Join us  

जगण्याला बळ मिळालं आणि.., अदिती द्रविड सांगतेय अक्षया नाईकशी असलेल्या जिवाभावाच्या मैत्रीची गोष्ट!

By भाग्यश्री कांबळे | Published: August 06, 2023 10:30 AM

International Friendship Day : फ्रेण्डशिप डे स्पेशल : अदिती द्रविडसाठी मैत्री किती महत्वाची आहे, तिला घरपण कोणाकडून मिळालं?

भाग्यश्री कांबळे

नकळत आपल्या आयुष्यात अनेक लोकं येतात, त्यातील काहींना आपण मैत्रीचं नाव देतो. मैत्री कोणासोबत, कुठे, कशी होईल हे सांगता येत नाही. नकळत होणारी मैत्री जीवनाच्या शेवटपर्यंत देखील टिकू शकते. अशीच निखळ मैत्री अभिनेत्री अदिती द्रविड आणि अभिनेत्री अक्षया नाईक यांची आहे. येत्या फ्रेण्डशिप डे निमित्त ‘लोकमत सखी’ने अदिती द्रविडशी गप्पा मारल्या. मैत्री कशी टिकते, ती कशी सुरुवात होते, मैत्री घराचा घरपण कशी देते हे सारं अदितीने मुलाखतीमध्ये सांगितलं आहे. अदितीसाठी मैत्री का खास आहे पाहूयात.

मुलींची मैत्री खास का असते ?

अदिती सांगते : काही महिन्यांपूर्वी मी सुंदरा मनामध्ये भरली ही मालिका करत होते. त्यादरम्यान माझी मैत्री अक्षया नाईक हिच्यासोबत झाली. कास्टिंग झाल्यानंतर मला अक्षयाचा मेसेज आला की, आता मुक्काम पोस्ट नाशिक का?, कारण या मालिकेचं शुटींग नाशिकमध्ये होणार होतं. यामुळे मी कम्फर्टेबल झाले. मला सख्खी बहिण नाही, पण मला या मैत्रीमधून बहिणीचं प्रेम मिळालं. आमचं एवढं चांगलं बॉण्ड तयार झालं होतं की, अनेकदा आम्ही एकमेकींच्या डोळ्यांच्या इशाऱ्यावरून गोष्टी समजून घ्यायचो. मुलींमध्ये कॅट फाइट्स होत राहतात. परंतु, एकमेकींना समजून घेऊन जी मैत्री टिकते ती कमाल असते.

अभिज्ञा भावे सांगतेय, तिच्या ४ खास मैत्रिणींची गोष्ट, मैत्री जगायचं बळ देते ती अशी..

एकाच व्यवसायात, त्यातही ग्लॅमरस इंडस्ट्रीत अशी निखळ मैत्री होते का? ती कशी पक्की होत जाते?

अदिती सांगते : जेव्हा दोघीजणी कलाकार म्हणून, प्रोफेशनला धरून इन्सिक्युर नसतात. तेव्हा मैत्रीमध्ये मिठाचा खडा पडत नाही. कारण आपल्यात किती टॅलेण्ट आहे, व समोरच्या व्यक्तीमध्ये किती टॅलेण्ट आहे, हे ठाऊक असतं. आपलं टॅलेण्ट कोणीही काढून घेऊ शकत नाही. जर आपला आपल्या कलेवर विश्वास असेल तर, ही मैत्री का नाही टिकू शकणार. अनेकदा इन्सिक्युरिटीमुळे नाती तुटतात. हेल्दी कॉम्पिटिशन असायला हवी, पण यासोबत एकमेकींना मोटीवेट करणं देखील गरजेचं आहे. मैत्री आणि प्रोफेशन हे जर आपण वेगळं ठेवलं तर, नक्कीच ही मैत्री अधिक फुलू शकते.

जोडीदाराचे ‘अफेअर’ आहे असे समजले तर अशावेळी नक्की काय कराल?

मैत्री नक्की काय देते, सुरक्षितता-आधार-बळ?

अदिती सांगते : मैत्रीकडून सुरक्षितता-आधार-बळ या तिन्ही गोष्टी मिळत असतात. मैत्री या तिन्ही गोष्टींपासून तयार झाली आहे.  प्रसंगानुसार या तिन्ही गोष्टी आपणही समोरच्या व्यक्तीला देत असतो. आम्ही दोघी आमच्या घरच्यांपासून खूप लांब होतो. त्यामुळे माझ्यासाठी सुरक्षिततेचं कवच म्हणून अक्षया माझ्यासोबत होती. एकदा मुंबईवरून नाशिकला येत असताना इगतपपुरीला माझा अपघात झाला, अशावेळी ऐरवी आपली आई घरी काळजी घेत असते, पण अशा प्रसंगी मला धीर देण्यापासून माझी काळजी घेण्यापर्यंत माझं सगळं काही अक्षयाने केलं. 

टॅग्स :अदिती द्रविडअक्षया नाईकफ्रेंडशिप डे