Join us

सासु-सुनांच्या नात्यातील कटुता होईल कमी! दिवाळीत करा 'या' ४ खास गोष्टी- नात्यात फुलेल प्रेम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 19, 2025 13:35 IST

Diwali relationship tips: Diwali family bonding ideas: saas bahu understanding tips: सण-समारंभात जसा गोडवा दरवळतो तसंच नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी काही गोष्टी केल्यास नात्यात नव्याने प्रेम फुलण्यास मदत होईल.

दिवाळी म्हणजे केवळ दिव्यांचा, फटाक्यांचा आणि फराळाचा सण नाही तर तो म्हणजे नात्यात गोडवा आणण्याचा दिवस देखील आहे.(Diwali relationship tips) आपल्या मनातील अंधार दूर करुन, प्रेमाचा उजेड पसरवण्याची एक सुंदर संधी असते. सध्याच्या धकाधकीच्या काळात जीवनात नात्यांमधील दुरावा वाढताना पाहायला मिळत नाही.(Diwali family bonding ideas) ज्यामुळे नात्यातील संवाद कमी होतो, गैरसमज मोठ्या प्रमाणात वाढतात. ज्यामुळे नातं तुटतं. दिवाळी या सणात अनेकदा पाहुणे मंडंळी घरी येतात.(saas bahu understanding tips) अशावेळी नात्यांमधील मतभेद,नाराजी दूर करणं ही एक चांगली संधी असू शकते. या दिवशी आपण नात्यांमध्ये प्रेमाचा प्रकाश पुन्हा प्रज्वलित करु शकतो.(how to make mother-in-law happy on Diwali) बरेचदा सासु-सुनांमध्ये देखील वाद होताना पाहायला मिळतात. सण-समारंभात जसा गोडवा दरवळतो तसंच नात्यातील गोडवा टिकवण्यासाठी काही गोष्टी केल्यास नात्यात नव्याने प्रेम फुलण्यास मदत होईल. 

गुलाबाचं रोप कोमजलं- पानं सुकली? ऑक्टोबर महिन्यात 'एवढं' कराच, टपोऱ्या फुलांनी बहरेल गुलाबाचं रोप

या सणात आपल्या जोडीदारासाठी, आई-वडिलांसाठी, मित्रांसाठी किंवा मुलांसाठी थोडासा वेळ काढा. एका साध्या गप्पांमध्ये किती प्रेम दडलेलं असतं, हे फक्त अनुभवून कळतं. दिवाळीत एकत्र दिवे लावणे, फराळ करणे, सजावट करणे या छोट्या गोष्टींमुळे नात्यात नवा गोडवा येतो.

1. नात्यात नेहमी एकमेकांना क्षमा करायला शिका. जर आपण एखाद्या गोष्टीला कायम धरुन बसलो तर नात्यातील कटुता कधीच कमी होणार नाही. आणि राग आयुष्यभर टिकून राहिल. त्यासाठी काही गोष्टी करायला हव्या. 

2. दिवाळीत ज्याप्रमाणे आपण घराची साफसफाई करतो. त्याचप्रमाणे नात्यातल्या कटुता देखील दूर करायला हवी. ज्यामुळे नात्यांमधील कटुतेची धूळ साफ होईल आणि विश्वास वाढेल. 

3. दिवाळी हा नात्यांना जोडण्याचा उत्तम काळ असू शकतो. नातेसंबंध सुधारण्यासाठी आपण वैयक्तिकरित्या भेटवस्तू देऊ शकता. काही सरप्राईज देखील आखू शकता. आपल्या प्रियजनांना आपण काही स्पेशल नोट्स देखील लिहू शकता. 

4. कोणत्याही नात्यातील गैरसमज हे संभाषणाद्वारे सोडवता येतात. त्यासाठी एकमेकांशी बोलून गोष्टी सुधारा. दुसऱ्या व्यक्तीचे मत ऐकू शकाल आणि समजून घेऊ शकाल. समोरच्याला समजून घेण्यासाठी आपला दृष्टिकोन बदला 

English
हिंदी सारांश
Web Title : Improve Mother-in-Law Relationship: 4 Diwali Tips for Love!

Web Summary : Diwali offers a chance to mend relationships. Erase bitterness, forgive, clean emotional baggage, and offer personalized gifts. Open communication is key to understanding and resolving misunderstandings, fostering love between mother-in-law and daughter-in-law.
टॅग्स :रिलेशनशिपरिलेशनशिप