lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > Relationship Tips: आधुनिक नवऱ्यांना आवडतात बायकोच्या 5 गोष्टी, तरच झकास जमते नात्याची केमिस्ट्री

Relationship Tips: आधुनिक नवऱ्यांना आवडतात बायकोच्या 5 गोष्टी, तरच झकास जमते नात्याची केमिस्ट्री

Relationship Tips: आपल्या सभोवती आपण अनेक जोडपी पाहतो, ज्यांना पाहून अनोळखी व्यक्तीलाही वाटतं की हे कपल म्हणजे अगदी मेड फॉर इच अदर आहे... असं काय खास असतं त्यांच्यामध्ये, हे जाणून घ्यायचं असेल तर हे वाचाच....

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 16, 2022 07:30 PM2022-03-16T19:30:25+5:302022-03-16T19:31:39+5:30

Relationship Tips: आपल्या सभोवती आपण अनेक जोडपी पाहतो, ज्यांना पाहून अनोळखी व्यक्तीलाही वाटतं की हे कपल म्हणजे अगदी मेड फॉर इच अदर आहे... असं काय खास असतं त्यांच्यामध्ये, हे जाणून घ्यायचं असेल तर हे वाचाच....

Modern Husbands Loves these 5 things of his wife... Tips for the best chemistry in relation | Relationship Tips: आधुनिक नवऱ्यांना आवडतात बायकोच्या 5 गोष्टी, तरच झकास जमते नात्याची केमिस्ट्री

Relationship Tips: आधुनिक नवऱ्यांना आवडतात बायकोच्या 5 गोष्टी, तरच झकास जमते नात्याची केमिस्ट्री

Highlightsमनात त्याने त्याच्या परफेक्ट बायकोची इमेज रंगवलेली असते आणि त्यानुसार या ५ गोष्टी आपल्या बायकोमध्ये असाव्यात, असं त्याला वाटत असतं.. 

काही जोडपी खूप कचाकचा भांडतात, तर काही जणांची भांडणंही खूप सावकाश, संथपणे आणि मुद्देसूद असतात.. काही जोडप्यांची भांडणं आठ- आठ दिवस टिकतात, तर काही अगदी ८- १० मिनिटांतच गळ्यात गळे घालून आनंदाने एकत्र येतात.. प्रत्येक जोडप्याची कहानी वेगळी असली, तर जोडीदारांकडून असणारी अपेक्षा (expectations of husband from his wife) मात्र थोड्या फार फरकाने प्रत्येकाची सारखीच असते.. 

 

ज्याप्रमाणे प्रत्येक मुलीला आपला नवरा समंजस, स्मार्ट, आपल्यावर प्रेम करणारा, उत्तम इनकम असणारा, आपली आणि आपल्या आई- वडिलांची काळजी घेणारा असावा, असं वाटत असतं.. थोडं- फार इकडेतिकडे झालं तरी नवऱ्याकडून प्रत्येकीच्या अपेक्षा जवळपास सारख्याच असतात. तसंच प्रत्येक पुरुषाचंही असतं. त्याच्या मनात त्याने त्याच्या परफेक्ट बायकोची इमेज रंगवलेली असते आणि त्यानुसार या ५ गोष्टी आपल्या बायकोमध्ये असाव्यात, असं त्याला वाटत असतं.. 

 

आता बघा एकमेकांची अपेक्षा समजून घेऊन त्यानुसार वागलं, तर तुम्हीही होऊ शकता अगदी 'made for each other' वालं परफेक्ट कपल... हल्ली नवरा आपल्याकडे लक्षच देत नाहीये, आपण बोलतो आणि त्याचं लक्ष दुसरीकडेच असतं.. त्याला आता आपली काळजीच नाही.. असं काही काही तुमच्या मनात यायला लागलं असेल तर हे एकदा वाचा आणि आपलं नेमकं इथे तर चुकत नाहीये ना हे स्वत:लाच विचारा..

 

नवऱ्याला बायकोमध्ये पाहिजे असतात या ५ गोष्टी....
१. हल्ली पुरुषांना उगाच काहीतरी बडबडणारी, मुळूमुळू रडणारी, लाजरीबुजरी बायको नको असते. त्यांना स्वतंत्र विचारांची, स्मार्ट, कमावती आणि डॅशिंग बायको जास्त आवडते. 
२. घरातले, करिअरचे, ऑफिसमधले प्रॉब्लेम्स जिच्याशी शेअर करता येईल, जिला ते समजून घेता येतील, अशा स्त्रिया पुरुषांना अधिक प्रभावित करतात. 
३. एखादा कठीण प्रसंग येताच घाबरून जाणाऱ्या बायकोपेक्षा बरोबरीने उभी राहून साथ देणारी, हिंमत देणारी बायको पुरुषांना अधिक प्रिय असते.
४. पुरुषांचाही बायकोकडे पाहण्याचा दृष्टीकोन आता बऱ्याच प्रमाणात बदलला आहे. त्यामुळे घरातल्या जबाबदाऱ्या, मुलांची शाळा- अभ्यास यात गढून गेलेली टिपिकल इमेजची बायको त्यांना नको आहे. स्वत:कडेही लक्ष देणारी, पार्लर- जीम असं सगळं सांभाळून टापटिप राहणारी बायको आता अनेक जणांची चॉईस आहे..
५. आई किंवा शिक्षिका बनून कायम चिडणारी, ओरडणारी, समजून सांगणारी बायको नको असते.. बायकोमध्ये मैत्रिणीला शोधण्याचा प्रयत्न बहुसंख्य पुरुषांचा असतो. 


 

Web Title: Modern Husbands Loves these 5 things of his wife... Tips for the best chemistry in relation

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.