Lokmat Sakhi >Relationship > अगं बाई सासूबाई! सुनेशी पटलंच नाही तर काय अशी धास्ती वाटते? पाहा, काय करता येईल..

अगं बाई सासूबाई! सुनेशी पटलंच नाही तर काय अशी धास्ती वाटते? पाहा, काय करता येईल..

Relationship tips: relationship tips about mother in law and daughter in law: How to resolve conflict between wife and mother-in-law: How to build a positive relationship with your daughter-in-law: How to be a good mother-in-law to a daughter-in-law: Mother-in-law daughter-in-law therapy: relationship between mother in law and daughter in law: सासू सुनेचं नातं नाजूक असलं तरी त्या नात्यातही मैत्री होऊच शकते.

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 19, 2025 10:12 IST2025-02-19T10:11:52+5:302025-02-19T10:12:38+5:30

Relationship tips: relationship tips about mother in law and daughter in law: How to resolve conflict between wife and mother-in-law: How to build a positive relationship with your daughter-in-law: How to be a good mother-in-law to a daughter-in-law: Mother-in-law daughter-in-law therapy: relationship between mother in law and daughter in law: सासू सुनेचं नातं नाजूक असलं तरी त्या नात्यातही मैत्री होऊच शकते.

How to build a positive relationship with your daughter-in-law use this therapy | अगं बाई सासूबाई! सुनेशी पटलंच नाही तर काय अशी धास्ती वाटते? पाहा, काय करता येईल..

अगं बाई सासूबाई! सुनेशी पटलंच नाही तर काय अशी धास्ती वाटते? पाहा, काय करता येईल..

'अगं बाई सासूबाई...' सासू आणि सुनेच नातं. तसं बदनामच. त्यांचं पटत नाही हेच जगजाहीर. पण एकत्र तर राहावं लागतं, नातं जन्मभराचं असतं. (relationship tips about mother in law and daughter in law) तसं पाहिलं तर मुलगी आपलं घर सोडून दुसऱ्या घरी जाते तेव्हा त्या घरात तिला मायेने आणि प्रेमाने जवळ घेणारी एकमेव व्यक्ती म्हणजे सासू. पण अनेकदा टीव्ही सीरिअलमध्ये सासू आणि सून कटकारस्थानं करताना दिसतात.(How to be a good mother-in-law to a daughter-in-law) घरोघर असंच वागतात बायका असा समजही असतो. आजकाल म्हणे मुलींना सासूसासरे नकोच असतात असं व्हॉट्सॲपवरही सतत फिरतं. पण यातलं खरं काय? खरं हेच की हे नातंही आता पूर्वीसारखं राहिलेलं नाही.


आता मुलाचं लग्न होणार म्हणताच सासूही विचार करते की आपलं पटेल का सूनेशी. काही गोष्टी ती ही बदलते. पण धास्तावलेलीच असते की आपलं नाहीच पटलं तर? तर अशी धास्ती असेल तर नव्या सासूबाईंनी काही गोष्टी जरुर कराव्या. (How to build a positive relationship with your daughter-in-law)

वयाची तिशी ओलांडली म्हणून लग्न जमवण्याची घाई करताय? तरीही जोडीदार निवडताना ५ चुका नकोच

१. नव्या काळात मुली स्वावलंबी आणि स्वतंत्र विचार करणाऱ्या आहेत. जुन्या परंपरांची कास न सोडून देता, काही नवीन बदल कसा घडवता येईल यावर त्या अधिक विचार करत असतात. काही गोष्टी नको म्हणतात. त्यांचं आयुष्य असं म्हणून आपले आग्रह जरा बाजूला ठेवले तर..

२. जर सासू म्हणून तुम्ही प्रत्येक गोष्टीत हस्तक्षेप करत असाल तर सुनेला त्या नात्याचं ओझं वाटू लागतं. त्यामुळे ती तुमच्याशी मनमोकळेपणानं बोलणं टाळते. मत मांडा, पण हस्तक्षेप टाळा.

३. प्रत्येक व्यक्तीचा स्वभाव जसा वेगळा असतो तसेच त्याचे विचारही वेगळे असतात. कधी तिचं ऐकून घ्या, तेव्हा ती तुमचे ऐकून घेईल. तिच्यावर तुमची मतं लादण्यापेक्षा तिच्या मनात काय सुरु आहे हे समजून घेतलं तर सोपं होईल.
४. माया करा, प्रेम द्या, आदर द्या. ज्यात त्यात नावं ठेवली नाही की काम सोपं होतं.
५. कोणत्याही नात्यात संवाद  महत्त्वाचा असतो. अबोले धरणे, टोमणे मारण्यापेक्षा जे आवडलं नाही ते शांतपणे सांगा.

Web Title: How to build a positive relationship with your daughter-in-law use this therapy

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.