Join us
Daily Top 2Weekly Top 5

मान-गाल पाठीवर लव्ह बाईट्स कसे लपवाल? ५ सोपे उपाय-डागही दिसणार नाहीत आणि त्रासही होईल कमी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 10, 2025 16:58 IST

love bite remedies: hickey removal tips: how to remove love bite: लव्ह बाईट्सचे डाग घालवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय करायला हवे जाणून घेऊया.

नात्यातील जवळीकता आणि प्रेमाचे काही क्षण जितके सुखद असतात तितकेच त्रासदायक देखील. कपल्स आपलं प्रेम कायमच वेगवेगळ्या पद्धतीने व्यक्त करत असतात. (love bite remedies) त्यातीलच एक लव्ह बाईट्स. अनेकदा पार्टनर अतिउत्साहात शरीरावर वेगवेगळ्या ठिकाणी लव्ह बाईट्स देतात. गाल, मान किंवा खांद्यावर दिसणारे लव्ह बाईट्स अर्थात hickey marks हे रोमँटिक वाटत असले तरी याचे लालसर, काळपट डाग, सूज रोजच्या जीवनात मोठी अडचणीचे ठरतात. (hickey removal tips) विशेषत: ऑफिसला जाणारे, कॉलेजला जाणारे किंवा घरातून बाहेर पडताना जास्त लोकांशी संपर्क येत असेल तर  या मार्क्समुळे आपण जास्तच अस्वस्थ होतो. (home remedies for love bite)कधी कधी या लव्ह बाईट्सचा काळा- निळा डाग आपल्याला जास्त त्रास देतो. पण अनेकांसमोर हे लाजिरवाणे देखील ठरते. अनेकजण हे बाहेर जाताना लपवण्याचा प्रयत्न करतात. (get rid of hickey fast) डाग घालवण्यासाठी जोरजोरात घासतात किंवा मेकअप करतात पण यामुळे त्रास जास्त होतो. लव्ह बाईट्सचे डाग घालवण्यासाठी काही सोपे घरगुती उपाय करायला हवे जाणून घेऊया. (remove red marks on neck)

ऑफिसवेअरसाठी प्रिटेंड शर्टचे ५ नवीन पॅटर्न! पाहा आकर्षक डिझाइन्स, कॅज्युअल लूकमध्ये दिसाल स्मार्ट आणि एलिगंट

1. लव्ह बाईट्सचे डाग घालवण्यासाठी आपण कोल्ड कॉम्प्रेसचा वापर करु शकतो. बर्फाचा तुकडा घ्या आणि तो डाग असलेल्या ठिकाणी चोळा. ज्यामुळे गोठलेल रक्त पातळ होऊन डाग जाण्यास मदत होईल. 

2. आपण नारळाचे किंवा टी ट्री ऑइल आपण लव्ह बाईट्सच्या डागावर लावू शकतो. नंतर हलक्या हाताने मालिश करा. दर २ तासांनी असं केल्यास डाग निघून जातील. तसेच जळजळ होणार नाही. 

3. अर्निका जेल ही फुले आणि औषधी वनस्पतींपासून बनवले जाते. हे क्रीम आणि जेल दोन्ही स्वरुपात मिळते. लव्ह बाईटच्या ठिकाणी लावा. सतत लावल्याने डाग नाहीसे होतात.हे अँटीसेप्टिक मानले जाते. 

4. अनेकदा आपण केळीचे साल फेकून देतो. पण लव्ह बाईट्स काढून टाकण्यासाठी हे खूप फायदेशीर आहेत. केळीची साल आपण डागावर घासून घ्या. ज्यामुळे डाग हळूहळू कमी होतील. केळीच्या सालीमध्ये असे घटक असतात जे डाग दूर करण्यास मदत करतात. 

5. लव्ह बाईट्सचे डाग घालवण्यासाठी कोरफडचा गर वापरु शकतो. कोरफडीचा गर त्वचा गुळगुळीत होते, तसेच डाग जाण्यास मदत होईल आणि रक्ताभिसरण देखील सुधारेल. 

English
हिंदी सारांश
Web Title : How to hide love bites? 5 easy home remedies.

Web Summary : Love bites can be awkward. Here are five simple home remedies using ice, coconut oil, arnica gel, banana peel, and aloe vera to quickly fade hickeys and reduce discomfort.
टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप