे. मुलगी सासरी आल्यानंतर ती घराची, नवऱ्याची आणि सासू- सासऱ्यांची जबाबदारी योग्य पद्धतीने घेते. पण तिची काळजी घेणे हे नवऱ्याचे कर्तव्य असते. यामुळे दोघांमधील नाते अधिक घट्ट होईल. नात्यात प्रेम वाढेल, ज्यामुळे नाते कधीच तुटणार नाही.
Web Summary : Couples face challenges due to lack of time and communication, leading to misunderstandings. Premanand Maharaj advises building trust through open communication, mutual respect, and shared decision-making to strengthen relationships and avoid gradual weakening.
Web Summary : जोड़ों को समय और संचार की कमी के कारण चुनौतियों का सामना करना पड़ता है, जिससे गलतफहमी होती है। प्रेमानंद महाराज खुली बातचीत, आपसी सम्मान और साझा निर्णय लेने के माध्यम से विश्वास बनाने की सलाह देते हैं ताकि रिश्तों को मजबूत किया जा सके और धीरे-धीरे कमजोरी से बचा जा सके।