सध्या व्हॅलेंटाईन वीक सुरू आहे. त्यानिमित्ताने जे अजून सिंगल आहेत पण कोणाच्या तरी प्रेमात पडलेले आहेत अशा व्यक्तींच्या प्रेमाला आणि उत्साहाला उधाण आलेले असते. आता लग्नाच्या आधी किंवा प्रपोज केल्यानंतर बॉयफ्रेंड गर्लफ्रेंडला काय वाटेल ते करून खुष ठेवण्याचा, तिला आनंदात ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. पण जसं लग्न होतं आणि नव्याचे नऊ दिवस सरतात, तसा तो बॉयफ्रेंड एकदम बदलून जातो आणि टिपिकल नवरा होतो. असा कित्येक जणींचा अनुभव आहे. पण काही राशींचे पुरुष मात्र असे अजिबात बदलत नाहीत. ते त्यांच्या बायकोवर मनापासून प्रेम करतात. म्हणूनच तर त्यांना अगदी परफेक्ट नवरा मानलं जातं. असा नवरा म्हणजे जणू त्याच्या पत्नीसाठी अस्सल हिराच असतो.. बघा नेमके कोणत्या राशींचे पुरुष या प्रकारात येतात...
परफेक्ट नवरा म्हणून ओळखले जातात 'या' राशींचे पुरुष
१. कर्क
आता आपल्याला माहितीच आहे की कर्क रास ही अतिशय प्रेमळ आणि मायाळू असते. त्यामुळे या राशीचे पुरुषही असेच असतात. ते त्यांच्या घरात, कुटूंबात अगदी समरस होऊन आयुष्य जगतात. पत्नीचा चेहरा पाहूनच तिला काय म्हणायचं आहे हे त्यांना बरोबर कळतं. हे लोक खूप इमोशनल असल्याने पत्नीच्या मनाचाही ते तेवढाच विचार करतात. शिवाय भांडणं झालीच तरी ते सोडविण्यासाठी तेच आधी पुढाकार घेतात.
६ महिन्यांत गुडघ्यापर्यंत लांब होतील केस, नेहमीच्या शाम्पूत मिसळा 'हा' काळा पदार्थ, केस भराभर वाढतील
२. वृषभ
वृषभ राशीचे पुरुष त्यांच्या नात्यात खूप स्टेबल असतात आणि अतिशय रोमँटीक असतात. त्यामुळे त्यांची बायको त्यांच्यावर नेहमीच खुष असते. मी तुझ्यासाठी हे करेल, ते करेल असं पत्नीला म्हणत बसण्यापेक्षा त्या गोष्टी तात्काळ करण्यावर त्यांचा भर असतो. बायकोची प्रत्येक लहानसहान गोष्ट ते लक्षात ठेवतात आणि सरप्राईज देणं त्यांना विशेष आवडतं.
३. तूळ
तूळ राशीचे लोक खूप संतुलित असतात. कोणताही निर्णय घेताना ते आधी पत्नीला विचारात घेतात आणि तिच्या सहमतीनेच निर्णय घेतात. त्यांचा स्वभाव खूप संतुलित असल्याने ते कधीही टोकाचा वाद घालत नाहीत. वाद करण्यापेक्षा तो कसा सोडवायचा यावर त्यांचा जास्त भर असतो.
महागड्या पैठणीवर पडले तेलातुपाचे डाग? चटकन करा ३ उपाय, डाग होता कुणाला कळणारही नाही
४. मीन
हे लोकही खूप मायाळू, प्रेमळ असतात. पत्नीची काळजी घेतात आणि सगळ्यांसमोर तिची चौकशी करण्यात त्यांना मुळीच संकोच वाटत नाही. त्यांच्या प्रेमात अजिबात दिखाऊपणा नसतो. तर ते जे काही करतात ते अगदी मनापासून केलेलं असतं.
