lokmat Supervote 2024
Lokmat Sakhi >Relationship > मिलिंद सोमण - अंकिता कोंवरची परफेक्ट डेट, डेटवर जाताना तुम्हीही करू शकता असं काही..

मिलिंद सोमण - अंकिता कोंवरची परफेक्ट डेट, डेटवर जाताना तुम्हीही करू शकता असं काही..

फिटनेस फ्रिक असलेले हे रोमँटीक कपल आपल्या चाहत्यांनाही कायमच व्यायामाची प्रेरणा देते. पाहूया परफेक्ट डेट म्हणून त्यांनी काय केले...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 21, 2021 02:49 PM2021-10-21T14:49:00+5:302021-10-21T14:51:04+5:30

फिटनेस फ्रिक असलेले हे रोमँटीक कपल आपल्या चाहत्यांनाही कायमच व्यायामाची प्रेरणा देते. पाहूया परफेक्ट डेट म्हणून त्यांनी काय केले...

Milind Soman - Ankita Konwar's Perfect Date, Something You Can Do When Going on a Date .. | मिलिंद सोमण - अंकिता कोंवरची परफेक्ट डेट, डेटवर जाताना तुम्हीही करू शकता असं काही..

मिलिंद सोमण - अंकिता कोंवरची परफेक्ट डेट, डेटवर जाताना तुम्हीही करू शकता असं काही..

Highlightsतुमच्यासाठी परफेक्ट डेट काय असू शकेलमिलिंद आणि अंकिता देताहेत चाहत्यांना व्यायामाची प्रेरणा

कपल्ससाठी लग्नाआधी आणि नंतरही एकमेकांसोबत डेट करणे रोमँटीक गोष्ट असते. आता कोण ही डेट कशी साजरी करेल आपण सांगू शकत नाही. आपल्या जोडीदाराला आवडणाऱ्या गोष्टी करुन जोडपे डेटस साजऱ्या करताना दिसतात. यामध्ये बॉलिवूडमधील अभिनेते आणि अभिनेत्री कायमच आघाडीवर असताना दिसतात. प्रसिद्ध अभिनेता मिलिंद सोमण आणि त्याची पत्नी अंकीता कोंवर या दोघांचे रोमँटीक अंदाजातील फोटो कायमच सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होतात. चाहत्यांचीही त्याला मोठी पसंती मिळत असल्याचे दिसते. रोमान्सबरोबरच हे दोघेही फिटनेस फ्रिक असल्याचे आपल्याला पाहायला मिळते. मिलिंद सोमण कायम आपले धावतानाचे, वेगवेगळ्या व्यायामप्रकारांचे फोटो आणि व्हिडियो आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट करत आपल्या चाहत्यांना व्यायामाची प्रेरणा देत असतो. अंकिताचीही त्याला याबाबतीत अतिशय उत्तम साथ असल्याचे पाहायला मिळते. 

नुकताच अंकिताने या दोघांचा धावतानाचा एक रिल व्हिडियो तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या पोस्टला तिने एक छान कॅप्शन दिली आहे. ती म्हणते, “आमच्यासाठी परफेक्ट डेट कोणती असेल, तर डोंगराळ भागात २० किलोमीटर धावणे...” यापुढे तिने प्रेमाचे प्रतिक असलेल्या हार्टचे स्मायली टाकले आहे. या रिलमध्ये हे दोघे एका निसर्गरम्य ठिकाणी रस्त्याच्या बाजुने एका लयीत धावताना दिसत आहेत. दोन दिवसात तिच्या या पोस्टला ३६ हजारांहून अधिक लाइक्स मिळाले असून चाहत्यांनी त्यावर प्रतिक्रियाचा पाऊस पाडला आहे. ‘तुमच्यासारखे आम्ही कधी धावणार’, ‘अमेझिंग’, ‘फॅंटास्टीक’, ‘इन्स्पिरेशनल कपल’ अशा या प्रतिक्रिया आहेत. 

अंकिताबरोबरच मिलिंदनेही आपला धावण्याचा फोटो इन्स्टाग्रामवर पोस्ट केला आहे. माझे प्रेम असलेल्या व्यक्तीसोबत प्रेम असलेल्या टेकडीवर २० किलोमीटर धावणे अशी कॅप्शन देत, ज्यांना हा व्हिडियो कोणी काढला असा प्रश्न पडला आहे, त्यांच्यासाठी ड्रायव्हरने हा व्हिडियो काढल्याचा उल्लेखही त्याने कॅप्शनमध्ये केला आहे. हे दोघेही सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात अॅक्टीव्ह असतात आणि सतत काही ना काही पोस्ट करत चर्चेत राहतात. अंकिताने २०१८ मध्ये मिलिंद सोमणशी लग्न केले. तेव्हापासून त्या दोघांच्या वयातील अंतरामुळे त्यांना मोठ्या प्रमाणात ट्रोल करण्यात आले. मात्र त्यांनी त्यांचे कपल गोल्स कायम ठेवल्याचे दिसते. 

Web Title: Milind Soman - Ankita Konwar's Perfect Date, Something You Can Do When Going on a Date ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.