पती-पत्नीच्या आयुष्यातील महत्त्वाचा घटक शारीरिक संबंध.(Physical Relationship) हे केवळ शारीरिक जवळीकता नसून एकमेकांच्या मनाला जोडणारं आणि नात्याला आणखी घट्ट करण्याचं साधन म्हणून सेक्सकडे पहायला हवं.(Prevent sexual infections) त्यासोबतच आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेची काळजी घेणं तितकंच गरजेचं आहे. लैंगिक संबंधातूनही होणारे संसर्ग बरेचदा शरीर संबंध ठेवताना संसर्गाचा धोका वाढतो. शरीर संबंध ठेवताना संसर्गाविषयी किंवा आरोग्याविषयी चर्चा होत नाही.(Hygiene during intercourse) त्यामुळे महिला आणि त्यांच्या लैंगिक आरोग्याविषयी कमी बोललं जातं. पण महिलांनी लैंगिक संबंध ठेवल्यानंतर काय करायला हवं? स्वच्छता कशी राखायला हवी, याविषयी जाणून घेऊया. (Intimate hygiene care)
यूरोलॉजिस्ट डॉ. रमण तंवर म्हणतात जोडीदारासोबत वेळ घालवताना आपल्या शरीराचा, घामाचा वास यायला नको आणि थकलेले नको. डॉक्टर सांगतात बरेचदा शरीर संबंध ठेवताना पार्टनरला आपल्या भावना आवरता येत नाही. त्यामुळे जननेंद्रियांची स्वच्छता राखणं अधिक महत्त्वाचं आहे, ज्यामुळे संसर्गाचा धोका कमी होईल. तसेच नखंही नीट कापायला हवे.
दोघेही प्रेमात की मामला एकतर्फी ? ८ गोष्टी सांगतील पार्टनर धोका देतोय की प्रेमात पडलाय..
ओरल सेक्स करताना माउथ कंडोमचा वापर करायला हवा. ओरल सेक्स करताना महिला व पुरुषांनी स्वच्छतेची काळजी घ्यायला हवी. अर्थात दोघेजण त्यासाठी कम्फर्टेबल असतील तरच ते करणं योग्य. कोमट पाणी आणि माइल्ड साबण वापरून जननेंद्रियांची स्वच्छता राखा, तसेच हात स्वच्छ धुणं महत्त्वाचं आहे. यामुळे बॅक्टेरिया आणि फंगल इन्फेक्शनचा धोका कमी होतो. स्त्रियांसाठी शरीर संबंधानंतर गरम पाणी वापरून जननेंद्रियांची स्वच्छता करणं, तसेच ओलसर कपडे तात्काळ बदलणं महत्त्वाचं आहे.
अनेकदा शरीर संबंध ठेवताना काही जोडपी योग्य ती काळजी घेत नाही,त्यामुळे संसर्ग वाढतो. कंडोमचा वापर केल्याने अनपेक्षित गर्भधारणा टाळण्यास मदत होते. इतकेच नाही तर लैंगिकरित्या पसरत असलेल्या एचआयव्ही, सिफिलिस, गोनोरिया सारख्या गंभीर आजारांपासून संरक्षण करता येतं. पण फक्त कंडोम वापरणं पुरेसं नाही तर स्वच्छतेची योग्य ती काळजी घ्यायला हवी.